
Mahakumbh has strengthened the spirit of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat’ by uniting people from every region, language, and community: PM Modi
March 18th, 01:05 pm
PM Modi while addressing the Lok Sabha on Mahakumbh, highlighted its spiritual and cultural significance, likening its success to Bhagirath’s efforts. He emphasized unity, youth reconnecting with traditions, and India's ability to host grand events. Stressing water conservation, he urged expanding river festivals. Calling it a symbol of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat,’ he hailed Mahakumbh’s legacy.
महाकुंभ मेळ्याच्या यशस्वी सांगतेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत संबोधन
March 18th, 12:10 pm
उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याच्या यशस्वी सांगतेनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण केले. महाकुंभच्या यशस्वी आयोजनामध्ये योगदान दिलेल्या देशातल्या असंख्य नागरिकांप्रती त्यांनी कृतज्ञताभाव व्यक्त केला. महाकुंभच्या यशात विविध व्यक्ती आणि संस्थांचा वाटा असल्याचे अधोरेखित करुन यामध्ये सहभागी सरकार, समाज आणि सर्व समर्पित कामगारांचे त्यांनी आभार मानले. देशभरातून आलेल्या भाविकांचे आभार मानताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील भाविकांचा विशेष उल्लेख केला, त्यातही प्रयागराजमधील भाविकांनी दिलेल्या अमूल्य पाठिंब्यासाठी आणि सहभागासाठी त्यांचे विशेष आभार मानले.
पंतप्रधानांनी मॉरिशसमधील पवित्र गंगा तलावाला दिली भेट
March 12th, 05:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसमधील पवित्र गंगा तलावाला भेट दिली.या ठिकाणी त्यांनी पूजा केली आणि त्रिवेणी संगमातील पवित्र जल या पवित्र स्थळी अर्पित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मॉरिशसमधील अटलबिहारी वाजपेयी लोक सेवा आणि नवोन्मेश संस्थेचे केले उद्घाटन
March 12th, 03:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज मॉरिशसमधील रेडुइट येथे अटल बिहारी वाजपेयी लोक सेवा आणि नवोन्मेश संस्थेचे संयुक्तपणे उद्घाटन केले. भारत-मॉरिशस विकास भागीदारीअंतर्गत राबवण्यात आलेला हा ऐतिहासिक प्रकल्प, मॉरिशसमधील क्षमता विकासाप्रति असलेली भारताची वचनबद्धता अधोरेखित करतो.मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
March 12th, 03:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशस प्रजासत्ताकाच्या 57 व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन (जीसीएसके)’ हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 12th, 03:00 pm
मॉरिशसचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. हा केवळ माझा सन्मान नाही. हा 1.4 अब्ज भारतीयांचा सन्मान आहे. भारत आणि मॉरिशसमधील शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नातेसंबंधांचा हा सन्मान आहे. प्रादेशिक शांतता, प्रगती, सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी आमच्या सामायिक वचनबद्धतेची ही पावती आहे. तसेच, ग्लोबल साउथच्या सामायिक आशा आणि आकांक्षांचे प्रतीक देखील आहे. या पुरस्काराचा मी अत्यंत नम्रतापूर्वक आणि कृतज्ञतेने स्वीकार करतो. हा पुरस्कार मी अनेक शतकांपूर्वी भारतातून मॉरिशसमध्ये आलेल्या तुमच्या पूर्वजांना आणि त्यांच्या सर्व पिढ्यांना समर्पित करतो. त्यांच्या कठोर परिश्रमातून त्यांनी मॉरिशसच्या विकासात एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे आणि मॉरिशसच्या विविधतेत योगदान दिले. एक जबाबदारी म्हणूनही मी या सन्मानाचा स्वीकार करतो. भारत-मॉरिशस धोरणात्मक भागीदारी नव्या शिखरावर नेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत राहू या आमच्या वचनबद्धतेचा मी पुनरुच्चार करतो.India-Mauritius Joint Vision for an Enhanced Strategic Partnership
March 12th, 02:13 pm
PM Modi, during his visit to Mauritius, held productive talks with PM Dr. Navinchandra Ramgoolam, reaffirming the deep-rooted ties between India and Mauritius, built on shared history, culture, and values. They acknowledged the growing Comprehensive Strategic Partnership across trade, infrastructure, climate, and healthcare, committed to fostering prosperity, sustainable development, and regional stability.पंतप्रधानांच्या मॉरिशस दौऱ्याची फलनिष्पत्ती
