2566 वी बुद्ध जयंती आणि लुंबिनी दिवस 2022 निमित्त नेपाळ येथील कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 16th, 09:45 pm
याआधीही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मला भगवान बुद्धांशी संबंधित दैवी स्थळांना, त्यांच्याशी निगडित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. आणि आज मला भारताचा मित्र देश नेपाळमध्ये भगवान बुद्धांचे पवित्र जन्मस्थान लुंबिनीला भेट देण्याचे भाग्य लाभले आहे. काही वेळापूर्वी मला मायादेवी मंदिरात जाण्याची संधी मिळाली, ती देखील माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झाला, तिथली ऊर्जा, तिथले चैतन्य, ही एक वेगळीच अनुभूती आहे. 2014 मध्ये मी या ठिकाणी भेट दिलेल्या महाबोधीच्या रोपाचे रुपांतर आता वृक्षात होत आहे हे पाहून मला आनंद होत आहे.लुंबिनी, नेपाळ येथे बुद्ध जयंती साजरी
May 16th, 03:11 pm
नेपाळमधील लुंबिनी येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर आणि मेडिटेशन हॉलमध्ये 2566व्या बुद्ध जयंती सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांच्यासोबत नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा, आणि त्यांची पत्नी डॉ. आरझू राणा देउबा हेदेखील होते.नेपाळमधील लुंबिनी इथल्या मायादेवी मंदिराला पंतप्रधानांनी दिली भेट
May 16th, 11:59 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 मे 2022 रोजी नेपाळमधील लुंबिनीच्या एक दिवसाच्या दौऱ्यात लुंबिनी येथील मायादेवी मंदिराला सर्वप्रथम भेट दिली. पंतप्रधानांसोबत नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि त्यांच्या पत्नी डॉ.आरझू राणा देउबा उपस्थित होते.