पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या भेटी दरम्यान भारत आणि यूएई यांनी काढलेले संयुक्त निवेदन (13-14 फेब्रुवारी, 24)

February 14th, 10:23 pm

संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती, सन्माननीय महोदय , शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 13 फेब्रुवारी 2024 रोजी अबू धाबी येथे भेट झाली. राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यूएईमध्ये स्वागत केले आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुबई येथे जागतिक सरकार शिखर परिषद 2024 मध्ये बोलण्याचे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

यूएईमध्ये अबू धाबी येथे बीएपीएस हिंदू मंदिराच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 14th, 07:16 pm

श्री स्वामी नारायण जय देव, महामहिम शेख नाहयान अल मुबारक, पूज्य महंत स्वामी जी महाराज, भारत, यूएई आणि जगातील विविध देशातून आलेले अतिथीगण आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून या सोहळ्यासोबत जोडले गेलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो!

PM Modi inaugurates BAPS Hindu Mandir in Abu Dhabi, UAE

February 14th, 06:51 pm

Prime Minister Narendra Modi inaugurated the BAPS Hindu Mandir in Abu Dhabi, UAE. The PM along with the Mukhya Mahant of BAPS Hindu Mandir performed all the rituals. The PM termed the Hindu Mandir in Abu Dhabi as a symbol of shared heritage of humanity.

दुबईचे शासक, संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक

February 14th, 03:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुबई येथे संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि दुबईचे शासक महामहिम शेख मोहम्मद बिन राशीद अल मकतूम यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी दुबईमध्ये जेबेल अली येथे भारत मार्टची केली पायाभरणी

February 14th, 03:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी दुबईमध्ये जेबेल अली फ्री ट्रेड झोन येथे डीपी वर्ल्डद्वारे बांधल्या जात असलेल्या भारत मार्टची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 14 फेब्रुवारी 2024 रोजी पायाभरणी केली.

दुबई येथे जागतिक सरकार शिखर परिषद 2024 दरम्यान पंतप्रधानांनी घेतली मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

February 14th, 02:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुबई येथे जागतिक सरकारांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष एंड्री राजोएलिना यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.

जागतिक सरकार शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 14th, 02:30 pm

जागतिक सरकार शिखर परिषदेत मुख्य भाषण देणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.आणि हे भाग्य मला दुसऱ्यांदा मिळत आहे. या निमंत्रणासाठी आणि शानदार स्वागतासाठी मी महामहिम शेख मोहम्मद बिन रशीद जी यांचा खूप खूप आभारी आहे.मी माझे बंधू महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद यांचेही आभार मानतो. अलीकडच्या काळात त्यांना अनेकदा भेटण्याची संधी मला मिळाली. ते केवळ दूरदृष्टी असलेले नेतेच नाहीत तर संकल्प आणि वचनबद्धता दर्शवणारे देखील नेते आहेत.

जागतिक सरकार शिखर परिषद 2024 मध्ये पंतप्रधान सहभागी

February 14th, 02:09 pm

संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि दुबईचे शासक महामहीम शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुबई येथे जागतिक सरकार शिखर परिषदेत सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले. भविष्यातील सरकारांना आकार देणे या परिषदेच्या संकल्पनेवर पंतप्रधानांनी विशेष मुख्य भाषण केले . 2018 मधील जागतिक सरकार शिखर परिषदेला देखील पंतप्रधान सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी या शिखर परिषदेत 10 राष्ट्राध्यक्ष आणि 10 पंतप्रधानांसह 20 जागतिक नेते सहभागी झाले. या जागतिक परिषदेला120 हून अधिक देशांची सरकारे आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

PM Modi arrives in Abu Dhabi, UAE

February 13th, 05:47 pm

Prime Minister Narendra Modi arrived in Abu Dhabi, UAE. He was warmly received by UAE President HH Mohamed bin Zayed Al Nahyan at the airport.

संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाचे केले कौतुक

February 13th, 10:56 am

जगाबरोबरचे भारताचे बंध अधिक दृढ करण्यासाठी भारतीय समुदायाने केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.

संयुक्त अरब अमिराती आणि कतार इथे रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन

February 13th, 10:46 am

मी 13-14 फेब्रुवारी रोजी संयुक्त अरब अमिराती आणि 14-15 फेब्रुवारी रोजी कतारच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहे. हा माझा 2014 नंतरचा संयुक्त अरब अमिरातीचा सातवा आणि कतारचा दुसरा दौरा असेल.

कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांची भेट

December 01st, 09:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएई मधील कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर 2023 रोजी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांची भेट घेतली.

मालदीवच्या अध्यक्षांसोबत पंतप्रधानांची भेट

December 01st, 09:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी, युएई मध्ये सीओपी -28 शिखर परिषदेच्या निमित्ताने मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली.

पंतप्रधानांची फ्रेंच प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतींसोबत भेट

December 01st, 09:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेंच प्रजासत्ताकचे अध्यक्ष महामहीम इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सोबत 1 डिसेंबर 2023 रोजी, दुबईतील कॉप 28 शिखर परिषदेदरम्यान द्विपक्षीय बैठक घेतली.

Prime Minister participates in the COP-28 Presidency’s Session on Transforming Climate Finance

December 01st, 08:39 pm

Prime Minister Shri Narendra Modi participated in the COP-28 Presidency’s Session on Transforming Climate Finance” on 1 December 2023 in Dubai, UAE. The event focussed on making climate finance more available, accessible, and affordable to developing countries.

पंतप्रधानांनी घेतली स्वीडनच्या पंतप्रधानांची भेट

December 01st, 08:32 pm

उल्फ क्रिस्टरसन यांच्या सोबत 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथील कॉप-28 येथे द्विपक्षीय बैठक घेतली.

भारत आणि स्वीडन यांनी कॉप -28 मध्ये उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूषवले सह-यजमानपद

December 01st, 08:29 pm

दुबई येथे कॉप-28 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी संयुक्तपणे 2024-26 या कालावधीसाठी उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे (LeadIT 2.0) उदघाटन केले. भारत आणि स्वीडन यांनी इंडस्ट्री ट्रांझिशन प्लॅटफॉर्मचे देखील उदघाटन केले . हा प्लॅटफॉर्म दोन्ही देशांची सरकारे, उद्योग, तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक आणि विचारवंत यांना एकमेकांशी जोडेल.

कॉप-28 मध्ये भारताने यूएई बरोबर ग्लोबल ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह कार्यक्रमाचे सह-आयोजन केले

December 01st, 08:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासमवेत 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथे कॉप-28 मध्ये 'ग्रीन क्रेडिट प्रोग्राम' (हरित कर्ज कार्यक्रम) या उच्चस्तरीय कार्यक्रमाचे सह-आयोजन केले. या कार्यक्रमात स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन, मोझांबिकचे अध्यक्ष फिलिप न्युसी आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल सहभागी झाले.

कॉप 28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझोग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

December 01st, 06:44 pm

दोन्ही नेत्यांनी सध्या चालू असलेल्या इस्रायल - हमास संघर्षावर विचार विनिमय केला. पंतप्रधानांनी 7 ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि ओलीसांच्या सुटकेचे स्वागत केले.

कॉप-28 मधील सदस्य देशांच्या एचओएस/एचओजीच्या उच्चस्तरीय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले विशेष भाषण

December 01st, 03:55 pm

आपल्यापैकी प्रत्येक देश स्वतःसाठी जी हवामानविषयक उद्दिष्ट्ये निश्चित करत आहे, जी कटिबद्धता दर्शवत आहे ती पूर्ण करुनच दाखवली जातील असा निश्चय आपल्याला करावा लागेल.