पंतप्रधानांच्या युक्रेन दौऱ्याबाबत भारत-युक्रेन संयुक्त निवेदन
August 23rd, 07:00 pm
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी युक्रेनला भेट दिली. दोन्ही देशांमध्ये 1992 साली राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यापासून भारतीय पंतप्रधानांनी युक्रेनला दिलेली ही पहिलीच भेट होती.पंतप्रधानांच्या युक्रेन भेटीदरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या दस्त ऐवजांची सूची (ऑगस्ट 23, 2024)
August 23rd, 06:45 pm
भारत सरकार आणि युक्रेन सरकार यांच्यात कृषी आणि अन्न उद्योग क्षेत्रातील सहकार्य करार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
August 23rd, 06:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची आज कीव येथे भेट घेतली.मेरीनस्की राजप्रासादामध्ये आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्वागत केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी भाषा शिकणाऱ्या युक्रेनियन विद्यार्थ्यांशी साधला संवाद
August 23rd, 06:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कीव येथील स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीजमध्ये हिंदी भाषा शिकणाऱ्या युक्रेनियन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला दिले भीष्म क्यूब्स
August 23rd, 06:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेन सरकारला चार भीष्म (भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हिता आणि मैत्री) क्यूब्स दिले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या मानवतावादी मदतीसाठी पंतप्रधानांचे आभार मानले. हे क्यूब्स जखमींवर त्वरीत उपचार करण्यास मदत करतील आणि मौल्यवान जीव वाचविण्यात योगदान देतील.PM Modi pays homage at Gandhi statue in Kyiv
August 23rd, 03:25 pm
Prime Minister Modi paid homage to Mahatma Gandhi in Kyiv. The PM underscored the timeless relevance of Mahatma Gandhi’s message of peace in building a harmonious society. He noted that the path shown by him offered solutions to present day global challenges.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कीव येथे शहीद बालकांच्या स्मरणार्थ आयोजित मल्टीमीडिया प्रदर्शनाला दिली भेट
August 23rd, 03:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कीव मध्ये युक्रेनच्या राष्ट्रीय इतिहास संग्रहालयात शहीद बालकांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित मल्टीमीडिया प्रदर्शनाला भेट दिली.त्यांच्या समवेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की होते.पंतप्रधान मोदी युक्रेनमध्ये कीव्ह येथे दाखल
August 23rd, 02:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनमधील कीव येथे पोहोचले. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यापासून भारताच्या पंतप्रधानांची युक्रेनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.पोलंड आणि युक्रेन या देशांच्या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
August 21st, 09:07 am
भारत आणि पोलंड दरम्यान असलेल्या राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत असताना माझा हा पोलंड दौरा होत आहे. पोलंड हा देश मध्यवर्ती युरोपातील महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे. लोकशाही आणि बहुपक्षीयता यांच्याप्रती आपली परस्पर कटिबद्धता आपल्या नात्याला अधिक बळ देते. आपली भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मी माझे मित्र पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि राष्ट्रपती आंद्रेज डूडा यांच्या सोबतच्या बैठकींबाबत मी उत्सुक आहे. या दौऱ्यात मी पोलंडमधील उत्साही भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधणार आहे.