कोरोनाविरुद्धच्या लढाईत 130 कोटी देशवासीयांनी दाखवलेली संकल्पशक्ती हे नव्या भारताच्या सामर्थ्याचे अभिलक्षण आहे: पंतप्रधान

April 12th, 01:23 pm

जगातील सर्वात विशाल मोफत लसीकरण असो किंवा वैद्यकीय पायाभूत सुविधांचा विकास असो, आरोग्याच्या क्षेत्रात भारत नवे मानदंड प्रस्थापित करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 130 कोटी नागरिकांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत दाखवलेली संकल्पशक्ती ही नव्या भारताच्या सामर्थ्याचे द्योतक आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

आरोग्य क्षेत्रावर केंद्रीय अर्थसंकल्प 2022 चा सकारात्मक परिणाम या वरच्या वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 26th, 02:08 pm

मंत्रिमंडळातले माझे सहकारी, देशभरातून सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित सर्व व्यावसायिक, निमवैद्यकीय कर्मचारी, परिचारक, आरोग्य व्यवस्थापक, तंत्रज्ञान आणि संशोधनाशी जोडले गेलेले महनीय, महिला आणि सज्जन हो!

पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे केले उद्घाटन

February 26th, 09:35 am

पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारचे आज उद्घाटन केले. पंतप्रधानांद्वारे संबोधित होत असलेल्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारच्या मालिकेतील हा पाचवा वेबिनार आहे. केंद्रीय मंत्री, सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवा व्यावसायिक तसेच निम-वैद्यकीय क्षेत्र शुश्रुषा, आरोग्य व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि संधोधन क्षेत्रातील व्यावसायिक देखील या प्रसंगी उपस्थित होते.

चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या (सीएनसीआय) दुसऱ्या संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 07th, 01:01 pm

नमस्कार, पश्चिम बंगालच्या आदरणीय मुख्यमंत्री सुश्री ममताजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनसुख मांडवियाजी, सुभाष सरकारजी, शांतनु ठाकुरजी, जॉन बरलाजी, नीतीश प्रमाणिकजी, विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारीजी, सीएनसीआय कोलकाताच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळातील सदस्यगण, आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व समर्पित सहकारी, अन्य महानुभाव, बंधूंनो आणि भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या दुसऱ्या संकुलाचे उद्घाटन

January 07th, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या दुसऱ्या संकुलाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले.

देशातील कोविड-19, ओमायक्रॉन आणि आरोग्य प्रणालींची सज्जता यांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक

December 23rd, 10:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज देशातील कोविड-19 ची स्थिती आणि ओमायक्रॉन या नव्या चिंताजनक उत्परिवर्तकाचा संभाव्य धोका यांचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत कोविड 19 प्रतिबंध आणि व्यवस्थापन, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर्स आणि कॉन्सन्ट्रेटर्स, व्हेंटीलेटर्स, पीएसए प्लांट, आयसीयू/ऑक्सिजन सुविधा असलेल्या रुग्णशय्या, मानव संसाधन, आयटी हस्तक्षेप आणि लसीकरणाची सद्यस्थिती या बाबींचा देखील या आढाव्यात समावेश होता.

वाराणसी इथे पीएम आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

October 25th, 01:33 pm

मला सुरुवात करू द्या, आता तुम्ही मला परवानगी द्या, मग मी बोलायला सुरुवात करीन. हर हर महादेव, बाबा विश्वनाथ, काशी या पवित्र भूमीतल्या सर्व बंधू-भगिनींना, आई अन्नपूर्णेच्या नगरीतील सर्व बंधू आणि भगिनींना विनम्र अभिवादन. तुम्हा सर्वांना दिवाळी, देव दीपावली, अन्नकूट, भाऊबीज, प्रकाशोत्सव आणि दाला छठच्या हार्दिक शुभेच्छा. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, उत्तर प्रदेशचे ऊर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियजी, उत्तर प्रदेश सरकारचे इतर मंत्री, केंद्रातील आमचे आणखी एक सहकारी महेंद्र नाथ पांडेजी, आणखी एक राज्यमंत्री अनिल राजभरजी. नीलकंठ तिवारीजी, श्री. रवींद्र जैस्वालजी, इतर मंत्री, संसदेतील आमच्या सहकारी श्रीमती सीमा द्विवेदीजी, बीपी सरोजजी, वाराणसीच्या महापौर श्रीमती मृदुला जैस्वालजी, इतर लोकप्रतिनिधी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेलेले आरोग्य व्यावसायिक, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय संस्था आणि इथे उपस्थित बनारसचे माझे बंधू आणि भगिनी.

पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ

October 25th, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाचा प्रारंभ केला. वाराणसीच्या विकासासाठी सुरु करण्यात येणाऱ्या, सुमारे 5200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे देखील त्यांनी उद्‌घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि डॉ. महेंद्रनाथ पांडे, विविध राज्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गोव्यामधील कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे लाभार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 18th, 10:31 am

गोव्याचे उर्जावान आणि लोकप्रिय मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, गोव्याचे सुपुत्र श्रीपाद नाईक, केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी डॉक्टर भारती पवार, गोव्याचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सर्व कोरोना योद्धे, बंधू आणि भगिनींनो!

गोव्यातील कोविड लसीकरण कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी संवाद

September 18th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील कोविड लसीकरण मोहिम कार्यक्रमात, आरोग्य कर्मचारी आणि आणि लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. गोव्यात प्रौढ लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय दूतावासांच्या प्रमुखांशी आणि व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील हितसंबंधियांशी संवाद

August 06th, 06:31 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, जगभरात सेवा देत असलेले सर्व राजदूत, उच्चायुक्त, केंद्र आणि राज्य सरकारमधील सर्व अधिकारी तसेच वेगवेगळी निर्यात मंडळे, वाणिज्य आणि उद्योग संघटनेतील सर्व नेते, महोदय आणि महोदया!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेशातील भारतीय दूतावासांच्या प्रमुखांशी आणि व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

August 06th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परदेशातील भारतीय दूतावासाच्या प्रमुखांशी तसेच व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राशी संबंधित मान्यवरांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री देखील या संवादसत्रात सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी संवाद साधताना केलेले संबोधन

August 03rd, 12:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानममंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी गुजरातमध्ये आज एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी संवाद

August 03rd, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानममंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी गुजरातमध्ये आज एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘कस्टमाईज क्रॅश कोर्स प्रोग्रॅम फॉर कोविड 19 फ्रंटलाईन वर्कर्स’ कार्यक्रमाचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 18th, 09:45 am

कोरोनाच्या विरोधामध्ये सुरू केलेल्या महायुद्धामध्ये आज एका महत्वपूपर्ण मोहिमेचा पुढचा टप्पा प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी देशामध्ये हजारो व्यावसायिक, कौशल्य विकास मोहिमेशी जोडले गेले. अशा प्रकारे केलेल्या प्रयत्नांमुळे देशाला कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी खूप मोठी शक्ती मिळाली. आता कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये कोरोना विषाणूचे वारंवार बदलणारे स्वरूप आपल्यासमोर नवनवीन आव्हाने कशा पद्धतीने निर्माण करीत आहे, हे तुम्ही लोकांनी पाहिले आहे.

कोविड-19 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम कार्यक्रमाचा पंतप्रधानांनी केला आरंभ

June 18th, 09:43 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड-19 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम कार्यक्रमाचा आज दुरदृष्य प्रणालीद्वारे आरंभ केला. 26 राज्यात 111प्रशिक्षण केंद्रांवर हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल. या उपक्रमांतर्गत एक लाख फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांच्या सह इतर केंद्रीय मंत्री, राज्यांचे मंत्री, तज्ञ आणि इतर संबंधित यावेळी उपस्थित होते.

‘कोविड 19 शी लढण्याचे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाचा’ 18 जून रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत शुभारंभ

June 16th, 02:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘‘कोविड 19 शी लढण्याचे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. 26 राज्यांमधील 111 प्रशिक्षण केंद्रांमध्ये या कार्यक्रमाची सुरूवात होईल. त्यानंतर पंतप्रधान संबोधित करतील. यावेळी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.