पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांच्यात आज झाली बैठक

June 25th, 08:33 pm

इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज 25 जून 2023 रोजी इजिप्त मध्ये कैरो इथल्या अल इत्तीहादिया राजवाड्यात स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ऑर्डर ऑफ नाईल' सन्मान प्रदान

June 25th, 08:29 pm

इजिप्तची राजधानी कैरोच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात आज 25 जून 2023 रोजी, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इजिप्तचा सर्वोच्च नागरी पुरस्कार , ऑर्डर ऑफ नाईल प्रदान करत त्यांचा सन्मान केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कैरो येथील हेलिओपोलीस युद्ध स्मारकाला दिली भेट

June 25th, 04:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इजिप्त दौऱ्यादरम्यान कैरो येथील हेलिओपोलीस राष्ट्रकुल युद्ध स्मारकाला भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अल हकीम मशिदीला भेट

June 25th, 04:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इजिप्त दौऱ्यादरम्यान, कैरो इथल्या अल हकीम मशिदीला भेट दिली. इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तू विभागाचे मंत्री डॉ. मुस्तफा वझीरी यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी बोहरा समाजाच्या नेत्यांचीही भेट घेतली. ह्या समुदायाचे लोक या फातीमिद काळातील शिया मशिदीचे व्यवस्थापन आणि देखभाल करत आहेत. यावेळी, पंतप्रधानांनी भारत आणि इजिप्तमधील लोकांदरम्यान असलेले दृढ संबंध अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी हसन अल्लम होल्डिंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हसन अल्लम यांची भेट घेतली

June 25th, 05:22 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कैरो इथे 24 जून 2023 रोजी मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकी क्षेत्रात कार्यरत असलेल्या इजिप्तच्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक हसन अल्लम होल्डिंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हसन अल्लम यांची भेट घेतली.

पंतप्रधान मोदी आणि इजिप्तचे प्रमुख योग प्रशिक्षक रीम जाबक आणि नाडा एडेल यांची भेट

June 25th, 05:21 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 जून 2023 रोजी कैरो येथे इजिप्तचे दोन प्रमुख युवा योग प्रशिक्षक रीम जाबक आणि नाडा एडेल यांची भेट घेतली.

इजिप्तचे सुप्रसिद्ध लेखक आणि पेट्रोलियम रणनितीकार तारेक हेग्गी यांची पंतप्रधानांनी भेट घेतली

June 25th, 05:20 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कैरो इथे 24 जून 2023 रोजी इजिप्तचे सुप्रसिद्ध लेखक आणि पेट्रोलियम रणनितीकार तारेक हेग्गी यांची भेट घेतली.

इजिप्तचे ग्रँड मुफ्ती यांच्यासोबत पंतप्रधानांची बैठक

June 25th, 05:18 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्त दौऱ्यादरम्यान 24 जून 2023 रोजी इजिप्तचे ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अल्लम यांची भेट घेतली.

इजिप्तमधील भारतीय समुदायाबरोबर पंतप्रधानांचा संवाद

June 25th, 05:16 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 जून 2023 रोजी कैरो इथे इजिप्त दौऱ्यादरम्यान भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला.

इजिप्तच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील इजिप्शियन मंत्रिमंडळाच्या "इंडिया युनिट" समवेत पंतप्रधानांची बैठक

June 25th, 05:13 am

इजिप्त मधील कैरो येथे 24 जून 2023 रोजी आगमन झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इजिप्तच्या मंत्रिमंडळातील इंडिया युनिट समवेत एक बैठक झाली. प्रजासत्ताक दिन 2023 साठी भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला भारताला भेट दिल्यानंतर या इंडिया युनिटची स्थापना करण्यात आली. इंडिया युनिटचे नेतृत्व इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबौली करत आहेत आणि त्यात अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे.

Prime Minister Modi arrives in Cairo, Egypt

June 24th, 06:30 pm

Prime Minister Narendra Modi arrived in Cairo, Egypt a short while ago. In a special gesture he was received by the Prime Minister of Egypt at the airport. PM Modi was given a ceremonial welcome upon arrival.

अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन

June 20th, 07:00 am

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन आणि फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून मी अमेरिकेच्या औपचारिक भेटीवर जात आहे. हे विशेष आमंत्रण उभय लोकशाहीमधील भागीदारीतील मजबूती आणि चैतन्य यांचे प्रतिबिंब आहे.