डॉ. पृथ्वीन्द्र मुखर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शोक व्यक्त
November 30th, 09:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. पृथ्वीन्द्र मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. डॉ. मुखर्जी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांना संगीत तसेच काव्याचीही आवड होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.गयानामधल्या भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 22nd, 03:02 am
आपणा सर्वांसमवेत इथे उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. आपल्यासमवेत इथे उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रपती इरफान अली यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. इथे दाखल झाल्यापासून मला दिलेला स्नेह आणि आपुलकी यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपती अली यांनी आपल्या निवासस्थानी केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा स्नेह आणि आपुलकी यासाठीही मी आभारी आहे. आदरातिथ्य हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, गेले दोन दिवस मी याचा अनुभव घेत आहे. राष्ट्रपती अली आणि त्यांच्या आजीसमवेत आम्ही वृक्षारोपणही केले. ‘एक पेड मां के नाम’ म्हणजेच आईसाठी वृक्षारोपण या आमच्या उपक्रमाचा हा भाग आहे. हा भावनिक क्षण माझ्या नेहमीच स्मरणात राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील भारतीय समुदायाला केले संबोधित
November 22nd, 03:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित कार्यक्रमात आज तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. गयानाचे राष्ट्रपती डॉ.इरफान आली. पंतप्रधान मार्क फिलिप्स, उपराष्ट्रपती भारत जगदेव, माजी राष्ट्रपती डोनाल्ड रमोतार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी गयानामध्ये आल्यावर विशेष स्नेहासह त्यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी गयानाच्या राष्ट्रपतींचे आभार मानून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय यांनी व्यक्त केलेला स्नेह आणि दयाळूपणा याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.“आदरातिथ्याचे तत्व आपल्या संस्कृतीच्या हृदयस्थानी आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.भारत सरकारने सुरु केलेल्या ‘एक वृक्ष मातेसाठी’या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती आणि त्यांच्या आजी यांच्यासह एक रोपटे लावल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. हा एका अत्यंत भावनिक क्षण होता आणि तो आपल्या कायम स्मरणात राहील असे नोदी पुढे म्हणाले.The bond between India & Guyana is of soil, of sweat, of hard work: PM Modi
November 21st, 08:00 pm
Prime Minister Shri Narendra Modi addressed the National Assembly of the Parliament of Guyana today. He is the first Indian Prime Minister to do so. A special session of the Parliament was convened by Hon’ble Speaker Mr. Manzoor Nadir for the address.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयानाच्या संसदेला केले संबोधित
November 21st, 07:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गयानाच्या राष्ट्रीय संसदेला संबोधित केले. गयानाच्या राष्ट्रीय संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. गयाना संसदेचे अध्यक्ष मन्झूर नादिर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणासाठी विशेष अधिवेशन बोलावले होते.फलनिष्पत्तींची यादी : पंतप्रधानांचा गयानाचा शासकीय दौरा (19 ते 21 नोव्हेंबर, 2024)
November 20th, 09:55 pm
या विषयावरील सहकार्यात कच्च्या तेलाचे सोर्सिंग, नैसर्गिक वायू क्षेत्रातील सहकार्य, पायाभूत सुविधांचा विकास, संपूर्ण हायड्रोकार्बन मूल्य साखळीत क्षमता उभारणी आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांचा समावेश आहे.सुप्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
November 06th, 07:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुप्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.शारदा सिन्हा यांची मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत,असे पंतप्रधान म्हणाले.श्रद्धेचे महान पर्व असणाऱ्या छठ या सणाशी संबंधित त्यांची सुमधुर गाणी नेहमीच स्मरणात राहतील,असेही पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले "आवती कळाय माडी वया कळाय" हे त्यांनी स्वतः लिहिलेले गीत
October 07th, 10:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आवती कळाय माडी वया कळाय हे त्यांनी देवी दुर्गेच्या सन्मानार्थ स्वतः लिहिलेले गीत सामायिक केले.'मन की बात'चे श्रोते हेच या कार्यक्रमाचे खरे आधारस्तंभ: पंतप्रधान मोदी
September 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.ग्रॅमीजमध्ये 'सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत 'पुरस्कार पटकावल्याबद्दल उस्ताद झाकीर हुसेन आणि इतरांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
February 05th, 02:51 pm
'सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत' श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल उस्ताद झाकीर हुसेन, राकेश चौरसिया, शंकर महादेवन, सेल्वागणेश व्ही आणि गणेश राजगोपालन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.भारत-ओमानच्या संयुक्त सांगीतिक सादरीकारणाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
January 30th, 10:17 pm
प्रजासत्ताक दिनानिमित्त ओमानमधील भारतीय दूतावासामध्ये आयोजित दूतावास समारंभात भारत-ओमान संयुक्त संगीत सादरीकरणाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले आहे.What PM Modi has to say about the role of teachers in shaping students’ lives
January 29th, 05:38 pm
Prime Minister Narendra Modi addressed and interacted with students during the Pariskha pe Charcha, 2024. He spoke about the power of music, especially in students' lives, and how a school's music teacher has the unique ability to ease the stress of every student.इजिप्शियन मुलीने गायलेल्या देशभक्तीपर गीताचे पंतप्रधानांनी केले कौतुक
January 29th, 05:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात इजिप्तमधील करिमन हिने गायलेल्या देशभक्तीपर गीत देश रंगीला च्या सादरीकरणाचे कौतुक केले.पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त मुलांशी साधला संवाद
January 23rd, 06:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) पुरस्कार प्राप्त मुलांशी संवाद साधला.रामायणातील भावस्पर्शी शबरी भागावर आधारित मैथिली ठाकूर यांनी गायलेले गाणे पंतप्रधानांनी केले सामायिक
January 20th, 09:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैथिली ठाकूर यांनी रामायणातील भावनिक शबरी भागावर आधारित गायलेले गाणे सामायिक केले आहे.पंतप्रधानांनी गयाना येथील श्री राम भजन केले सामायिक
January 19th, 01:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना येथे सादर करण्यात आलेले श्री राम भजन आज सामायिक केले.सुरेश वाडेकर यांनी गायलेले भक्ती गीत पंतप्रधानांनी केले सामायिक
January 19th, 09:44 am
सुरेश वाडेकर आणि आर्या आंबेकर यांनी गायलेले भक्ती गीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले. संपूर्ण देश आज रामभक्तीच्या भावरंगात चिंब भिजलेला असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. एम. बालमुरलीकृष्ण यांनी गायलेले कर्नाटकी शैलीतील पालुके बंगारामायना हे शास्त्रीय गीत सामायिक केले आहे.
January 15th, 09:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. एम. बालमुरलीकृष्णा यांनी गायलेले कर्नाटकी शैलीतील पालुके बंगारामायना हे शास्त्रीय गीत सामायिक केले आहे.पंतप्रधानांनी महान कवी अरूणाचल कविरायर यांच्या रामा नाटकममधील गीताचे सादरीकरण केले पोस्ट
January 14th, 11:03 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान कवी अरूणाचल कविरायर यांच्या रामा नाटकममधील गीताचे, गायक अश्वथ नारायणन यांनी केलेले सादरीकरण सामायिक केले आहे.उस्मान मीर यांनी गायलेले “श्री रामजी पधारे” हे भक्तीपर भजन पंतप्रधानांनी केले सामायिक
January 10th, 09:47 am
उस्मान मीर यांनी गायलेले आणि ओम दवे व गौरांग पाला यांचे संगीत दिग्दर्शन असलेले “श्री रामजी पधारे” हे भक्तीपर भजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.