पंतप्रधानांची ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर बैठक

May 21st, 09:49 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष महामहीम लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची 21 मे 2023 रोजी हिरोशिमा इथे भेट घेतली.

Prime Minister’s visit to the Hiroshima Peace Memorial Museum

May 21st, 07:58 am

Prime Minister Shri Narendra Modi joined other leaders at G-7 Summit in Hiroshima to visit the Peace Memorial Museum. Prime Minister signed the visitor’s book in the Museum. The leaders also paid floral tributes at the Cenotaph for the victims of the Atomic Bomb.

जपानच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

May 20th, 08:16 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा येथील जी -7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांच्यासमवेत 20 मे 2023 रोजी द्विपक्षीय बैठक घेतली.

पंतप्रधानांनी हिरोशिमा येथे महात्मा गांधींजींच्या अर्धपुतळ्याचे केले अनावरण

May 20th, 08:12 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2023 रोजी जपानमधील हिरोशिमा येथे महात्मा गांधींजींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले.

PM Modi arrives in Hiroshima, Japan

May 19th, 05:23 pm

Prime Minister Narendra Modi arrived in Hiroshima, Japan. He will attend the G7 Summit as well hold bilateral meetings with PM Kishida of Japan and other world leaders.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना पंतप्रधान उपस्थित

September 27th, 04:34 pm

टोक्यो येथील निप्पॉन बुडोकान येथे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना 20 हून अधिक देश /सरकारांच्या प्रमुखांसह 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

जपानच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी केलेले भाषण

September 27th, 12:57 pm

या दु:खद प्रसंगी आपण सर्व आज भेटत आहोत. आज जपानमध्ये पोहोचल्यावर मला तीव्र दु:ख झाले. मी गेल्या वेळी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा आबे सान यांच्यासोबत दीर्घकाळ संभाषण केले होते. त्यावेळी इथून परत जाताना ‘ते आपल्यातून कायमचे निघून गेले’ अशी बातमी ऐकावी लागेल असे मला कधीही वाटले नव्हते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जापानच्या पंतप्रधानांसोबत भेट

September 27th, 09:54 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान माननीय फुमियो किशिदा यांची आज त्यांच्या जपान दौऱ्यादरम्यान भेट घेतली. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. भारत आणि जापान यांच्यातील भागीदारी बळकट करण्यासाठी तसेच मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेत दिवंगत पंतप्रधान आबे यांच्या योगदानाचा पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

PM Modi arrives in Tokyo, Japan

September 27th, 03:49 am

Prime Minister Narendra Modi arrived in Tokyo, Japan. He will attend the State Funeral ceremony of former Japanese PM Shinzo Abe.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जपानच्या पंतप्रधानांसोबत बैठक

May 24th, 06:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यात आज द्विपक्षीय बैठक झाली. पंतप्रधान किशिदा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी भोजन समारंभ देखील आयोजित केला होता. विविध मुद्यांवर तसेच काही प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

अमेरिकेच्या राष्ट्राध्‍यक्षांबरोबर झालेल्या व्दिपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले प्रारंभीचे निवेदन

May 24th, 05:29 pm

श्रीयुत राष्ट्राध्‍यक्ष, तुम्हाला भेटून नेहमीच खूप आनंद होतो. आज आपण दोघे आणखी एका सकारात्मक आणि उपयुक्त क्वाड शिखर परिषदेमध्‍येही सहभागी झालो.

समृद्धीसाठी हिंद-प्रशांत आर्थिक मंचासंबंधी निवेदन

May 24th, 03:47 pm

आम्ही, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, दारूस्सलाम, इं‍डोनेशिया, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मलेशिया, न्यूझीलंड, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड, अमेरिका आणि व्हिएतनाम हे हिंद- प्रशांत क्षेत्रातले देश आमच्या वाढत्या क्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील समृदधता आणि विविधता मान्य करतो. आम्ही मुक्त, खुल्या आणि निष्पक्ष,सर्वसमावेशक, परस्परांना जोडलेल्या, लवचिक, सुरक्षित आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी वचनबद्ध आहोत. ज्यामध्‍ये शाश्‍वत आणि सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी साध्‍य करण्‍याची क्षमता आहे. आम्हाला माहिती आहे की, या क्षेत्रातल्या आमच्या आर्थिक धोरणाचे हितसंबंध एकमेकांमध्‍ये गुंतलेले आहेत. त्याचबरोबर भागीदारांमधील आर्थिक कटिबद्धता वाढवणे हे निरंतर वाढ, शांतता आणि समृदधीसाठी महत्‍वाचे आहे.

क्वाड संयुक्त नेत्यांचे निवेदन

May 24th, 02:55 pm

आज, आम्ही – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन - सर्वसमावेशक आणि लवचिक अशा मुक्त आणि खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी आमच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यासाठी टोक्यो येथे बैठक घेत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जपान-इंडिया असोसिएशन (जेआयए) बरोबर बैठक

May 24th, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 24 मे, 2022 रोजी जपानचे माजी पंतप्रधान योशिरो मारी आणि शिंजो आबे यांची जपानमध्‍ये टोकियो येथे भेट घेतली. योशिरो मोरी हे जपान-इंडिया असोसिएशन (जेआयए)चे विद्यमान अध्‍यक्ष आहेत. तर शिंजो आबे लवकरच या असोसिएशनचे अध्‍यक्षपद स्वीकारणार आहेत. जेआयएची स्थापना 1903 मध्‍ये झाली आहे. जेआयए ही जपानमधील सर्वात जुन्या मैत्री संघटनांपैकी एक आहे.

जपानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा, यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

May 24th, 01:30 pm

जपानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आज दिनांक 24 मे 2022 रोजी टोकियो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट

May 24th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्‍यामध्‍ये आज व्दिपक्षीय बैठक झाली. टोक्यो येथे आयोजित क्वाड सदस्य देशांच्या शिखर परिषदेनिमित्‍त आलेल्या नेत्यांबरोबर पंतप्रधान मोदी यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत बैठक

May 24th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडन यांच्यात आज, 24 मे 2022 रोजी टोक्यो इथे, अत्यंत सौहार्दपूर्ण आणि फलदायी बैठक झाली. या बैठकीतून जे भक्कम फलित आलेले आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील द्वीपक्षीय भागीदारी अधिक घट्ट आणि गतिमान होण्यास मदत होईल.

क्वाड सदस्य राष्‍ट्रनेत्यांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

May 24th, 07:01 am

पंतप्रधान किशिदा, आपण केलेल्‍या शानदार आदराति‍थ्‍याबद्दल तुमचे खूप खूप आभार! आज टोकियोमध्‍ये मित्रांबरोबर असणे, माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्‍ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्वाड सदस्य राष्‍ट्रनेत्यांच्या शिखर परिषदेत सहभाग

May 24th, 07:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मे 2022 रोजी जपानमधील टोकियो इथे झालेल्या दुसऱ्या प्रत्यक्ष स्वरूपातल्या क्वाड सदस्य राष्‍ट्रनेत्यांच्या शिखर परिषदेत जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह भाग घेतला. या नेत्यांमध्ये झालेली ही चौथी बैठक असून याआधी मार्च 2021 मध्ये झालेल्या पहिल्या आभासी बैठकीनंतर, सप्टेंबर 2021 मध्ये वॉशिंग्टन डी.सी येथील शिखर परिषद आणि मार्च 2022 मध्ये त्यांच्यात आभासी संवाद झाला होता.

जपानमधील भारतीय समुदायाशी पंतप्रधानांचा संवाद

May 23rd, 08:19 pm

तुम्ही इथे राहत आहात, अनेकजण इथे स्थायिक झाले आहेत. मला माहित आहे, अनेकांनी इथेच लग्न देखील केले आहे. आणि ते योग्यही आहे, कित्येक वर्षे इथे राहिल्यानंतर देखील भारताप्रति तुमची श्रद्धा , भारताबद्दल चांगले वृत्त ऐकल्यानंतर तुमच्या आनंदाला पारावार राहत नाही. होते ना असे? आणि कधी एखादी वाईट बातमी आली तर सर्वात जास्त दुःख देखील तुम्हालाच होते. हे आपल्या लोकांचे वैशिष्ट्य आहे की आपण आपल्या कर्मभूमीशी तनामनाने जोडले जातो, अथक परिश्रम करतो, मात्र मातृभूमीप्रति जे प्रेम आहे ते कधी कमी होऊ देत नाही, आणि हेच आपले सर्वात मोठे सामर्थ्य आहे.