
आम्हाला आमच्या अन्नदात्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत: पंतप्रधान
February 24th, 10:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की सरकारला भारतातील अन्नदात्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. MyGovIndia ने X या समाजमाध्यमावर दिलेल्या थ्रेड पोस्टला उत्तर देताना ते म्हणाले:
भारतीय समुदायाने वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 24th, 11:30 am
मन की बात च्या 116 व्या भागात, पंतप्रधान मोदींनी NCC छात्रांचा विकास आणि आपत्ती निवारणाच्या कार्यातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकत NCC दिनाचे महत्व विशद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण होण्याची गरज त्यांनी स्पष्ट करण्यासोबतच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मदत करणाऱ्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचे यशही त्यांनी शेअर केले.
'हर घर तिरंगा अभियान' तिरंग्याचे वैभव टिकवून ठेवणारा एक अनोखा उत्सव झाला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 28th, 11:30 am
मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.#10YearsOfMyGov: सुशासनासाठी परिपक्व आणि उत्साहवर्धक मंच असल्याचे पंतप्रधानांकडून कौतुक
July 26th, 06:50 pm
MyGov हा मंच सुरू होऊन आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंचाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. सुशासनासाठी हा एक परिपक्व मंच असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे.मन की बात: 'मेरा पहला वोट - देश के लिए'... प्रथमच मतदानाचा हक्क बजावत असलेल्या मतदारांना पंतप्रधान मोदींचे आवाहन
February 25th, 11:00 am
नमस्कार ! मन की बात च्या 110 व्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या अनेक सूचना, इनपुट्स आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे याहीवेळी, या भागात कशाकशाचा समावेश करायचा, हे एक आव्हान आहे. सकारात्मकतेने भरलेले एकापेक्षा एक उत्तमोत्तम इनपुट्स मला मिळाले आहेत. इतरांसाठी आशेचा किरण होऊन त्यांची आयुष्यं अधिक चांगली करण्यासाठी अविरत झटणाऱ्या अनेक देशबांधवांचा यांमध्ये उल्लेख आहे.नवी दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदान येथे एनसीसी छात्रसैनिकांच्या रॅलीला पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
January 27th, 05:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राजनाथ सिंह जी, अजय भट्ट जी, तिन्ही दलांचे प्रमुख, सीडीएस जनरल अनिल चौहान जी, संरक्षण सचिव, एनसीसीचे महासंचालक , सर्व अतिथी आणि एनसीसीचे माझे तरुण मित्रांनो...पंतप्रधानांनी करिअप्पा परेड ग्राउंड, दिल्ली येथे एनसीसी पीएम रॅलीला केले संबोधित
January 27th, 04:30 pm
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की ते स्वत: एनसीसीचे माजी छात्रसैनिक असल्यामुळे एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित असताना त्या आठवणी जाग्या होणे स्वाभाविक आहे. “एनसीसी कॅडेट्सबरोबर उपस्थित राहताना एक भारत श्रेष्ठ भारत’ची प्रचिती येते”, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की देशाच्या विविध भागांतील छात्रसैनिक इथे उपस्थित असल्याचे त्यांना आढळले आहे. एनसीसीची व्याप्ती सातत्याने वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आजचा हा प्रसंग एक नवीन सुरुवात असल्याचे नमूद केले. व्हायब्रंट व्हिलेज योजनेंतर्गत सरकार विकसित करत असलेल्या सीमावर्ती भागातील गावांचे 400 हून अधिक सरपंच आणि देशभरातील बचत गटांमधील 100 हून अधिक महिला इथे उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले .वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन
December 26th, 12:03 pm
आज देश वीर साहिबजादांच्या अमर बलिदानाचे स्मरण करत आहे, त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहे.स्वातंत्र्याच्या अमृतकाळात वीर बाल दिवस रूपाने नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला आहे. गेल्या वर्षी देशाने प्रथमच 26 डिसेंबर, वीर बाल दिवस म्हणून साजरा केला तेव्हा अवघ्या देशाने भाव विभोर होऊन साहिबजादांच्या वीर गाथा ऐकल्या होत्या. वीर बाल दिवस, भारतीयत्वाच्या रक्षणासाठी, कोणतीही सीमा न ठेवता कोणतेही कृत्य करण्याच्या संकल्पाचे प्रतिक आहे. अत्युच्च शौर्य गाजवताना लहान वय आड येत नाही याचे स्मरण आपल्याला हा दिवस करून देतो. हे या महान वारश्याचे पर्व आहे, जिथे गुरू म्हणतात -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वीर बाल दिवस’ कार्यक्रमाला केले संबोधित
December 26th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘वीर बाल दिवस’ या कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी मुलांनी सादर केलेले पठण आणि मार्शल आर्टची तीन प्रदर्शने पाहिली. यावेळी पंतप्रधानांनी दिल्लीतील तरुणांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.काशी विश्वनाथ मार्गिकेची द्विवर्षपूर्ती पंतप्रधानांनी केली साजरी
December 14th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ मार्गिकेची द्विवर्षपूर्ती साजरी केली आहे.विकसित भारत 2047-युवांचा आवाज उपक्रमाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
December 11th, 10:35 am
आजचा दिवस ‘विकसित भारत’च्या संकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘विकसित भारत’शी संबंधित ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मी सर्व राज्यपालांचे विशेष अभिनंदन करतो. देशातील तरुणांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उचलणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना तुम्ही एका व्यासपीठावर आणले आहे. शैक्षणिक संस्थांच्या भूमिकेमुळे वैयक्तिक विकास होतो आणि राष्ट्राची उभारणी वैयक्तिक विकासातून होते. भारत सध्या ज्या युगात आहे, त्या काळात वैयक्तिक विकासाची मोहीम अत्यंत महत्त्वाची बनली आहे. युवांचा आवाज कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.'विकसित भारत @2047 : युवांचा आवाज' उपक्रमाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ
December 11th, 10:30 am
विकसित भारत उपक्रम पुढे नेण्यासाठी आजची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सर्व राज्यपालांचे आभार मानून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. विकसित भारत संकल्पासाठी आजचा कार्यक्रम विशेष असल्याचे ते म्हणाले. विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशातील तरुणांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असलेल्या सर्व संबंधितांना एकत्र आणण्याच्या त्यांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी व्यक्तिमत्त्व विकासात शैक्षणिक संस्थांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. लोकांचा विकास झाला तरच राष्ट्र विकसित होते, असे त्यांनी अधोरेखित केले. सध्याच्या युगात व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित करून पंतप्रधानांनी 'युवांचा आवाज' कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.140 कोटी जनता अनेक बदल घडवून आणत आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 26th, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.केवडिया येथील राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्यातील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
October 31st, 10:00 am
तुम्हा सर्व तरुणांचा, साहसी लोकांचा हा उत्साह, ही राष्ट्रीय एकता दिवसाची खूप मोठी ताकद आहे. एकप्रकारे लघु भारताचे, मिनी इंडियाचे रूप मला समोर दिसते. राज्ये वेगळी आहेत, भाषा वेगळी आहे, परंपरा वेगळ्या आहेत, पण इथे उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती एकतेच्या मजबूत धाग्याने जोडलेली आहे. मणी अनेक आहेत, पण माळ एक आहे. शरीरे अनेक आहेत, पण मन एकच आहे. ज्याप्रमाणे 15 ऑगस्ट हा आपल्या स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि 26 जानेवारी हा आपल्या प्रजासत्ताक दिनाचा जयघोष करण्याचा दिवस आहे, त्याचप्रमाणे 31 ऑक्टोबर हा दिवस देशाच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादाच्या संवादाचा उत्सव बनला आहे.गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिन समारंभात पंतप्रधान सहभागी
October 31st, 09:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय एकता दिनाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. त्यांनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे त्यांना आदरांजली वाहिली. सीमा सुरक्षा दल आणि विविध राज्य पोलिसांच्या तुकड्यांचा समावेश असलेले राष्ट्रीय एकता दिन संचलन, सीआरपीएफच्या सर्व महिला बायकर्सची थरारक प्रात्यक्षिके, सीमा सुरक्षा दलाचा महिला पाईप बँड, गुजरात महिला पोलिसांनी सादर केलेला नृत्याचा कार्यक्रम, विशेष एनसीसी शो, विविध शाळांचे बँड प्रदर्शन, भारतीय हवाई दलाचा फ्लाय पास्ट, व्हायब्रण्ट व्हिलेजच्या आर्थिक व्यवहार्यतेचे प्रदर्शन आदी कार्यक्रमांना पंतप्रधान उपस्थित होते.I consistently encourage our dedicated karyakartas to incorporate Deendayal Ji's seven sutras into their lives: PM Modi
September 25th, 07:31 pm
Addressing the BJP karyakartas on the birth anniversary of Pandit Deendayal Upadhyaya in New Delhi, Prime Minister Narendra Modi expressed, I am honored to inaugurate his statue at 'Pt. Deendayal Upadhyaya Park' in Delhi, and it's truly remarkable that we are witnessing this wonderful and happy coincidence moment. On one side, we have Deendayal Upadhyaya Park, and right across stands the headquarters of the Bharatiya Janta Party. Today, the BJP has grown into a formidable banyan tree, all thanks to the seeds he sowed.PM Modi pays tribute to Pt. Deendayal Upadhyaya in Delhi
September 25th, 07:09 pm
Addressing the BJP karyakartas on the birth anniversary of Pandit Deendayal Upadhyaya in New Delhi, Prime Minister Narendra Modi expressed, I am honored to inaugurate his statue at 'Pt. Deendayal Upadhyaya Park' in Delhi, and it's truly remarkable that we are witnessing this wonderful and happy coincidence moment. On one side, we have Deendayal Upadhyaya Park, and right across stands the headquarters of the Bharatiya Janta Party. Today, the BJP has grown into a formidable banyan tree, all thanks to the seeds he sowed.जनधन योजनेला नऊ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त पंतप्रधानांनी योजनेच्या लाभार्थ्यांचे केले अभिनंदन
August 28th, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज जनधन योजनेला नऊ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त या योजनेच्या लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्यांचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.India is on the moon! We have our national pride placed on the moon: PM Modi
August 26th, 08:15 am
PM Modi visited the ISRO Telemetry Tracking and Command Network (ISTRAC) in Bengaluru after his arrival from Greece and addressed Team ISRO on the success of Chandrayaan-3. PM Modi said that this is not a simple success. He said this achievement heralds India’s scientific power in infinite space. An elated PM Modi exclaimed, “India is on the Moon, We have our national pride placed on the Moon.चांद्रयान-3 च्या यशाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोच्या चमूला केले संबोधित
August 26th, 07:49 am
ग्रीसचा दौरा आटोपून मायदेशी परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरु येथे इस्रोच्या टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) ला भेट दिली आणि चांद्रयान-3 च्या यशाबद्दल इस्रोच्या चमूसमोर आपले विचार व्यक्त केले. चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या चमूमधील शास्त्रज्ञांची त्यांनी भेट घेतली ज्यावेळी त्यांना चांद्रयान-3 मोहिमेद्वारे मिळत असलेली माहिती आणि मोहिमेची प्रगती याविषयीची माहिती देण्यात आली.