इंदूर येथे 'श्रमिकांचे हित श्रमिकांना समर्पित' कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
December 25th, 12:30 pm
आजचा हा कार्यक्रम आपल्या श्रमिक बंधू-भगिनींची अनेक वर्षांची तपस्या , त्यांची अनेक वर्षांची स्वप्ने आणि संकल्पांचे फलित आहे. आणि मला आनंद आहे की आज अटलजींची जयंती आहे, मात्र भारतीय जनता पक्षाचे हे नवे सरकार, नवे मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेशातील माझा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आणि तोही माझ्या गरीब, कष्टकरी बंधू-भगिनींसाठी होणे आणि अशा कार्यक्रमात येण्याची मला संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप समाधानाची बाब आहे.'श्रमिकांचे हित श्रमिकांना समर्पित' कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
December 25th, 12:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'श्रमिकांचे हित श्रमिकांना समर्पित' या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी हुकुमचंद गिरणी कामगारांच्या थकबाकीशी संबंधित सुमारे 224 कोटी रुपयांचा धनादेश प्राधिकृत अधिकारी आणि हुकुमचंद गिरणी कामगार संघटना, इंदूरच्या प्रमुखांकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हुकुमचंद गिरणी कामगारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यात आला. खरगोन जिल्ह्यात 60 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केलीइंदूर इथं येत्या 25 डिसेंबर रोजी होणार असलेल्या 'मजदुरों का हित मजदुरों को समर्पित' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी. हुकुमचंद गिरणी कामगारांच्या थकबाकीशी संबंधित धनादेशही करणार सुपूर्द
December 24th, 07:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदूर इथं येत्या 25 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता होणार असलेल्या 'मजदुरों का हित मजदुरों को समर्पित' या कार्यक्रमात दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. यावेळी ते इंदुरमधल्या हुकुमचंद गिरणी कामगारांच्या थकबाकीशी संबंधित सुमारे 224 कोटी रुपयांचा धनादेश अधिकृत अवसायक आणि कामगार संघटनेच्या प्रमुखांना सुपूर्द करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान हुकुमचंद गिरणी कामगारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचीही पूर्तता केली जाणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.