पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 आणि 15 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीत होणाऱ्या मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे भूषवणार अध्यक्षस्थान
December 13th, 12:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 आणि 15 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीत आयोजित मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांमधील भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असेल.It is our commitment that the youth of the country should get maximum employment: PM Modi at Rozgar Mela
October 29th, 11:00 am
PM Modi addressed the Rozgar Mela and distributed more than 51,000 appointment letters to newly appointed youth in Government departments and organizations. Citing the Pradhan Mantri Internship Yojana, PM Modi said provisions are made for paid internships in the top 500 companies of India, where every intern would be given Rs 5,000 per month for one year. He added the Government’s target is to ensure one crore youth get internship opportunities in the next 5 years.PM Narendra Modi addresses Rozgar Mela
October 29th, 10:30 am
PM Modi addressed the Rozgar Mela and distributed more than 51,000 appointment letters to newly appointed youth in Government departments and organizations. Citing the Pradhan Mantri Internship Yojana, PM Modi said provisions are made for paid internships in the top 500 companies of India, where every intern would be given Rs 5,000 per month for one year. He added the Government’s target is to ensure one crore youth get internship opportunities in the next 5 years.पंतप्रधानांच्या हस्ते ‘कर्मयोगी सप्ताह’ - राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ
October 19th, 06:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे ‘कर्मयोगी सप्ताह’ – राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ केला.'कर्मयोगी सप्ताह' या राष्ट्रीय अध्ययन सप्ताहाचा 19 ऑक्टोबर पासून पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
October 18th, 11:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्ली येथील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, येथून 'कर्मयोगी सप्ताह' या राष्ट्रीय अध्ययन सप्ताहाचा शुभारंभ करतील.रोजगार मेळाव्या अंतर्गत एक लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांच्या वितरणावेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 12th, 11:00 am
आज 1 लाखांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. तुम्ही तुमच्या कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. मी तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन करतो. भारत सरकारमध्ये तरुणांना नोकऱ्या देण्याचे अभियान वेगाने सुरू आहे. पूर्वीच्या सरकारांमध्ये, नोकरीची जाहिरात जारी करण्यापासून ते नियुक्ती पत्र देण्यापर्यंत खूप वेळ लागत असे. या विलंबाचा फायदा घेत, त्या काळात लाचखोरीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात सुरू होते. आम्ही आता भारत सरकारमधील भरतीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक केली आहे. इतकेच नाही तर भरती प्रक्रिया निर्धारित वेळेतच पूर्ण व्हावी यावर सरकारचा खूप भर आहे. यामुळे प्रत्येक तरुणाला त्याची योग्यता सिद्ध करण्याची समान संधी मिळू लागली आहे. आज प्रत्येक तरुणाच्या मनात असा विश्वास आहे की तो कठोर परिश्रम आणि त्याच्या प्रतिभेच्या जोरावर आपले स्थान निर्माण करू शकतो. 2014 पासून युवकांना भारत सरकारशी जोडण्याचा आणि त्यांना राष्ट्र उभारणीत भागीदार बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागील सरकारने 10 वर्षांत जितक्या नोकऱ्या दिल्या, भाजपा सरकारने 10 वर्षांत त्याच्या सुमारे दीडपट जास्त सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. आज दिल्लीत एकात्मिक प्रशिक्षण संकुलाचीही पायाभरणी करण्यात आली आहे. मला विश्वास आहे की नवीन प्रशिक्षण संकुल आमच्या क्षमता निर्मितीच्या उपक्रमाला आणखी बळकटी देईल.सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या एक लाखांपेक्षा जास्त नियुक्तांना पंतप्रधानांकडून रोजगार मेळ्यांतर्गत नियुक्तीपत्रांचे वितरण
February 12th, 10:30 am
सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या एक लाखांपेक्षा जास्त नियुक्तांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. त्यांनी नवी दिल्लीत कर्मयोगी भवनच्या एकात्मिक संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे भूमीपूजन देखील केले. हे संकुल मिशन कर्मयोगीच्या विविध स्तंभांदरम्यान सहकार्य आणि सुसंवादाला प्रोत्साहन देईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्या अंतर्गत, विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना 1 लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांचे करणार वितरण
February 11th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना 1 लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वितरण करणार आहेत.राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अमली पदार्थ प्रतिबंधन अकादमी एनएसीआईएनच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन
January 16th, 04:00 pm
आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर जी, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी निर्मला सीतारामन जी, पंकज चौधरी जी, भागवत किशनराव कराड जी, अन्य लोकप्रतिनिधी, आणि बंधू-भगिनींनो,आंध्र प्रदेशच्या श्री सत्य साई जिल्ह्यात, पालसमुद्रम इथे, राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ प्रतिबंधनच्या राष्ट्रीय अकादमीच्या नव्या परिसराचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
January 16th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील पालसमुद्रम इथे, राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ प्रतिबंधनाच्या राष्ट्रीय अकादमीच्या नव्या परिसराचे उद्घाटन केले. त्यानंतर, त्यांनी, इथे लावलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली. भारतीय महसूल सेवेच्या(सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) 74 आणि 75 व्या तुकडीशी तसेच भूतानच्या रॉयल नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशीही पंतप्रधानांनी यावेळी संवाद साधला.रोजगार मेळाव्याअंतर्गत 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांच्या वितरणावेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 30th, 04:30 pm
देशातील कोट्यवधी तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे अभियान अविरत सुरू आहे. आज 50 हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. हे नियुक्तीपत्र तुमच्या मेहनतीचे आणि प्रतिभेचे फळ आहे. मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन करतो. आता तुम्ही राष्ट्र उभारणीच्या प्रवाहात सामील होणार आहात, जो थेट लोकांशी संबंधित आहे. भारत सरकारचे कर्मचारी म्हणून तुम्हाला सर्वांना खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. तुम्ही कोणत्याही पदावर असाल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, देशबांधवांचे जीवनमान सुलभ करणे हे तुमचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित
November 30th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि नवनियुक्त कर्मचाऱ्यांना सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वाटप केले. देशभरातून निवडलेले हे कर्मचारी महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, वित्तीय सेवा विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि कामगार आणि रोजगार मंत्रालय, यासह सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये रुजू होतील.रोजगार मेळावा अंतर्गत पंतप्रधान 30 नोव्हेंबर रोजी सरकारी विभाग आणि इतर संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या 51,000 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करणार
November 28th, 05:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप करतील.यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधित करणार आहेत.जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनालेमध्ये पंतप्रधानांनी केले भाषण
September 26th, 04:12 pm
दोन आठवड्यांपूर्वी याच भारत मंडपमध्ये जोरदार घडामोडी घडत होत्या. हे भारत मंडपम एकदम ‘हॅपनिंग’ ठिकाण होते आणि मला आनंद आहे की आज माझा भावी भारत त्याच भारत मंडपमध्ये उपस्थित आहे. जी-20 च्या आयोजनाला भारताने ज्या उंचीवर नेले आहे ते पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.पण तुम्हाला माहीत आहे की , मी अजिबात थक्क नाही ,मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.कदाचित तुमच्या मनात असेल की इतके मोठे आयोजन झाले तुम्ही खुश नाही , काय कारण आहे ? माहीत आहे का ? कारण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी घेतात , तरुणाईचा यात सहभाग असेल तर तो यशस्वी होणार हे निश्चित असते. .जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनालेला पंतप्रधानांनी केले संबोधित
September 26th, 04:11 pm
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनाले कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम देशातल्या तरुणांना भारताच्या जी 20 अध्यक्षपदाबाबत माहिती देण्यासाठी आणि जी 20 च्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला. पंतप्रधानांनी या प्रसंगी 4 प्रकाशनांचे : The Grand Success of G20 Bharat Presidency: Visionary Leadership, Inclusive Approach (भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे भव्य यश: दूरदर्शी नेतृत्व, सर्वसमावेशक दृष्टिकोन;), India's G20 Presidency: Vasudhaiva Kutumbakam (भारताचे जी 20 अध्यक्षपद: वसुधैव कुटुंबकम; ) , Compendium of G20 University Connect Programme (जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट कार्यक्रमाचे संकलन); आणि Showcasing Indian Culture at G20 (जी 20 मध्ये भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन) यांचे अनावरण केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला केलेले संबोधन
September 26th, 11:04 am
आजच्या रोजगार मेळाव्यात ज्या उमेदवारांना सरकारी सेवेची नियुक्तीपत्र मिळाली आहेत, त्या सर्वांचे खूप - खूप अभिनंदन.कठोर मेहनती नंतर आपणाला हे यश प्राप्त झाले आहे.लाखो उमेदवारांमधुन आपली निवड झाली आहे म्हणूनच या यशाचे आपल्या जीवनात मोठे महत्व आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळ्याला केले संबोधित
September 26th, 10:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत रोजगार मेळ्यांतर्गत नवनियुक्त उमेदवारांना सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वितरण केले आणि उमेदवारांना संबोधितही केले. देशभरातून निवडले गेलेले कर्मचारी टपाल विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये सरकारी सेवेत रुजू होणार आहेत. देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळे आयोजित करण्यात आले आहेत.रोजगार मेळ्याअंतर्गत, पंतप्रधान 26 सप्टेंबर रोजी सरकारी विभाग आणि संस्थांमधील नवनियुक्त उमेदवारांना सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे करणार वितरण
September 25th, 02:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत नवनियुक्त उमेदवारांना सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वितरण करणार आहेत. यावेळी पंतप्रधान या उमेदवारांना संबोधितही करणार आहेत.यशोभुमी राष्ट्राला समर्पित करताना आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मराठीत अनुवादीत मजकूर
September 17th, 06:08 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे या भव्य वास्तुत आलेले माझे प्रिय बंधू-भगिनी, देशातील 70 होऊन जास्त शहरांतील माझे सर्व सहकारी, अन्य मान्यवर आणि माझ्या कुटुंबियांनो.पंतप्रधानांनी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर-‘यशोभूमी’च्या पहिल्या टप्प्याचे नवी दिल्लीमध्ये केले लोकार्पण
September 17th, 12:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये द्वारका येथे इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर-‘यशोभूमी’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. यशोभूमीमध्ये एक अतिशय भव्य परिषद केंद्र, विविध प्रदर्शन दालने आणि इतर सुविधांचा अंतर्भाव आहे. पंतप्रधानांनी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने आज पीएम विश्वकर्मा योजनेचा देखील शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा बोधचिन्ह, ‘सम्मान, सामर्थ्य, समृद्धी’ या घोषवाक्याचे आणि पोर्टलचे देखील पंतप्रधानांनी उद्घाटन केले. कस्टमाईज्ड स्टँप शीट आणि टूलकिट बुकलेटचे देखील पंतप्रधानांनी यावेळी प्रकाशन केले. पंतप्रधानांनी 18 लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्रांचे वितरण केले. कार्यक्रमस्थळी उपस्थित झाल्यावर पंतप्रधानांनी गुरु शिष्य परंपरा आणि नवे तंत्रज्ञान या प्रदर्शनाची फेरफटका मारून पाहणी केली. त्यांनी यशोभूमीच्या त्रिमितीय प्रतिकृतीची देखील पाहणी केली. त्यापूर्वी पंतप्रधानांनी दिल्ली विमानतळ मेट्रो एक्स्प्रेस लाईनच्या द्वारका सेक्टर 21 ते यशोभूमी द्वारका सेक्टर 25 या नव्या मेट्रो स्थानकापर्यंतच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन केले.