पंतप्रधानांचा सिंगापूरमधील व्यावसायिक नेत्यांशी संवाद
September 05th, 04:57 pm
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुंतवणूक निधी, पायाभूत सुविधा, उत्पादन, ऊर्जा, शाश्वतता आणि रसदशास्त्र आदी विविध क्षेत्रांत कार्यरत सिंगापूरमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गटाशी संवाद साधला. सिंगापूरचे उपपंतप्रधान गान किम योंग आणि गृह व कायदे मंत्री के षण्मुगम या कार्यक्रमात सहभागी झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे मानद वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांची भेट घेतली
September 05th, 03:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरमध्ये त्या देशाचे मानद वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांची भेट घेतली.सिंगापूरच्या राष्ट्रपतींसोबत पंतप्रधानांची भेट
September 05th, 03:00 pm
भारत - सिंगापूर भागीदारीसाठी राष्ट्रपती थर्मन यांच्या समर्थनाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. विश्वास, परस्परांचा आदर आणि पूरकतेवर आधारित दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्याची त्यांनी नोंद घेतली. या संदर्भात, त्यांनी नमूद केले की हे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित झाल्यामुळे संयुक्त सहकार्यासाठी पुढे जाण्याचा एक ठोस मार्ग आखला जाईल. प्रगत उत्पादन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये भारत आणि सिंगापूर कशा प्रकारे सहकार्याचा विस्तार करू शकतात यावर त्यांनी विचार सामायिक केले. पुढील वर्षी राष्ट्रपती थर्मन यांचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.पंतप्रधानांची सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री ली सिएन लूंग यांच्यासोबत बैठक
September 05th, 02:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री आणि माजी पंतप्रधान महामहिम ली सिएन लूंग यांची भेट घेतली. यावेळी मंत्री महोदयांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ दुपारच्या भोजनाचे आयोजन केले होते.पंतप्रधानांनी एईएम सिंगापूरला दिली भेट
September 05th, 12:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या समवेत सिंगापूरमधील सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी एईएम ला भेट दिली. यावेळी त्यांना जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीतील एईएम ची भूमिका, तिचे कार्य आणि भारतासाठीच्या योजना यांबाबत माहिती देण्यात आली. सिंगापूर सेमीकंडक्टर उद्योग संघटनेनें सिंगापूरमधील सेमीकंडक्टर परिसंस्थेचा विकास आणि भारताबरोबर सहकार्याच्या संधी याविषयी थोडक्यात माहिती दिली. या क्षेत्रातील सिंगापूरमधील अन्य विविध कंपन्यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. ग्रेटर नोएडा येथे 11-13 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या सेमिकॉन इंडिया प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी सिंगापूरच्या सेमीकंडक्टर कंपन्यांना आमंत्रित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेट
September 05th, 10:22 am
यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही नेत्यांनी भारत-सिंगापूर द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला. द्विपक्षीय संबंधांची व्यापकता आणि सखोलता तसेच अफाट क्षमता लक्षात घेत, त्यांनी हे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला.यामुळे भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणालाही मोठी चालना मिळेल. आर्थिक संबंधांमधील मजबूत प्रगतीचा आढावा घेतल्यावर उभय नेत्यांनी दोन्ही देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीचा ओघ आणखी वाढवण्याचे आवाहन केले. भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे 160 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीसह सिंगापूर हा भारतासाठी एक प्रमुख आर्थिक भागीदार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, भारतातील वेगवान आणि शाश्वत विकासामुळे सिंगापूरच्या कंपन्यांसाठी गुंतवणुकीच्या अफाट संधी खुल्या झाल्या आहेत. त्यांनी संरक्षण आणि सुरक्षा, सागरी क्षेत्रातील सजगता , शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता , फिनटेक, नवीन तंत्रज्ञान क्षेत्र , विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि ज्ञान भागीदारी या क्षेत्रातील विद्यमान सहकार्याचा देखील आढावा घेतला. उभय नेत्यांनी आर्थिक तसेच दोन्ही देशांमधील जनतेमधील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हीटी अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. ग्रीन कॉरिडॉर प्रकल्पांना गती देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 05th, 09:00 am
