पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिडनी इथे व्यावसायिकांच्या गोलमेज परिषदेत संबोधन
May 24th, 04:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनी इथे ऑस्ट्रेलियातील प्रमुख कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांच्या गोलमेज परिषदेला संबोधित केले. या बैठकीला, पोलाद, बँकिंग, ऊर्जा, खनिज आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच, ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या विद्यापीठांचे कुलगुरु देखील या बैठकीला उपस्थित होते.ऑस्ट्रेलियाच्या विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
May 24th, 02:48 pm
ऑस्ट्रेलियाचे विरोधी पक्षनेते पीटर डटन यांनी 24 मे 2023 रोजी सिडनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांच्यात द्विपक्षीय बैठक
May 24th, 10:03 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मे 2023 रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनाचा मराठी अनुवाद
May 24th, 06:41 am
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे जे आदरातिथ्य झाले त्याबद्दल आणि आम्हाला मिळालेल्या आदराबद्दल मी ऑस्ट्रेलियातील जनतेचे आणि पंतप्रधान अल्बानीज यांचे मनापासून आभार मानतो. माझे मित्र पंतप्रधान अल्बानीज भारत भेटीवर येऊन गेल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच मी ऑस्ट्रेलियाला आलो आहे.गेल्या एका वर्षातली आमची ही सहावी भेट आहे.ऑस्ट्रेलियातील सिडनी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 23rd, 08:54 pm
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि माझे प्रिय मित्र अँथनी अल्बनीज, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान मान्यवर स्कॉट मॉरिसन, न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर क्रिस मिन्स, परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, दूरसंवाद मंत्री मिशेल रोलेन्ड, ऊर्जा मंत्री क्रिस बोवेन, विरोधी पक्षनेते पीटर डटन, परराष्ट्र उपमंत्री टीम वॉट्स, न्यू साउथ वेल्सच्या मंत्रिमंडळाचे उपस्थित आदरणीय सदस्य, पॅरामाटाचे संसद सदस्य डॉ अँड्रू चार्लटन, येथे उपस्थित असलेले ऑस्ट्रेलियाचे सर्व संसद सदस्य, महापौर, उप महापौर, कौन्सिलर्स आणि ऑस्ट्रेलियात राहत असलेले आणि मोठ्या संख्येने उपस्थित अनिवासी भारतीय, आपणा सर्वांना माझा नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भारतीय समुदायाबरोबर साधला संवाद
May 23rd, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आज (23 मे, 2023) भारतीय समुदायाबरोबर संवाद साधला. सिडनीमधील कुडोस बँक एरिना भागात झालेल्या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते.ऑस्ट्रेलियातील प्रमुख व्यक्तींसोबत पंतप्रधानांची बैठक
May 23rd, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिडनी येथे स्वतंत्र बैठकांमध्ये ऑस्ट्रेलियातील अनेक प्रमुख व्यक्तींची भेट घेतली. यामध्ये खालील व्यक्तींचा समावेश होता:हँकॉक प्रॉस्पेक्टिंग ग्रुप, रॉय हिल, एस. किडमन अँड कंपनीच्या कार्यकारी अध्यक्ष जीना राइनहार्ट एओ यांच्याशी पंतप्रधानांची झाली भेट
May 23rd, 09:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मे 2023 रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे हँकॉक प्रॉस्पेक्टिंग ग्रुप, रॉय हिल, एस. किडमन या कंपन्यांच्या कार्यकारी अध्यक्ष जीना राइनहार्ट एओ यांची भेट घेतली.ऑस्ट्रेलियनसुपरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल श्रोडर आणि पंतप्रधानांची झाली भेट
May 23rd, 09:01 am
परकीय गुंतवणुकीसाठी जगातील सर्वात पसंतीची प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि ऑस्ट्रेलियनसुपरला भारतासोबत काम करण्यासाठी आमंत्रित केले.फोर्टेस्क्यू मेटल्स ग्रुप आणि फोर्टेस्क्यू फ्युचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. अँड्र्यू फॉरेस्ट यांच्याशी पंतप्रधानांची भेट
May 23rd, 08:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 23 मे 2023 रोजी ऑस्ट्रेलियात सिडनी येथे ऑस्ट्रेलियातील आघाडीचे उद्योगपती आणि फोर्टेस्क्यू मेटल्स ग्रुप आणि फोर्टेस्क्यू फ्युचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. अँड्र्यू फॉरेस्ट यांची भेट घेतली.PM Modi arrives in Sydney, Australia
May 22nd, 05:43 pm
After the historic visit to Papua New Guinea, PM Modi arrived in Sydney, Australia for a bilateral visit. During the two-day visit, PM Modi will hold talks with the Prime Minister of Australia H.E Anthony Albanese, and other leaders. He will also address the community program hosted and attended by the members of the Indian diaspora at the Qudos Bank Arena in Sydney, Australiaजपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
May 19th, 08:38 am
जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांच्या आमंत्रणावरुन मी जपानच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी-7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जपानमधील हिरोशिमा येथे जाण्यासाठी निघणार आहे. भारत-जपान शिखर परिषेदच्या निमित्ताने पंतप्रधान नुकतेच भारत भेटीसाठी येऊन गेले, तेव्हा झालेल्या भेटीनंतर लगेचच पुन्हा त्यांची भेट घेणे अत्यंत आनंददायी आहे. भारताकडे या वर्षी जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असल्यामुळे, जी-7 शिखर परिषदेतील माझी उपस्थिती अधिक अर्थपूर्ण ठरणार आहे. जगासमोर सध्या उभी असलेली आव्हाने आणि त्यांच्यावर सामूहिकपणे मात करण्याची गरज यासंदर्भात जी-7 सदस्य राष्ट्रे तसेच इतर निमंत्रित भागीदार यांच्यासोबत विचारांची देवाणघेवाण करण्यास मी उत्सुक आहे. हिरोशिमा जी-7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या काही नेत्यांशी मी द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहे.