पंतप्रधानांच्या व्हिएन्टिन, लाओ पीडीआर दौऱ्यादरम्यान (ऑक्टोबर 10 -11, 2024) करण्यात आलेल्या करार/सामंजस्य करारांची यादी

October 11th, 12:39 pm

भारताचे संरक्षण मंत्रालय आणि लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय यांच्यात संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार

भारत आणि मालदीव: सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षाविषयक भागीदारीसाठी दृष्टिकोन

October 07th, 02:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्झू यांनी आज, 7 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा व्यापक आढावा घेतला.दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणात मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या या देशांतील ऐतिहासिक घनिष्ठ आणि विशेष संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीची देखील त्यांनी नोंद घेतली.

BJP is emphasizing the true social empowerment of Dalits and OBC: PM Modi in Patiala, Punjab

May 23rd, 05:00 pm

Ahead of the impending Lok Sabha elections in 2024, Prime Minister Narendra Modi addressed a powerful rally amid a passionate welcome by the people of Patiala, Punjab. PM Modi began his address by paying rich tributes to the land of ‘Guru Tegh Bahadur.’ He said, “After the five phases of voting, the message of the people of India resonates with ‘Fir ek Baar, Modi Sarkar’.” He urged Punjab to vote for the BJP to ensure a ‘Viksit Bharat.’

पंजाबच्या पतियाळा येथे झालेल्या विराट सभेवेळी पंतप्रधान मोदींचे उत्स्फूर्त स्वागत

May 23rd, 04:30 pm

सध्या होत असलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर, पतियाळा येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जोरदार सभेवेळी पंजाबमधील लोकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. 'गुरू तेग बहादूर' यांच्या भूमीला विनम्र अभिवादन करून पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, मतदानाचे पाच टप्पे पार पडल्यानंतर, 'फिर एक बार, मोदी सरकार'च्या भारतीय जनतेच्या संदेशाचे प्रतिध्वनी दुमदुमत आहेत. 'विकसित भारताचे' ध्येय साध्य करण्यासाठी पंजाबच्या जनतेने भाजपला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.

राजस्थानातील पोखरण येथे ‘एक्सरसाइज भारत शक्ती’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 12th, 02:15 pm

राजस्थानचे मुख्यमंत्री श्रीमान भजनलाल जी शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंह जी, गजेंद्र शेखावत जी, कैलाश चौधरी जी, पीएसए प्राध्यापक अजय सूद जी, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, वरिष्ठ अधिकारीवर्ग, तिन्ही सेनेतील सर्व शूर वीर.... आणि इथे उपस्थित असलेले पोखरणच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो !

राजस्थानातील पोखरण येथे 'भारत शक्ती "या तिन्ही सैन्यदलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेचांच्या सराव कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी

March 12th, 01:45 pm

इथे आज दिसलेले शौर्य आणि कौशल्य हे नव्या भारताची हाक आहे. “आज पुन्हा एकदा पोखरण भारताच्या आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि त्याच्या वैभवाच्या त्रिवेणीचे साक्षीदार बनले आहे”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे तेच पोखरण आहे ज्याने भारताची अणुचाचणी पाहिली आणि आज आपण स्वदेशीकरणाच्या सामर्थ्याचे साक्षीदार झालो आहोत असे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्या अंतर्गत, विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना 1 लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांचे करणार वितरण

February 11th, 03:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना 1 लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वितरण करणार आहेत.

संरक्षण मंत्रालयाने धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या 928 लाइन रिप्लेसमेंट युनिट्स /उप-प्रणाली/सुटे भाग तसेच इतर घटकांच्या चौथ्या सकारात्मक स्वदेशीकरण सूचीला मंजुरी दिली

May 16th, 09:40 am

संरक्षण मंत्रालयाने धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या 928 लाइन रिप्लेसमेंट युनिट्स /उप-प्रणाली/सुटे भाग तसेच इतर घटकांच्या चौथ्या सकारात्मक स्वदेशीकरण सूचीला मंजुरी दिली असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका ट्विट द्वारे दिली आहे. यामध्ये उच्च दर्जाची सामुग्री आणि सुटे भाग यांचा समावेश असून त्याचे आयात प्रतिस्थापन मूल्य 715 कोटी रुपये एवढे आहे.

बंगळूरू इथे एरो इंडिया 2023 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 13th, 09:40 am

आजच्या या महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित कर्नाटकचे राज्यपाल, मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, मंत्रिमंडळातले माझे सहकारी,देश-विदेशातून आलेले संरक्षण मंत्री,उद्योग क्षेत्रातले सन्माननीय प्रतिनिधी, अन्य मान्यवर, बंधू आणि भगिनींनो !

पंतप्रधानांच्या हस्ते एरो इंडिया 2023 कार्यक्रमाच्या 14 व्या भागाचे उद्‌घाटन

February 13th, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरूमधील येलाहांका येथील हवाई दलाच्या तळावर एरो इंडिया 2023 या कार्यक्रमाच्या 14 च्या भागाचे उद्घाटन केले. “अब्जावधी संधींकडे नेणारी धावपट्टी” ही या वर्षीच्या एरो इंडिया 2023 कार्यक्रमाची संकल्पना असून या कार्यक्रमात 100 परदेशी आणि 700 भारतीय कंपन्यांसह जगभरातील 80 हून अधिक देशांचा सहभाग असणार आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमात स्वदेशी बनावटीची सामग्री आणि स्वदेशी तंत्रज्ञान यांचे सादरीकरण तसेच परदेशी कंपन्यांशी भागीदारीचा प्रयत्न यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्यात होणार आभासी माध्यमातून संवाद

April 10th, 09:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्यात 11 एप्रिल 2022 रोजी आभासी माध्यमातून बैठक होणार आहे. दक्षिण आशियातील अलीकडील घडामोडी, हिंद - प्रशांत क्षेत्र आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांसंदर्भात सुरु असलेल्या द्विपक्षीय सहकार्याचा उभय नेते आढावा घेतील आणि विचारविनिमय करतील. द्विपक्षीय व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने,ही आभासी बैठक दोन्ही देशांची नियमित आणि उच्च-स्तरीय प्रतिबद्धता सुरू ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

पीएम - किसान योजनेच्या आर्थिक लाभाचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 01st, 12:31 pm

उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर व्यक्ती, सर्वात पहिले मी माता वैष्णो देवी परिसरात झालेल्या दुःखद घटनेविषयी शोक व्यक्त करतो. चेंगराचेंगरीत ज्यांनी आपले जवळचे लोक गमावले, जे जखमी झाले आहेत, त्यांच्याप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. केंद्र सरकार जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हाजींशी देखील माझं बोलणं झालं आहे. मदत कार्य सुरु आहे, जखमींच्या उपचाराची संपूर्ण काळजी घेतली जात आहे.

पंतप्रधानांकडून पीएम-किसानचा दहावा हप्ता जारी

January 01st, 12:30 pm

तळागळातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या संकल्पाने आणि सातत्यपूर्ण बांधिलकीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(पीएम- किसान) योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा दहावा हप्ता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जारी केला. यामुळे सुमारे 10 कोटींपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या खात्यात 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. यावेळी पंतप्रधानांनी 351 एफपीओ अर्थात कृषी उत्पादक संघटनांना 14 कोटी रुपयांहून अधिक रक्कमही हस्तांतरित केली. यामुळे 1.24 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी काही कृषी उत्पादक संघटनांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, कृषीमंत्री आणि विविध राज्यांमधील शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उत्तर प्रदेशातील झाशी येथे 'राष्ट्र रक्षा समर्पण पर्व' मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 19th, 05:39 pm

जौन धरती पै हमाई रानी लक्ष्मीबाई जू ने, आजादी के लाने, अपनो सबई न्योछार कर दओ, वा धरती के बासियन खों हमाऔ हाथ जोड़ के परनाम पौंचे। झाँसी ने तो आजादी की अलख जगाई हती। इतै की माटी के कन कन में, बीरता और देस प्रेम बसो है। झाँसी की वीरांगना रानी लक्ष्मी बाई जू को, हमाओ कोटि कोटि नमन।

उत्तर प्रदेशातील झाशी येथे ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ला पंतप्रधानांची उपस्थिती

November 19th, 05:38 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथे ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ला उपस्थिती दर्शवली. झाशी किल्ल्याच्या परिसरात आयोजित ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ या भव्य समारंभात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्रालयाच्या अनेक नवीन उपक्रमांचे राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माजी छात्र संघटनेचा शुभारंभ, या संघटनेत पंतप्रधानांनी पहिले सदस्य म्हणून नोंदणी केली ; यासह एनसीसी छात्रांसाठी सदृशीकरण प्रशिक्षणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा शुभारंभ; राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्मा वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभारलेला मंडप ; राष्ट्रीय युद्ध स्मारक मोबाईल अॅप; भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आरेखन आणि विकसित केलेले अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट 'शक्ती'; हलके लढाऊ हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांचा समावेश आहे. उत्तरप्रदेश संरक्षण औद्योगिक मार्गिकेच्या झाशी नोड येथे भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या 400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केली.

सात नव्या संरक्षण कंपन्यांच्या राष्ट्रार्पण समारंभात पंतप्रधानांचे भाषण

October 15th, 12:05 pm

देशाच्या संरक्षणाशी संबंधित या महत्वपूर्ण कार्यक्रमात आपल्याबरोबर सहभागी झालेले देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह , संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, संरक्षण मंत्रालयाचे सर्व अधिकारी आणि देशभरातून सहभागी झालेले सर्व सहकारी,

विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर 7 नव्या संरक्षण कंपन्यांच्या लोकार्पण समारंभातील पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले संबोधित

October 15th, 12:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण मंत्रालयाने योजित केलेल्या सात नव्या कंपन्यांच्या लोकार्पण सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सात नव्या संरक्षण कंपन्यांच्या राष्ट्रार्पण समारंभात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे संदेश

October 14th, 05:47 pm

विजयादशमीच्या पवित्र उत्सवाचे औचित्य साधत, उद्या म्हणजेच, 15 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12:10 वाजता, संरक्षण मंत्रालयाच्या विशेष कार्यक्रमात सात संरक्षण कंपन्यांचे राष्ट्रार्पण केले जाणार आहे. विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रसारित केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत दूरध्वनीवरुन चर्चा

April 28th, 07:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

Prime Minister Shri Narendra Modi to light up ‘Swarnim Vijay Mashaal’and begin 50th anniversary celebrations of Indo-Pak War

December 15th, 04:38 pm

In December 1971, the Indian Armed Forces secured a decisive and historic Victory over Pakistan Army, which led to creation of a Nation - Bangladesh and also resulted in the largest Military Surrender after the World War – II. From 16 December, the Nation will be celebrating 50 Years of Indo-Pak War, also called ‘Swarnim Vijay Varsh’. Various commemorative events are planned across the Nation.