दुसरी भारत-नॉर्डिक शिखर परिषद
May 04th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन, आईसलँडच्या पंतप्रधान कतरिन जोकोब्सदोतीर, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गेर स्टोर, स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालिना अँडरसन आणि फिनलँडच्या पंतप्रधान सॅना मरीन यांच्यासह दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले.डेन्मार्कची राणी मार्गरेट II यांनी पंतप्रधानांचे केले स्वागत
May 04th, 08:05 am
डेन्मार्कच्या राणी मार्गरेट द्वितीय यांनी आज कोपनहेगन येथील ऐतिहासिक अमालीनबोर्ग पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.कोपनहेगन येथील भारतीय समुदायांशी पंतप्रधानांचा संवाद
May 03rd, 09:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांच्यासह कोपनहेगन येथील बेल्ला केंद्र येथे भारतीय समुदायाला संबोधित करून त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थी, संशोधक,विविध व्यावसायिक आणि व्यापार क्षेत्रातील भारतीय समुदायाचे एक हजारहून अधिक सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.भारत-डेन्मार्क बिझनेस फोरममध्ये पंतप्रधान मोदींनी घेतला सहभाग
May 03rd, 07:40 pm
कोपनहेगन येथे भारत-डेन्मार्क बिझनेस फोरममध्ये पंतप्रधान मोदींनी व्यवसाय क्षेत्रातील अग्रणींना संबोधित केले. आपल्या भाषणात, पंतप्रधान म्हणाले, आजकाल FOMO किंवा 'गमावण्याची भीती' ही संज्ञा सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. भारतातील सुधारणा आणि गुंतवणुकीच्या संधी पाहता, मी असे म्हणू शकतो की जे लोक आपल्या देशात गुंतवणूक करत नाहीत. ते नक्कीच चांगली संधी चुकवत आहेत.डेन्मार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यमांना दिलेले निवेदन
May 03rd, 07:11 pm
आपले आणि आपल्या चमूला हार्दिक धन्यवाद! आपल्या या सुंदर देशाला मी पहिल्यांदाच भेट देत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारतामध्ये आपले स्वागत करण्याची संधी मला प्राप्त झाली होती. या दोन्ही दौर्यांमुळे आपण आपले संबंध अधिक घनिष्ठ बनवून त्यांना गती देऊ शकलो. आपल्या दोन्ही देशात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि कायद्याचे राज्य यासारखी सामायिक मुल्ये आहेत. त्याचबरोबर आपल्या दोन्ही देशांमध्ये अनेक पूरक बलस्थानेही आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डेन्मार्कच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक
May 03rd, 06:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.India–Denmark Joint Statement during the Visit of Prime Minister to Denmark
May 03rd, 05:16 pm
PM Modi and PM Frederiksen held extensive talks in Copenhagen. The two leaders noted with satisfaction the progress made in various areas since the visit of PM Frederiksen to India in October 2021 especially in the sectors of renewable energy, health, shipping, and water. They emphasized the importance of India- EU Strategic Partnership and reaffirmed their commitment to further strengthen this partnership.डेन्मार्कमध्ये कोपनहेगन येथे पंतप्रधान मोदींचे सहर्ष स्वागत
May 03rd, 02:48 pm
तीन युरोपीय देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्कमध्ये कोपनहेगन येथे पोहोचले. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिकसन यांनी विमानतळावर स्वतः उपस्थित राहून या विशेष कृतीने पंतप्रधान मोदींचे खास स्वागत केले.