राजस्थानातील पोखरण येथे ‘एक्सरसाइज भारत शक्ती’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 12th, 02:15 pm
राजस्थानचे मुख्यमंत्री श्रीमान भजनलाल जी शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंह जी, गजेंद्र शेखावत जी, कैलाश चौधरी जी, पीएसए प्राध्यापक अजय सूद जी, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, वरिष्ठ अधिकारीवर्ग, तिन्ही सेनेतील सर्व शूर वीर.... आणि इथे उपस्थित असलेले पोखरणच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो !राजस्थानातील पोखरण येथे 'भारत शक्ती "या तिन्ही सैन्यदलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेचांच्या सराव कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी
March 12th, 01:45 pm
इथे आज दिसलेले शौर्य आणि कौशल्य हे नव्या भारताची हाक आहे. “आज पुन्हा एकदा पोखरण भारताच्या आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि त्याच्या वैभवाच्या त्रिवेणीचे साक्षीदार बनले आहे”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे तेच पोखरण आहे ज्याने भारताची अणुचाचणी पाहिली आणि आज आपण स्वदेशीकरणाच्या सामर्थ्याचे साक्षीदार झालो आहोत असे ते पुढे म्हणाले.स्वदेशात विकसित झालेल्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची मल्टिपल इंडिपेंडेंटली टारगेटेबल रिएंट्री वेईकल (MIRV) या तंत्रज्ञांनासह पहिली उड्डाण चाचणी म्हणजे 'मिशन दिव्यास्त्र'चे पंतप्रधानांनी केले कौतुक
March 11th, 06:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वदेशात विकसित झालेल्या अग्नी 5 या क्षेपणास्त्राचे मल्टिपल इंडिपेंडंटली टारगेटेबल रिएंट्री वेईकल तंत्रज्ञानासह पहिले यशस्वी उड्डाण असलेल्या ‘मिशन दिव्यास्त्र’ साठी संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले.