आपली युवा शक्ती चमत्कार घडवू शकते - पंतप्रधान नरेंद्र मोदी
November 28th, 07:41 pm
भारताची युवा शक्ती चमत्कार घडवू शकते, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. या युवाशक्तीने चमकदार कामगिरी करावी आणि त्यांना सर्वोत्कृष्ट बनवता यावं यासाठी सर्व संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आहे.Prime Minister hails Make In India success story for global economic boost
July 16th, 10:28 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has hailed Make In India success story for global economic boost. Shri Modi has shared a glimpse of how Make In India is propelling India's economy onto the global stage.डिजिटल इंडिया उपक्रमाला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
July 01st, 01:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया उपक्रमाने यशस्वीरित्या 9 वर्षे पूर्ण केल्याबद्दल प्रशंसा केली आहे. जीवनमान सुलभता आणि पारदर्शकतेला चालना देणाऱ्या सक्षम भारताचे डिजिटल इंडिया हे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.बँकिंग क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या योगदानाचे पंतप्रधानांकडून कौतुक
June 19th, 08:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी MyGovIndia द्वारे X या समाजमाध्यमावर पोस्ट करण्यात आलेली शृंखला सामायिक करत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बँकिंग क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी दिलेले योगदान अधोरेखित केले आहे.नॅशनल क्रिएटर्स अवार्ड मध्ये सहभाग घेण्याची पंतप्रधानांचे लोकांना आवाहन
February 11th, 08:28 pm
नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डची माहिती देणाऱ्या MyGovIndia च्या X पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे:26 डिसेंबर 2023 रोजी 'वीर बाल दिना'निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी
December 25th, 04:17 pm
नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं येत्या 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता 'वीर बाल दिना'निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते दिल्लीतल्या तरुणांच्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवतील.सरकारी योजना दिवाळीत प्रत्येक घरात आनंद घेऊन येत आहेत : पंतप्रधान
November 10th, 03:03 pm
अनेक सरकारी योजनांमुळे, प्रत्येक घर दिवाळीत आनंदात असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे.मन की बात (मराठी अनुवाद) 105वा भाग
September 24th, 11:30 am
‘मन की बात’च्या आणखी एका भागात मला तुमच्यासोबत देशाचे यश, देशवासियांचे यश, त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास याबाबत बोलण्याची संधी मिळाली आहे. सध्या मला आलेली बहुतेक पत्रं आणि संदेश, मुख्यत्वेकरुन याच दोन विषयांवर आहेत. पहिला विषय म्हणजे चंद्रयान-3चे यशस्वी अवतरण आणि दुसरा विषय जी-20चे दिल्लीतील यशस्वी आयोजन. मला देशाच्या प्रत्येक भागातून, समाजातील प्रत्येक घटकाकडून, सर्व वयोगटातील लोकांकडून असंख्य पत्रे मिळाली आहेत. चंद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरत असताना कोट्यवधी लोक एकाच वेळी वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेच्या क्षणाक्षणाचे साक्षीदार होत होते. इस्रोच्या यू-ट्यूब लाईव्ह वाहिनीवर 80 लाखांहून अधिक लोकांनी ही घटना थेट पाहिली, हा एक विक्रमच आहे. यावरून हे लक्षात येते की, कोट्यवधी भारतीयांचं चंद्रयान-3 सोबत किती गहिरं नातं आहे. चांद्रयानाच्या या यशावर आधारीत, देशात सध्या एक अतिशय सुंदर अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू आहे, प्रश्नांची उत्तरे देण्याची स्पर्धा आणि तिचं नाव आहे - 'चंद्रयान-3 महाक्विझ'. MyGov पोर्टलवर होत असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे. MyGov सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नमंजुषा स्पर्धेमधला हा सर्वात मोठा सहभाग आहे. मी तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही अद्याप यात सहभागी झाला नसाल तर उशीर करू नका, अजून सहा दिवस शिल्लक आहेत. या प्रश्नमंजुषेमध्ये जरूर भाग घ्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(100 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
April 30th, 11:31 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज मन की बातचा शंभरावा भाग आहे. मला आपल्या सर्वांची हजारो पत्रं मिळाली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी असा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त पत्रे वाचेन, पाहीन आणि संदेशांना जरा समजण्याचा प्रयत्न करावा. आपली पत्रं वाचताना मी कित्येकदा तर अतिशय भावनावश झालो, भावनांनी ह्रदय उचंबळून आलं आणि भावनामध्ये वाहूनही गेलो आणि स्वतःला पुन्हा सावरलं. आपण माझं मन की बातच्या शंभराव्या भागासाठी अभिनंदन केलं आहे. परंतु मी खरोखर सांगतो की वास्तविक पहाता अभिनंदनास पात्र तर आपण सर्व मन की बातचे श्रोते आहात, आमचे देशवासी आहेत. मन की बात कोटी कोटी भारतीयांची मन की बात आहे त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण आहे.पराक्रम दिनानिमित्त संसदेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली म्हणून आयोजित समारंभात सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आलेल्या तरुणांशी, ‘‘तुमच्या नेत्याबद्दल जाणून घ्या’ कार्यक्रमांतर्गत 7, लोककल्याण मार्ग येथे पंतप्रधानांनी साधला संवाद
January 23rd, 08:03 pm
संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली म्हणून आयोजित सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निवड झालेल्या तरुणांशी ‘तुमच्या नेत्याबद्दल जाणून घ्या’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. 7, लोककल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी हा संवाद झाला.भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण
November 08th, 07:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (93 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
September 25th, 11:00 am
माझ्या प्रिय देशवासियांनों, गेल्या काही दिवसांत चित्ता या विषयाने आपले सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्त्यांबद्दल बोलू इच्छिणारे अनेक संदेश मिळाले आहेत. उत्तर प्रदेशमधले अरुणकुमार गुप्ताजी, तेलंगणामधले के. एन. रामचंद्रन रघुराम जी, गुजरातमधले राजन जी, दिल्लीचे सुब्रत जी अशा अनेकांनी संदेश पाठवले आहेत. चित्ता भारतात परतल्याबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. 130 कोटी भारतीय आनंदी आहेत, त्यांना अभिमान वाटतो आहे - हे भारताचे निसर्गप्रेम आहे. यासंदर्भात सर्व लोक एक प्रश्न आवर्जून विचारत आहेत की, मोदीजी, आम्हाला चित्ता बघायची संधी कधी मिळणार?हर घर तिरंगा अभियानाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघून पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
July 22nd, 02:16 pm
हर घर तिरंगा आंदोलनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.व्यापक समृद्धी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘8 वर्षांत केलेल्या सुधारणा’ पंतप्रधानांनी केल्या सामाईक
June 11th, 12:35 pm
‘व्यवसाय सुलभता' आणि व्यापक समृद्धी तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी 8 वर्षांत केलेल्या सुधारणांची तपशीलवार माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केली आहे. त्यांनी MyGov वरची ट्विट संदेश मालिका आणि त्यांच्या संकेतस्थळ तसेच नमो अॅपवरचे याबाबतचे लेख सामायिक केले आहेत.पंतप्रधानांनी महिला सक्षमीकरणाविषयी कार्याचा 8 वर्षांचा तपशील केला सामायिक
June 09th, 05:16 pm
नारी शक्तीच्या सक्षमीकरणासाठी सरकारच्या कार्याची माहिती देणाऱ्या विविध लेखांचे तपशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी narendramodi.in या संकेतस्थळावर सामायिक केले आहेत.Start-ups are reflecting the spirit of New India: PM Modi during Mann Ki Baat
May 29th, 11:30 am
During Mann Ki Baat, Prime Minister Narendra Modi expressed his joy over India creating 100 unicorns. PM Modi said that start-ups were reflecting the spirit of New India and he applauded the mentors who had dedicated themselves to promote start-ups. PM Modi also shared thoughts on Yoga Day, his recent Japan visit and cleanliness.मुद्रा योजनेने असंख्य भारतीयांना त्यांचे उद्योजकीय कौशल्य दाखविण्याची आणि रोजगार निर्माते होण्याची संधी दिली : पंतप्रधान
April 08th, 07:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू झाल्यापासून, गेल्या सात वर्षात या योजनेने असंख्य भारतीयांना त्यांचे उद्योजकीय कौशल्य दाखविण्याची आणि रोजगार निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.या सात वर्षांत मुद्रा योजना गेम चेंजर ठरली असून प्रतिष्ठेसह समृद्धी वाढवण्यातही या योजनेचे योगदान आहे असे ते म्हणाले.सरकारचे प्रमुख या नात्याने 20 वर्ष पूर्ण केल्यानिमित्ताने पंतप्रधानांवर आधारित MyGov प्रश्नमंजुषेचे आयोजन
October 07th, 11:41 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सरकारचे प्रमुख म्हणून 20 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने MyGovIndia सेवा समर्पण प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.मायगव्ह मंचाला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या सुविधेसाठी काम करणारे स्वयंसेवक आणि सहभागी यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
July 26th, 06:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मायगव्ह मंचाला समृध्द करण्यासाठी योगदान देणारे सर्व स्वयंसेवक आणि सहभागी यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.भारताचा लसीकरण कार्यक्रम हे जगासाठी आदर्श उदाहरण ठरू शकतेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
June 27th, 11:30 am
मित्रांनो, जेव्हा टोक्यो ऑलिम्पिकचा विचार आपण करत आहोत , तेव्हा मिल्खासिंगजीसारख्या दिग्गज खेळाडूला, (धावपटूला) कोण विसरु शकेल? काही दिवसांपूर्वीच कोरोनाने त्यांना आमच्यातून हिरावून नेले. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती.