गयानामधल्या भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 22nd, 03:02 am
आपणा सर्वांसमवेत इथे उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. आपल्यासमवेत इथे उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रपती इरफान अली यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. इथे दाखल झाल्यापासून मला दिलेला स्नेह आणि आपुलकी यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपती अली यांनी आपल्या निवासस्थानी केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा स्नेह आणि आपुलकी यासाठीही मी आभारी आहे. आदरातिथ्य हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, गेले दोन दिवस मी याचा अनुभव घेत आहे. राष्ट्रपती अली आणि त्यांच्या आजीसमवेत आम्ही वृक्षारोपणही केले. ‘एक पेड मां के नाम’ म्हणजेच आईसाठी वृक्षारोपण या आमच्या उपक्रमाचा हा भाग आहे. हा भावनिक क्षण माझ्या नेहमीच स्मरणात राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील भारतीय समुदायाला केले संबोधित
November 22nd, 03:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित कार्यक्रमात आज तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. गयानाचे राष्ट्रपती डॉ.इरफान आली. पंतप्रधान मार्क फिलिप्स, उपराष्ट्रपती भारत जगदेव, माजी राष्ट्रपती डोनाल्ड रमोतार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी गयानामध्ये आल्यावर विशेष स्नेहासह त्यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी गयानाच्या राष्ट्रपतींचे आभार मानून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय यांनी व्यक्त केलेला स्नेह आणि दयाळूपणा याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.“आदरातिथ्याचे तत्व आपल्या संस्कृतीच्या हृदयस्थानी आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.भारत सरकारने सुरु केलेल्या ‘एक वृक्ष मातेसाठी’या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती आणि त्यांच्या आजी यांच्यासह एक रोपटे लावल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. हा एका अत्यंत भावनिक क्षण होता आणि तो आपल्या कायम स्मरणात राहील असे नोदी पुढे म्हणाले.For us, the whole world is one family: PM Modi in Nigeria
November 17th, 07:20 pm
PM Modi, addressing the Indian diaspora in Abuja, Nigeria, celebrated India's global progress, highlighting achievements in space, manufacturing, and defense. He praised the Indian community's contributions to Nigeria's development and emphasized India's role as a global leader in welfare, innovation, and peace, with a vision for a Viksit Bharat by 2047.PM Modi addresses Indian community in Nigeria
November 17th, 07:15 pm
PM Modi, addressing the Indian diaspora in Abuja, Nigeria, celebrated India's global progress, highlighting achievements in space, manufacturing, and defense. He praised the Indian community's contributions to Nigeria's development and emphasized India's role as a global leader in welfare, innovation, and peace, with a vision for a Viksit Bharat by 2047.हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप परिषद 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 16th, 10:15 am
100 वर्षांपूर्वी पूज्य बापूंनी हिंदुस्तान टाईम्सचे उद्घाटन केले होते ... ते गुजराती भाषक होते आणि 100 वर्षांनतर दुसऱ्या गुजराती व्यक्तीला आपण बोलावले आहे. या ऐतिहासिक प्रवासासाठी हिंदुस्तान टाईम्स आणि 100 वर्षांच्या या प्रवासात जे-जे लोक सहभागी आहेत, ज्यांनी-ज्यांनी संघर्ष केला, संकटे झेलत टिकून राहिले .. ते सर्व अभिनंदनाला पात्र आहेत. 100 वर्षांचा प्रवास फार प्रदीर्घ असतो.यासाठी आपण सर्व अभिनंदनाला पात्र आहात, भविष्यासाठीही माझ्याकडून आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. आता मी आलो तेव्हा या कुटुंबातल्या लोकांना भेटता तर आलेच त्याचबरोबर 100 वर्षांचा हा प्रवास दर्शवणारे एक उत्तम प्रदर्शनही पाहण्याची संधी मला मिळाली. आपल्याकडे थोडा वेळ असेल तर या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या असे मी आपल्याला सुचवेन. हे केवळ एक प्रदर्शन नव्हे तर हा एक अनुभव आहे. 