Social Media Corner 25 June 2017

June 25th, 08:06 pm

Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!

पोर्तुगालमधील लिस्बन येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 24th, 10:27 pm

Prime Minister Narendra Modi, who was on a historic visit to Portugal, met the Indian community in Lisbon, and interacted with them. During his address, Shri Modi highlighted several aspects of the India-Portugal partnership. The Prime Minister spoke about yoga and holistic healthcare and appreciated the role Portugal was playing to further the message of yoga.

पंतप्रधान मोदी यांनी पोर्तुगालमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला

June 24th, 10:26 pm

पंतप्रधान मोदी यांनी पोर्तुगालच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहेत, तिथे त्यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला. त्यांच्या भाषणांत त्यांनी भारत - पोर्तुगाल भागीदारीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

लिस्बन इथल्या शॅम्पलीमोद फाऊंडेशनला पंतप्रधानांची भेट

June 24th, 09:46 pm

लिस्बन इथल्या शॅम्पलीमोद फाऊंडेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान अँटनीयो कोस्टा यांनी संयुक्तपणे भेट दिली. शॅम्पलीमोद फाउंडेशन आणि हैदराबाद इथली प्रसाद इन्स्टिट्यूट यांच्यात परस्पर सामंजस्य असून,शॅम्पलीमोद फाउंडेशन मध्ये येणाऱ्या परदेशी रुग्णांमध्ये भारतातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. पंतप्रधानांनी फाउंडेशनला भेट देऊन भारतीय संशोधकांसमवेत संवाद साधला.

भारत आणि पोर्तुगाल :अंतराळ ते खोल समुद्र अशा व्यापक क्षेत्रात सहकार्य

June 24th, 09:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लिस्बन भेटीत, भारत पोर्तुगाल अंतराळ युती निर्माण करण्याबाबत आणि संशोधन सहकार्य वाढवण्याबाबत सामंजस्य करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या.या करारामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या, पोर्तुगालबरोबर असलेल्या भागीदारीला प्रोत्साहन मिळणार आहे. अटलांटिक आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारणीलाही यामुळे प्रोत्साहन मिळेल.हे केंद्र, ट्रान्स-अटलांटिक साठी संशोधन, नाविन्यपूर्ण कल्पना, आणि ज्ञानाचे तसेच आणि उत्तर-दक्षिण सहकार्याचे केंद्र म्हणून काम करेल. संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय जाळे निर्माण केले जाईल. हवामान,अंतराळआणि सागरी संशोधनाला पोषक अशा वातावरणाची निर्मिती करून त्याला गती देण्याचे यामागचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांच्या हस्ते स्टार्ट अप पोर्टलचे उदघाटन

June 24th, 08:52 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांनी आज भारत-पोर्तुगाल आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप हब चे (आयपीआयएसएच) लिस्बन इथे उदघाटन केले.स्टार्ट अप इंडिया द्वारे पुढाकार घेऊन निर्माण करण्यात आलेल्या या मंचाला वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि स्टार्ट अप पोर्तुगाल यांचे पाठबळ आहे.उद्योजकतेसाठी भागीदारी करण्याच्या दृष्टीने हा मंच निर्माण करण्यात आला आहे.

पोर्तुगालच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांचे प्रेस निवेदन

June 24th, 08:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी व पोर्तुगीज पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी अनेक क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध आणि सहकार्याचा आढावा घेतला. पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, स्टार्ट-अप क्षेत्र हे सहकार्यासाठी एक खूप चांगले ठिकाण आहे. ते समाजासाठी मूल्य आणि संपत्ती निर्मितीचे साधन आहे.” ते पुढे म्हणाले की करव्यवस्था, विज्ञान, युवा व्यवहार, आणि क्रीडा क्षेत्रांत अधिक भागीदारी करण्यासाठी करार करण्यांत आले आहेत.

सोशल मीडिया कॉर्नर 24 जून 2017

June 24th, 08:12 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

पंतप्रधान मोदी पोर्तुगीज पंतप्रधानांना पॅलेसिओ दास नेसेसिडेद्स येथे भेटले

June 24th, 06:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगीज पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. दोन्ही नेते पॅलासीआ दास नेवेसिडेड येथे भेटले आणि भारत-पोर्तुगाल संबंध आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी यांचे पोर्तुगालमध्ये आगमन

June 24th, 05:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोर्तुगालमध्ये लिस्बन इथे आगमन झाले. हा त्यांच्या तीन राष्ट्रांच्या दौऱ्याचा पहिला भाग आहे. पंतप्रधान, पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांना भेटतील आणि विविध क्षेत्रांत असलेले भारत पोर्तुगाल संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने द्विपक्षीय वाटाघाटी करतील.

पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड्स देशांच्या आगामी भेटीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे निवेदन

June 23rd, 07:25 pm

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी उद्या शनिवारी पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड्स या तीन देशांच्या दौऱ्यावर असून विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या उद्देश्याने ही भेट असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.