टीएमसीच्या लांगूलचालनामुळे बंगालमध्ये डेमोग्राफी विस्कळीत झाली आहे: पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालच्या मेदिनीपूरमध्ये

May 19th, 01:40 pm

पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथे आपल्या तिसऱ्या जाहीर सभेत बोलताना पीएम मोदींनी टीएमसीच्या कृतींचा निषेध करत हा पक्ष भ्रष्टाचार, दहशतवाद आणि लांगूलचालन करत असल्याचा आरोप केला, ते म्हणाले, बंगालमध्ये टीएमसी म्हणजे दहशत, भ्रष्टाचार आणि लांगूूलचालन हे समीकरण झाले आहे. आपल्या व्होट बँकेला खूष ठेवण्यासाठी, ते सतत हिंदू समाजाचा अपमान करत असतात. साधु-संन्याशांनी टीएमसी नेत्यांनी या राजकारणात पडू नये असा सल्ला दिला आहे.त्यावर प्रतिसाद देताना मुख्यमंत्र्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांनी संन्यासी वर्गाबद्दल अवमानकारक उद्गार काढून इस्कॉन, रामकृष्ण मिशन आणि भारत सेवाश्रमावर अश्लाघ्य आरोप केले

पश्चिम बंगालमधील पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर येथील जाहीर सभांमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण

May 19th, 12:45 pm

पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर, पश्चिम बंगाल येथे झालेल्या झंझावाती सभांमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट जनसमुदायाला संबोधित करताना INDI आघाडीचे अपयश आणि प्रदेशाच्या विकास आणि उन्नतीप्रती भाजप वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधानांनी विशेषत: पाणी टंचाई, आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भर देत टीएमसीने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या कृतींमधील लक्षणीय फरक स्पष्ट केला.