100 वर्षांचा इतिहासच आपण पाहतो आहोत असे वाटले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचे आणि संविधान लागू झाले त्या दिवसाचे वृत्तपत्र मी पाहिले. एकाहून एक थोर, दिग्गजांचे लेख हिंदुस्तान टाईम्समध्ये असत.मार्टिन ल्युथर किंग,नेताजी सुभाष बाबू,डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर एम एस स्वामिनाथन. या सर्वांच्या लेखांनी आपल्या वर्तमानपत्राची कीर्ती वृद्धिंगत केली.खरोखरच एक प्रदीर्घ प्रवास करून आपण इथे पोहोचलो आहोत. स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या आशा- आकांक्षांच्या हिंदोळ्यावरून आपण आगेकूच केली आहे. हा प्रवास अभूतपूर्व आणि अद्भुतही आहे. ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर प्रत्येक देशवासीयाचा त्यावेळचा उत्साह मला आपल्या वृत्तपत्राच्या बातमीतून जाणवला.त्याचवेळी ठाम निर्णयाअभावी 7 दशकांपर्यंत काश्मीर हिंसाचारात कसे होरपळत राहिले हेसुद्धा जाणवले. आज आपल्या वर्तमानपत्रात जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या विक्रमी मतदानाच्या बातम्या छापल्या जातात हा विरोधाभास आहे. एका आणखी दिवसाचे वर्तमानपत्र,प्रत्येकाचे तिथे लक्ष जाईल. त्यामध्ये एकीकडे आसामला अशांत क्षेत्र म्हणून जाहीर केल्याची बातमी होती तर दुसरीकडे अटल जी यांच्याकडून भाजपचा पाया घातल्याची बातमी होती.आज आसाममध्ये स्थायी शांतता स्थापन करण्यामध्ये भाजपा मोठी भूमिका बजावत आहे हा किती सुखद योगायोग आहे.कालच बोडो भागातल्या लोकांसमवेत एका शानदार कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि दिल्लीमधल्या माध्यमांनी या मोठ्या घटनेकडे दुर्लक्ष केले याचे मला आश्चर्य वाटते.5 दशकांनंतर बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुल यांचा त्याग करत, हिंसेचा मार्ग नाकारून दिल्लीच्या हृदयस्थानी बोडोचे युवक सांस्कृतिक उत्सव साजरा करत आहेत ही इतिहासातली मोठी घटना आहे याचा त्यांना अंदाज नाही. मी काळ तिथे होतो. मनापासून मला ते जाणवत होते. बोडो शांतता करारामुळे या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. प्रदर्शनादरम्यान मुंबईवरच्या 26/11 च्या हल्ल्यावरच्या वृत्तांकडे माझे लक्ष गेले.शेजारी देशाच्या दहशतवादी कारवायांमुळे आपली जनता स्वतःच्याच घरात आणि शहरात असुरक्षित होती असा तो काळ होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, आता ते दहशतवादीच त्यांच्या घरात सुरक्षित नाहीत.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट 2024 ला केले संबोधित
November 16th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे हिंदुस्थान टाइम्स नेतृत्व शिखर परिषद 2024 ला (Hindustan Times Leadership Summit 2024) संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या हस्ते हिंदुस्थान टाईम्सच्या प्रवासाची सुरूवात झाली असल्याची घटना आपल्या संबोधनात नमूद केली आणि हिंदुस्थान टाईम्सच्या 100 वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासाबद्दल आणि प्रारंभापासून या संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींचे अभिनंदनही केले. यावेळी पंतप्रधानांनी या सर्वांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी आयोजनस्थळी उभारलेल्या हिंदुस्थान टाईम्सच्या प्रदर्शनालाही भेट दिली. या प्रदर्शनाला भेट देणे हा समृद्ध करणारा अनुभव असल्याची भावना व्यक्त करत, सर्व प्रतिनिधींनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि राज्यघटना लागू झाली तेव्हाची जुनी वर्तमानपत्रं आपण पाहिली असल्याचा अनुभवही त्यांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मार्टिन ल्युथर किंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. एम. एस. स्वामीनाथन अशा अनेक दिग्गजांनी हिंदुस्थान टाईम्ससाठी लेख लिहिले असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. हिंदुस्थान टाईम्सचा प्रवास प्रचंड प्रदीर्घ आहे, हा प्रवास स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे, आणि त्याचवेळी स्वातंत्र्योत्तर काळात आशेच्या दिशेने वाटचाल करणारा हा प्रदीर्घ प्रवास अभूतपूर्व आणि आश्चर्यकारक आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 1947 सालच्या ऑक्टोबर महिन्यात आपणही इतर नागरिकांप्रमाणेच काश्मीर भारतात विलीन झाल्याची बातमी वाचली होती, आणि ही बातमी वाचून आपला इतरांप्रमाणे प्रचंड उत्साह वाटला होता हा अनुभवही पंतप्रधानांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मात्र अनिर्णयकी वृत्तीमुळे काश्मीर सात दशके हिंसाचाराच्या विळख्यात सापडले असल्याची जाणिवही आपल्याला त्या क्षणाने करून दिली होती असेही त्यांनी सांगितले. पण आजच्या स्थितीत जम्मू - काश्मीरमधील निवडणुकीत विक्रमी प्रमाणात मतदान झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत, आणि ही आनंदाची बाब आहे असे ते म्हणाले. एकदा एका वर्तमानपत्रात एका बाजूला आसामला अशांत क्षेत्र घोषित केल्याची बातमी छापलेली होती, तर दुसऱ्या बाजुला अटलजींनी भारतीय जनता पक्षाची पायाभरणी केल्याची बातमी छापलेली बातमी आपण पाहिल्याचा अनुभवही पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांसोबत सामायिक केला. याच अनुभवाचा संदर्भ देत आज भाजपा आसाममध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे आणि हा मनाला शांती देणारा योगायोग आहे असे ते म्हणाले.आज जगभरातील लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
October 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.कौटिल्य अर्थशास्त्र परिषद 2024 च्या तिसऱ्या वर्षीच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 04th, 07:45 pm
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आर्थिक विकास संस्थेचे अध्यक्ष एन.के. सिंग, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून आलेले इतर मान्यवर, आणि उपस्थित सभ्य स्त्री-पुरुषहो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे तिसऱ्या कौटिल्य आर्थिक परिषदेला केले संबोधित
October 04th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित तिसऱ्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या कार्यक्रमाला संबोधित केले. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या भागीदारीसह आर्थिक विकास संस्थेने आयोजित केलेल्या या कौटिल्य आर्थिक परिषदेत, इतर अनेक मुद्द्यांसह, हरित स्थित्यंतराला वित्तपुरवठा, भूआर्थिक विखंडन आणि वृद्धीसाठीचे परिणाम यांसारख्या संकल्पनांवर आणि लवचिकता कायम राखण्यासाठी धोरणात्मक कृतीची तत्वे, यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.JMM & Congress are running a marathon of scams in Jharkhand: PM Modi in Hazaribagh
October 02nd, 04:15 pm
Prime Minister Narendra Modi today addressed an enthusiastic crowd in Hazaribagh, Jharkhand. Kickstarting his address, PM Modi said, On this Gandhi Jayanti, I feel fortunate to be here. In 1925, Mahatma Gandhi visited Hazaribagh during the freedom struggle. Bapu's teachings are integral to our commitments. I pay tribute to Bapu. PM Modi highlighted the launch of the Dharti Aaba Janjatiya Gram Utkarsh Abhiyan, aimed at ensuring that every tribal family benefits from government schemes.PM Modi addresses the Parivartan Mahasabha in Hazaribagh, Jharkhand
October 02nd, 04:00 pm
Prime Minister Narendra Modi today addressed an enthusiastic crowd in Hazaribagh, Jharkhand. Kickstarting his address, PM Modi said, On this Gandhi Jayanti, I feel fortunate to be here. In 1925, Mahatma Gandhi visited Hazaribagh during the freedom struggle. Bapu's teachings are integral to our commitments. I pay tribute to Bapu. PM Modi highlighted the launch of the Dharti Aaba Janjatiya Gram Utkarsh Abhiyan, aimed at ensuring that every tribal family benefits from government schemes.Voting for Congress means putting Haryana's stability and development at risk: PM Modi in Sonipat
September 25th, 12:48 pm
Initiating his speech at the Sonipat mega rally, PM Modi said, “As election day approaches, the Congress party is visibly weakening, struggling to maintain momentum, in stark contrast, the BJP is gaining widespread support throughout Haryana.” “The growing enthusiasm for the BJP is evident, with the people rallying behind the slogan – Phir Ek Baar, BJP Sarkar,” he further added.PM Modi addresses a massive gathering in Sonipat, Haryana
September 25th, 12:00 pm
Initiating his speech at the Sonipat mega rally, PM Modi said, “As election day approaches, the Congress party is visibly weakening, struggling to maintain momentum, in stark contrast, the BJP is gaining widespread support throughout Haryana.” “The growing enthusiasm for the BJP is evident, with the people rallying behind the slogan – Phir Ek Baar, BJP Sarkar,” he further added.पंतप्रधानांनी न्यूयॉर्क, अमेरिकेमधील भारतीय समुदायाला उद्देशून केलेले भाषण
September 22nd, 10:00 pm
नमस्कार अमेरिका, आता आपले नमस्ते देखील बहुराष्ट्रीय बनले आहे, स्थानिक ते जागतिक, आणि हे सर्व तुम्ही केले आहे. भारताला हृदयात ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाने ते केले आहे.पंतप्रधानांनी न्यूयॉर्कमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
September 22nd, 09:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये लाँग आयलंड येथे, एका कार्यक्रमात भारतीय समुदायाच्या भव्य मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमाला 15,000 हून अधिक लोक उपस्थित होते.78 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले
August 15th, 03:04 pm
त्यांच्या संबोधनातील काही ठळक मुद्दे:78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
August 15th, 01:09 pm
आज अत्यंत शुभ क्षण आहे, ज्या वेळी आपण देशासाठी बलिदान देणाऱ्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या, आयुष्यभर त्यासाठी संघर्ष करणाऱ्या, फाशीच्या तख्तावर ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देणाऱ्या, असंख्य स्वातंत्र्य प्रेमींना वंदन करण्याचा हा उत्सव आहे, त्यांचे पुण्यस्मरण करण्याचा हा प्रसंग आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी आज आपल्याला ह्या प्रसंगी स्वातंत्र्यासह श्वास घेण्याचे भाग्य दिले आहे. हा देश त्यांचा ऋणी आहे. अशा प्रत्येक महान व्यक्तीप्रती आपण श्रद्धेची भावना व्यक्त करूया.भारतात साजरा झालेला 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा
August 15th, 07:30 am
पंतप्रधान मोदींनी 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या आपल्या भाषणात भारताच्या भविष्याबद्दलच्या व्हिजनची रुपरेषा मांडली. 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यापासून ते धर्मनिरपेक्ष नागरी संहिता अंमलात आणण्यापर्यंतच्या मुद्द्यांसह भारताची सामूहिक प्रगती आणि प्रत्येक नागरिकाचे सक्षमीकरण यावर पंतप्रधान मोदींनी प्रकर्षाने भर दिला. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा नव्या जोमाने सुरू ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. नवोन्मेष, शिक्षण आणि जागतिक नेतृत्व या गोष्टी केंद्रस्थानी ठेवल्यास 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनण्यापासून काहीही रोखू शकत नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प पश्चात भारतीय उद्योग महासंघाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या परिषदेला केलेले संबोधन
July 30th, 03:44 pm
सीआयआय चे अध्यक्ष संजीव पुरी जी, येथे उपस्थित असलेले सर्व उद्योग क्षेत्रातील दिग्गज सहकारी, वरिष्ठ मुत्सद्दी, दूरदृश्य प्रणालीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेले उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!भारतीय उद्योग महासंघाने (सीसीआय) ने आयोजित केलेल्या ‘विकसित भारताकडे वाटचाल’ या परिषदेच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
July 30th, 01:44 pm
नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे सीसीआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल’ या संकल्पनेवर आयोजित केलेल्या परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.अलीकडेच 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आयोजित या परिषदेचा उद्देश विकासाबद्दलच्या सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाची रूपरेषा आणि उद्योगाची भूमिका मांडणे हा होता.