पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे मलेरियावर आश्चर्यकारकरीत्या मात, आरोग्यसेवेत क्रांती जेपी नड्डा

December 16th, 10:06 am

भारताने मलेरिया संसर्गाचे प्रमाण 69% नी कमी केले असून बाधितांची संख्या 2017 ते 2023 या काळात 6.4 दशलक्ष वरून अवघ्या 2 दशलक्षवर आणून उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे – हे मोठे यश मिळण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लक्ष्यकेंद्रित धोरणे आणि त्यांचे नेतृत्वाला कारणीभूत आहे. 2030 पर्यंत मलेरियाचे उच्चाटन करण्याच्या 2015 मध्ये पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या उद्दिष्टाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे.

Tribal society is the one that led the fight for centuries to protect India's culture and independence: PM Modi

November 15th, 11:20 am

PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.

PM Modi participates in Janjatiya Gaurav Divas programme in Jamui, Bihar

November 15th, 11:00 am

PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.

Darbhanga AIIMS will transform the health sector of Bihar: PM Modi

November 13th, 11:00 am

The Prime Minister, Shri Narendra Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth around Rs 12,100 crore in Darbhanga, Bihar today. The development projects comprise health, rail, road, petroleum and natural gas sectors.

PM Modi inaugurates, lays foundation stone and dedicates to the nation multiple development projects worth Rs 12,100 crore in Bihar

November 13th, 10:45 am

PM Modi inaugurated key projects in Darbhanga, including AIIMS, boosting healthcare and employment. The PM expressed that, The NDA government supports farmers, makhana producers, and fish farmers, ensuring growth. A comprehensive flood management plan is in place, and cultural heritage, including the revival of Nalanda University and the promotion of local languages, is being preserved.

भारत आणि मालदीव: सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षाविषयक भागीदारीसाठी दृष्टिकोन

October 07th, 02:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्झू यांनी आज, 7 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा व्यापक आढावा घेतला.दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणात मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या या देशांतील ऐतिहासिक घनिष्ठ आणि विशेष संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीची देखील त्यांनी नोंद घेतली.

'मन की बात'चे श्रोते हेच या कार्यक्रमाचे खरे आधारस्तंभ: पंतप्रधान मोदी

September 29th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.

इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम या जागतिक नेतृत्व मंचावर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

August 31st, 10:39 pm

ईटी वर्ल्ड लीडर्स फोरमच्या या कार्यक्रमात येणं म्हणजे…कितीतरी जुने चेहरे दिसताहेत…तर ही एक आनंदाची बाब आहे. मला विश्वास आहे की इथे भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने खूप चांगली चर्चा झाली असेल. आणि ही चर्चा अशावेळी झालीय जेव्हा संपूर्ण जगात भारताविषयी एक विश्वास निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला केले संबोधित

August 31st, 10:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात भारताच्या भविष्यासाठी मांडला महत्त्वाकांक्षी दृष्टीकोन

August 15th, 10:16 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात, भारताच्या विकासाला आकार देणे, नवोन्मेषाला चालना देणे आणि विविध क्षेत्रांमध्ये देशाला जागतिक नेता म्हणून स्थापित करण्याच्या उद्देशाने भविष्यकालीन उद्दिष्टांची मालिका रेखाटली.

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी साधला दूरध्वनीवरून संवाद

July 20th, 02:37 am

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

डॉ.एमएस वालियाथन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

July 19th, 10:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य सेवा आणि वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील अग्रणी डॉ.एम एस वालियाथन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मुंबईमध्ये विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

July 13th, 06:00 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पीयूष गोयल जी, रामदास आठवले जी, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, अजितदादा पवार जी, राज्य सरकार मधील मंत्री मंगल प्रभात जी, दीपक केसरकर जी, इतर सर्व मान्यवर, महिला आणि पुरुषहो,

पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रात मुंबई येथे 29,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

July 13th, 05:30 pm

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी मुंबई आणि आसपासच्या प्रदेशांमधील रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 29,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रातील तरुणांसाठी विशाल कौशल्य विकास प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केला , ज्यामुळे राज्यात रोजगाराच्या संधींना आणखी चालना मिळेल. केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेल्या वाढवण बंदराचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. 76,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे 10 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होतील असे ते म्हणाले.

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले प्रसार माध्यम निवेदन.

June 22nd, 01:00 pm

मी पंतप्रधान शेख हसीना जी आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे हार्दिक स्वागत करत आहे. तसे पाहिले तर, गेल्या सुमारे एका वर्षाच्या काळात आम्ही दहा वेळा भेटलो आहोत. पण आजची भेट विशेष आहे. कारण आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान शेख हसीना जी आपल्या पहिल्या अतिथी आहेत.

Today, Ramlala sits in a grand temple, and there is no unrest: PM Modi in Karakat, Bihar

May 25th, 11:45 am

Prime Minister Narendra Modi graced the historic lands of Karakat, Bihar, vowing to tirelessly drive the nation’s growth and prevent the opposition from piding the country on the grounds of inequality.

बिहारमध्ये पाटलीपुत्र, करकट आणि बक्सर येथील सभांना जमलेल्या उत्साही जनसमुदायाला पीएम मोदींनी संबोधित केले

May 25th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या पाटलीपुत्र, करकट आणि बक्सर या ऐतिहासिक भूमीत घेतलेल्या सभांमध्ये देशाच्या विकासाला अथकपणे चालना देण्याचे आणि असमानतेच्या आधारावर विरोधकांना देशाची फाळणी करण्यापासून रोखण्याचे आश्वासन दिले.

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशाची 60 वर्षे वाया घालवली: पंतप्रधान मोदी बिहारच्या चंपारणमध्ये

May 21st, 11:30 am

बिहारमधील चंपारण येथे एका उत्साही सार्वजनिक सभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने परिवर्तनात्मक प्रवास केला असल्यावर भर देत हीच गती पुढे सुरू ठेवणे तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधान मोदींनी विरोधकांचे, विशेषत: INDI आघाडीचे अपयश उघड करताना त्यांच्या सरकारच्या महत्त्वपूर्ण उपलब्धींवरही प्रकाश टाकला.

इंडी आघाडी देशाचे विभाजन करू शकते पण देशाला पुढे नेऊ शकत नाही: पंतप्रधान मोदी बिहारच्या महाराजगंज येथे

May 21st, 11:20 am

बिहारमधील महाराजगंज येथे आपल्या दुसऱ्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी लोकांप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना विकसित बिहार आणि समृद्ध भारताबद्दलची आपली संकल्पना मांडली. 4 जून जवळ येत असताना विरोधकांकडून टीका होत असल्याचे अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, या देशातील जनता मोदींना पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा निवडून देणार आहे, हे इंडिया आघाडी सहन करू शकत नाही.

पीएम मोदींच्या बिहारमध्ये चंपारण आणि महाराजगंजमध्ये जाहीर सभा

May 21st, 11:00 am

बिहारमधील चंपारण आणि महाराजगंज येथे उत्साही सार्वजनिक सभांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या परिवर्तनात्मक वाटचालीवर आणि ही गती कायम ठेवणे अत्यंत निकडीचे आहे यावर प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदींनी विरोधकांचे, विशेषत: इंडी आघाडीचे अपयश उघड करताना आपल्या सरकारने साध्य केलेल्या महत्त्वपूर्ण उपलब्धी अधोरेखित केल्या.