आपण पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरची आपली ही पहिलीच भेट आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपल्या नेतृत्वाखालील 4G च्या आयोजनाने सिंगापूर आणखी वेगाने प्रगती साधेल, असा मला विश्वास आहे.PM Modi arrives in Singapore
September 04th, 02:00 pm
PM Modi arrived in Singapore. He will hold talks with President Tharman Shanmugaratnam, Prime Minister Lawrence Wong, Senior Minister Lee Hsien Loong and Emeritus Senior Minister Goh Chok Tong.PM Modi meets innovators who won prizes in the first ever Singapore-India Hackathon
November 15th, 11:30 am
PM Narendra Modi met the innovators who won prizes in the first ever Singapore-India Hackathon. They discussed about their extensive research and work with the Prime Minister.PM Modi meets NCC cadets in Singapore
November 15th, 11:22 am
PM Narendra Modi met the NCC cadets who got the opportunity to visit Singapore as a part of a cadet exchange programme. They shared their memorable learnings and experiences with the Prime Minister.PM’s meetings on the sidelines of East Asia Summit in Singapore
November 14th, 12:35 pm
PM Narendra Modi held talks with several world leaders on the margins of the East Asia Summit in Singapore.सिंगापूर इथे फिन टेक महोत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 14th, 10:03 am
सिंगापूर फिन टेक महोत्सवात पहिला शासन प्रमुख म्हणून भाषण देण्याची संधी लाभली हा माझा सन्मान आहे.PM Modi arrives in Singapore
November 14th, 07:26 am
PM Narendra Modi arrived in Singapore where he will attend various multilateral and bilateral meetings. The PM will also deliver the keynote address at the Singapore Fintech Festival.देशभरातील युवा नवोन्मेषी आणि स्टार्ट अप उद्योजकांशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद
June 06th, 11:15 am
देशभरातील युवा नवोन्मेषी आणि स्टार्ट अप उद्योजकांशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. सरकारी योजनांच्या विविध लाभार्थींशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी संवाद साधण्याची ही चौथी वेळ आहे.Social Media Corner 3rd June 2018
June 03rd, 08:35 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!सोशल मीडिया कॉर्नर 2 जून 2018
June 02nd, 07:30 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सिंगापूरमध्ये मोदींनी चांगी आरमार तळाचा दौरा केला
June 02nd, 01:46 pm
पंतप्रधान मोदी यांनी आज सिंगापूर मधील चांगी आरमार तळाचा दौरा केला. दोन्ही देश समुद्री क्षेत्रामध्ये सहकार्य करीत आहेत आणि पंतप्रधानांच्या या आरमार तळाच्या भेटीचा उद्देश भारत-सिंगापूर सामंजस्य संबंधांना बळकट करणे हा होता.पंतप्रधान मोदींनी सिंगापूरमध्ये विविध ठिकाणी पुजास्थानांना भेट दिली
June 02nd, 12:12 pm
पंतप्रधान मोदी यांनी सिंगापूरमध्ये विविध ठिकाणी पुजास्थळांना भेट दिली.पंतप्रधान मोदी यांनी भारतीय वारसा केंद्राला भेट दिली, रुपे कार्ड वापरून मधुबनी पेंटिंग खरेदी केली
June 02nd, 12:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर येथे भारतीय वारसा केंद्राला भेट दिली आणि तेथे लागलेल्या प्रदर्शनाचा दौरा केला. मोदींनी तेथे रुपे कार्ड वापरून मधुबनी पेंटिंग देखील खरेदी केले.पंतप्रधान मोदींची सिंगापूरच्या संरक्षण सचिवांशी भेट
June 02nd, 11:02 am
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे सचिव जेम्स मॅटिस यांच्याशी सिंगापूरमध्ये चर्चा केली.