पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(भाग 102) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 18th, 11:30 am
मित्रांनो, खूप लोकं सांगतात की, पंतप्रधान म्हणून मी अमुक एक चांगले काम केले आहे, एखादे मोठे काम केले आहे. ‘मन की बात’ चे कित्येक श्रोते पत्र लिहून खूप कौतुक करतात. कोणी म्हणतात हे केले, कोणी म्हणते ते काम केले, हे चांगले केले, हे अधिक चंगले केले, हे उत्कृष्ट केले परंतु, जेव्हा मी भारतातील सामान्य नागरिकांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, त्यांची इच्छाशक्ती बघतो तेव्हा मी भारावून जातो. कोणतेही मोठे ध्येय असो, कठीणातील कठीण आव्हान असू दे, भारतीय जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक आव्हानावर तोडगा शोधून काढते. दोन-तीन दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिमेकडे किती मोठे चक्रीवादळ आले हे आपण सगळ्यांनीच पाहिले. जोरदार वारा, मुसळधार पाऊस. बिपरजॉय ने कच्छमध्ये किती मोठे नुकसान केले, परंतु कच्छ मधील लोकांनी हिंमतीने आणि सतर्कतेने इतक्या धोकादायक चक्रीवादळाचा सामना केला हे खूपच अभूतपूर्व आहे. दोन दिवसांनी कच्छ मधील लोकं, त्यांचे नवीन वर्ष अर्थात आषाढ बीज साजरे करणार आहेत. आषाढ बीज, कच्छ मध्ये पावसाच्या आगमनाचे प्रतिक मानले जाते हा देखील एक संयोगच आहे. मी इतकी वर्षे कच्छला येत-जातो, तिथल्या लोकांची सेवा करण्याचे भाग्यही मला लाभले आहे आणि म्हणूनच मला कच्छच्या लोकांची हिंमत आणि उपजीविकेविषयी माहिती आहे. दोन दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर हा कच्छ पुन्हा कधीच सावरणार नाही, असे म्हंटले जायचे, तोच जिल्हा आज देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे कच्छमधील लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून देखील त्याच वेगाने बाहेर पडतील.भारताचा लसीकरण कार्यक्रम हे जगासाठी आदर्श उदाहरण ठरू शकतेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
June 27th, 11:30 am
मित्रांनो, जेव्हा टोक्यो ऑलिम्पिकचा विचार आपण करत आहोत , तेव्हा मिल्खासिंगजीसारख्या दिग्गज खेळाडूला, (धावपटूला) कोण विसरु शकेल? काही दिवसांपूर्वीच कोरोनाने त्यांना आमच्यातून हिरावून नेले. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती.संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
September 14th, 09:58 am
एका दीर्घ काळानंतर आज आपल्या सगळ्यांची भेट होत आहे. आपण सगळे ठीक आहात ना? काही संकट तर नाही आले ना आपल्या कुटुंबात? चला, परमेश्वर आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवो.झारखंड मधल्या रांची इथे विविध विकास प्रकल्प आणि योजनांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांचे संबोधन
September 12th, 12:20 pm
नवे सरकार स्थापन झाल्यापासून ज्या राज्यांत सर्व प्रथम जाण्याची संधी मला मिळाली त्यापैकी झारखंड हे एक राज्य आहे. इथेच प्रभात मैदान, प्रभात तारा मैदान,सकाळची वेळ आणि आपण सर्व योग अभ्यास करत होतो, वरूण राजाही आशीर्वाद देत होता. आज पुन्हा या मैदानात आल्यावर याचे स्मरण झाले. याच मैदानावरून आयुष्यमान भारत योजना गेल्या सप्टेंबर पासून सुरू झाली होती.प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ
September 12th, 12:11 pm
शेतकऱ्यांचे जीवन सुकर करण्यासाठीच्या प्रयत्नातला आणखी एका महत्वाच्या योजनेचा प्रधानमंत्री किसान मान धन योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडची राजधानी रांची येथे प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत 60 वर्षाच्या पाच कोटी छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेंशनद्वारे त्यांचे जीवन सुरक्षित करण्यात येणार आहे.17व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन
June 17th, 11:54 am
निवडणुकांच्या नंतर नव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आज पहिले अधिवेशन सुरू होत आहे. संसदेत आलेल्या अनेक नव्या सहकाऱ्यांची ओळख होण्याची संधी आहे आणि जेव्हा नवे सहकारी आपल्या सोबत येतात तेव्हा त्यांच्यासोबत नवा उत्साह, उमेद आणि नवी स्वप्न जोडली जातात.17व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रांरभी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन
June 17th, 11:53 am
17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांचे स्वागत केले. लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या निवेदनात आज लोकसभेच्या निवडणुकांनंतर अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘आपण सर्व नव्या खासदारांचे स्वागत करत आहोत, या नव्या खासदारांसोबत नव्या आशा आणि नवी उमेद तसेच सेवा करण्याचा नवा निश्चय देखील आला आहे’, असे पंतप्रधान म्हणाले.संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांचे वक्तव्य
July 18th, 11:11 am
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज सांगितले की संपूर्ण सत्राचा उपयोग महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी केला जाईल. त्यांनी आशा व्यक्त केली की आगामी सत्र इथे झालेल्या सकस चर्चा विविध राज्यांच्या विधानसभांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतील.जीएसटी म्हणजे 'ग्रोइंग स्ट्रॉंगर टूगेदर' : पंतप्रधान मोदी
July 17th, 10:40 am
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, जीएसटी म्हणजे 'ग्रोइंग स्ट्रॉंगर टूगेदर', मला आशा आहे की हीच भावना अधिवेशनात कायम राहील.संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांच्या निवेदनाची ठळक वैशिष्टये
July 16th, 03:18 pm
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प सत्र लवकर घेणे आणि जीएसटी सारख्या ऐतिहासिक आर्थिक सुधारणा अंमलात आणण्यासाठी सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व पक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधानांनी, भ्रष्टाचारविरोधी लढाई आणि गो-संरक्षणाच्या नावाखाली जातीय हिंसा मोडून काढण्यासाठी सरकारला पाठिंबा देण्याची सर्व पक्षांना विनंती केली आहे.