देशात झालेल्या विक्रमी वायू निर्मितीबद्दल पंतप्रधानांनी केले नागरिकांचे अभिनंदन
August 04th, 09:28 pm
वायू उत्पादन क्षेत्रात देशाने आत्मनिर्भरतेच्या (स्वावलंबनाच्या) दिशेने नवीन विक्रम केल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचे अभिनंदन केले आहे. विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता अत्यंत महत्त्वाची असल्याचे मोदी म्हणाले.मध्य प्रदेशात बिना येथे केली 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
September 14th, 12:15 pm
बुंदेलखंडची ही धरती वीरांची धरती आहे, शूरवीरांची धरती आहे. या भूमीला बीना आणि बेतवा, दोन्हींचा आशीर्वाद मिळाला आहे. आणि मला तर एक महिन्यात दुसऱ्यांदा, सागरला येऊन आपणा सर्वांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. आणि मी शिवराज जींच्या सरकारचे अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो कारण आज इथे येऊन, आपणा सर्वांचे दर्शन घेण्याची संधी दिली. मागच्या वेळी मी संत रोहिदासजींच्या त्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना भेटायला आलो होतो. आज मला मध्य प्रदेशचा विकास आणि त्या विकासाला नवी गती देणाऱ्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याची संधी मिळत आहे. हे प्रकल्प, या क्षेत्राच्या औद्योगिक विकासाला नवी गती देतील. या प्रकल्पांवर केंद्र सरकार 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार आहे. तुम्ही कल्पना करू शकता, पन्नास हजार कोटी किती असतात? आपल्या देशातल्या अनेक राज्यांचा पर्ण वर्षाचा अर्थसंकल्प देखील इतका नसतो, जितका खर्च आज एकाच कार्यक्रमासाठी भारत सरकार करत आहे. यातून हे दिसून येते की मध्य प्रदेशसाठी आमचे संकल्प किती मोठे आहेत. हे सगळे प्रकल्प येणाऱ्या काळात मध्य प्रदेश मध्ये लाखो तरुणांना रोजगार देतील. हे प्रकल्प, गरीब आणि मध्यमवर्गातल्या कुटुंबांची स्वप्न सत्यात उतरवणारे आहेत. मी बीना रिफायनरीचे विस्तारीकरण आणि अनेक नव्या सुविधांच्या भूमिपूजनाच्या मध्य प्रदेशच्या कोट्यवधी जनतेला अनेक अनेक शुभेच्छा देतो.पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात बिना येथे केली 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी
September 14th, 11:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात बिना येथे 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बिना रिफायनरीमधील 49,000 कोटी रुपयांच्या खर्चाने तयार होणारे पेट्रोकेमिकल संकुल, नर्मदापुरम येथे पॉवर अँड रिन्युएबल एनर्जी झोन’, इंदूरमध्ये दोन आयटी पार्क आणि रतलाम येथे मेगा इंडस्ट्रियल पार्क आणि मध्य प्रदेशात सहा नवी औद्योगिक क्षेत्रे यांचा समावेश होता.देशातील सहकार चळवळ बळकट करून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
February 15th, 03:49 pm
देशातील सहकार चळवळीला बळकटी देऊन ती तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठीच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालयाने मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या विविध योजनांच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून ‘संपूर्ण-सरकार’ दृष्टिकोनाचा लाभ घेत, प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) नसलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये व्यवहार्य प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्ध सहकारी संस्था नसलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत/गावात व्यवहार्य दुग्ध सहकारी संस्था आणि प्रत्येक समुद्रकिनाऱ्यांलगतच्या पंचायत/गावात व्यवहार्य मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी तसेच मोठे जलस्रोत असलेल्या ग्रामपंचायत/गावात आणि विद्यमान प्राथमिक कृषी पतसंस्था/दुग्धव्यवसाय/मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी योजना तयार केली आहे. सुरुवातीला, पुढील पाच वर्षांत 2 लाख प्राथमिक कृषी पतसंस्था / दुग्धव्यवसाय/ मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन केल्या जातील. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नाबार्ड, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) आणि राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ (एनएफडीबी) च्या माध्यमातून कृती आराखडा तयार केला जाईल.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 39 वी प्रगती बैठक
November 24th, 07:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयसीटी आधारित प्रगती या मल्टी -मोडल मंचाची 39 वी बैठक पार पडली. केंद्र आणि राज्य सरकारांचा यात समावेश असून प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी हा यामागचा उद्देश आहे.5 जूनला असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार
June 04th, 07:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला 5 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरसंवाद पद्धतीने संबोधित करतील.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ही 36 वी पायाभूत सुविधाविषयक बैठक संपन्न
February 24th, 07:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘प्रगती’ बैठकीचे 36 वे सत्र संपन्न झाले.पंतप्रधान 17 फेब्रुवारीला तामिळनाडूतील इंधन व वायू क्षेत्रातील महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी व राष्ट्रार्पण करणार
February 15th, 08:42 pm
पंतप्रधान तामिळनाडूतील इंधन व वायू क्षेत्रातील महत्वाच्या प्रकल्पाची पायाभरणी व राष्ट्रार्पण 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4.30 वाजता दूरस्थ पद्धतीने करणार आहेत. पंतप्रधान यावेळी रामनाथपुरम-थुथूकुडी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा नैसर्गीक वायू पाईपलाईन व गॅसोलाईन डिसल्फरायझेशन युनिट, मनाली हे राष्ट्राला अर्पण करतील. तसेच नागपट्टीनम कावेरी बेसिन रिफायनरी प्रकल्पाची पायाभरणी देखील करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या 8व्या दीक्षांत समारंभामध्ये केलेले भाषण
November 21st, 11:06 am
पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या 8व्या दीक्षांत समारंभानिमित्त आपल्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! जे मित्र आज पदवीधर होत आहेत, त्यांना आणि त्यांच्या माता-पित्यांना खूप-खूप शुभेच्छा! आज देशाला आपल्यासारखे ‘उद्योग सज्ज पदवीधर’ मिळत आहेत. आपले अभिनंदन, आपण घेतलेल्या परिश्रमासाठी, आपण या विद्यापीठामध्ये जे शिकले आहे, त्यासाठीही शुभेच्छा. राष्ट्रनिर्माणाचे जे मोठे लक्ष्य समोर ठेवून आपण इथून प्रस्थान करणार आहात , यशोशिखर गाठण्याच्या या नवीन प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा !!पंतप्रधानांच्या आभासी उपस्थितीमध्ये गुजरातमधल्या गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाचा 8वा दीक्षांत समारंभ
November 21st, 11:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीमध्ये गुजरातमधल्या गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाचा 8 वा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मोनोक्रिस्टलाइन सौर ऊर्जा निर्मितीच्या 45 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचा, त्याचबरोबर जल तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्राचा शिलान्यास करण्यात आला. याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते विद्यापीठातल्या ‘इनोव्हेशन आणि इनक्यूबेशन सेंटर- टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेशन’, ‘भाषांतर संशोधन केंद्र’ आणि क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात आले.पंतप्रधानांनी प्रमुख तेल आणि वायू कंपन्यांच्या सीईओंशी साधला संवाद
October 26th, 11:24 pm
नीति आयोग आणि पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आयोजित केलेल्या वार्षिक कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख तेल आणि गॅस कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी जागतिक तेल आणि वायू कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून भारत ऊर्जा मंचाचे करणार उद्घाटन
October 23rd, 09:37 pm
नीती आयोग आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीने आयोजित वार्षिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर 2020 रोजी संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जागतिक तेल आणि वायू कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्रातील तीन प्रमुख प्रकल्प 13 सप्टेंबर रोजी राष्ट्राला समर्पित करणार
September 11th, 06:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्रातील तीन प्रमुख प्रकल्प 13 सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात पॅराद्वीप-हल्दीया-दुर्गापूर पाईपलाईन विस्तार प्रकल्पाचा दुर्गापूर-बांका विभाग आणि दोन एलपीजी बॉटलिंग प्रकल्प आहेत. हे प्रकल्प पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत असलेल्या इंडियन ऑईल आणि एचपीसीएल या दोन पीएसयुकडून या प्रकल्पांचे संचलन केले जात आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांची याप्रसंगी उपस्थित असणार आहे.Cabinet approves extension of time limit for availing the benefits of "Pradhan Mantri Garib Kalyan Yojana" for Ujjwala beneficiaries by three months w.e.f. 01.07.2020
July 08th, 07:06 pm
The Union Cabinet chaired by the Prime Minister, Shri Narendra Modi has approved the proposal of Ministry of Petroleum & Natural Gas for extension of time limit by three months w.e.f. 01.07.2020 for availing the benefits of “Pradhan Mantri Garib Kalyan Yojana for Ujjwala beneficiariesPM reviews situation of Oil Well Blow Out and fire in Assam
June 18th, 08:57 pm
PM Modi reviewed the situation arising out of oil well blow out in Tinsukia district, Assam. The PM assured the people of Assam that Government of India is fully committed to providing support and relief and rehabilitation to the affected families.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ही 32 वी पायाभूत सुविधाविषयक बैठक संपन्न
January 22nd, 05:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्ष 2020 मधील पहिली प्रगती बैठक झाली. प्रगती म्हणजेच कार्यक्षम प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणीसाठी आयसीटी आधारित बहुस्तरीय व्यासपीठ या बैठकीचे हे 32 वे सत्र होते. यात केंद्र आणि राज्य सरकार यांचा समावेश असतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिनांक 11 फेब्रुवारी रोजी पेट्रो टेक 2019 चे उद्घाटन
February 10th, 12:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 11 फेब्रुवारी 2019 ला भारतीय एक्सपो सेंटर ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे पेट्रो टेक 2019 चे उद्घाटन करतील तसेच ते उद्घाटन समारंभाला संबोधित करतील.उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
February 13th, 07:03 pm
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 100 हून अधिक लाभार्थ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.सोशल मिडिया कॉर्नर 23 ऑक्टोबर 2017
October 23rd, 07:05 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!पंतप्रधानांच्या हस्ते वडोदरा येथे विकास प्रकल्पांचा शुभारंभ
October 22nd, 05:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा येथे एका जनसभेत वडोदरा सिटी कमांड नियंत्रण केंद्र, वाघोडीया प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि बँक ऑफ बडोद्याची नवी मुख्यालय इमारत राष्ट्राला समर्पित केली.