पंतप्रधानांनी केले नागरी विकास प्रकल्पाचे उद्घाटन, इंदौरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान
June 23rd, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यातील विविध ठिकाणी नागरी विकास प्रकल्पाचे उदघाटन केले. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, शहरी पेयजल पुरवठा योजना, शहरी घनकचरा व्यवस्थापन, शहरी स्वच्छता, शहरी वाहतूक व शहरी लँडस्केप प्रकल्प या योजनांचा समावेश आहे.मध्य प्रदेशातल्या मोहनपुरा जलसिंचन योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 23rd, 02:04 pm
जून महिन्यातल्या या अतिशय कडक उन्हामध्ये आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहणे म्हणजे माझ्या सर्व सहकारी मंडळींना एकप्रकारे खूप मोठा आशीर्वाद आहे. आपल्या या आदरातिथ्यापुढे मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो. आपली ही ऊर्जा, हाच आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपली सेवा करण्यासाठी नित्य नवी प्रेरणा देत आला आहे.मध्य प्रदेशातील मोहनपुरा सिंचन प्रकल्प पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित
June 23rd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोहनपुरा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. हा प्रकल्प राजगढ जिल्ह्यातील शेत जमिनींना सिंचनाची सुविधा देईल. तसेच या प्रकल्पामुळे या भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविता येईल. पंतप्रधानांनी विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्यासाठी पायाभरणी केली.