March 12th, 01:56 pm
भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ मॉरिशस यांच्यात सीमापार व्यवहारांसाठी स्थानिक चलनांच्या (आयएनआर किंवा एमयूआर) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी एक चौकट स्थापन करण्याचा करार.Our vision for the Global South will go beyond SAGAR-it will be MAHASAGAR: PM Modi
March 12th, 12:30 pm
During his visit to Mauritius, PM Modi emphasized the deep-rooted ties between the two nations, announcing an 'Enhanced Strategic Partnership' with PM Ramgoolam. India will assist in building a new Parliament, modernizing infrastructure, and strengthening security. With a focus on digital innovation, trade, and cultural ties, PM Modi reaffirmed India’s commitment to regional growth and cooperation.पंतप्रधानांनी मॉरिशसच्या जनतेला त्यांच्या राष्ट्रीय दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
March 12th, 09:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसच्या जनतेला त्यांच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. “आजच्या कार्यक्रमांची उत्सुकतेने वाट पाहतो आहे; ज्या समारंभात मी सुद्धा सहभागी होणार आहे,” असे मोदी म्हणाले. तसेच, त्यांनी काल झालेल्या महत्त्वपूर्ण बैठका आणि कार्यक्रमांची क्षणचित्रेही सामायिक केली.If there is one country in the world that has a right on India, it is Mauritius: PM Modi
March 12th, 06:15 am
PM Modi, while addressing the Banquet Dinner hosted by the PM of Mauritius, expressed deep gratitude for the warm welcome. He highlighted the historic and familial ties between India and Mauritius, emphasizing shared values, mutual trust, and collaboration in key sectors. He reaffirmed India’s commitment to Mauritius’ development and called for stronger regional unity, prosperity, and security.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसमधील भारतीय समुदायाला उद्देशून केलेल्या भाषणाचा अनुवाद
March 12th, 06:07 am
10 वर्षांपूर्वी याच दिवशी मी मॉरिशसला आलो होतो तेव्हा इथे येण्यापूर्वी एकच आठवडा आधी होळी साजरी केली होती. मी इथे येताना भारतातून फागुआचा उत्साह माझ्यासोबत घेऊन आलो होतो. यावेळी मी मॉरिशसमधून होळीचे रंग भारतात घेऊन जाईन. आपण एक दिवसानंतर तिथे होळी साजरी करू. 14 तारखेला चारी दिशांना रंग असतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरीशसमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
March 11th, 07:30 pm
मॉरीशसमधील त्रियानॉन कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरीशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगोलम यांच्यासह मॉरीशसमधील भारतीय समुदाय तसेच भारताचे मित्रगण यांच्या मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमात विद्यार्थी, व्यावसायिक, सामाजिक-सांस्कृतिक संघटना तसेच व्यापार क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींसह समग्र भारतीय समुदायाने उत्साहाने भाग घेतला. मॉरीशस सरकारमधील अनेक मंत्री, संसद सदस्य तसेच इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.PM Modi meets with the President of the Republic of Mauritius
March 11th, 04:01 pm
PM Modi, during his visit to Mauritius, met with President Dharambeer Gokhool at the State House, reaffirming the strong India-Mauritius ties. He handed over OCI cards to the President and First Lady as a special gesture. He also visited the Ayurveda Garden, highlighting cooperation in traditional medicine. President Gokhool hosted a State lunch in his honor.मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोकूल द्वारा आयोजित मेजवानी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश
March 11th, 03:06 pm
मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात पुन्हा एकदा प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होण्याचा मला सन्मान लाभला आहे.PM Modi lays wreath at Samadhis of Sir Seewoosagur Ramgoolam and Sir Anerood Jugnauth
March 11th, 03:04 pm
PM Modi, along with Mauritius PM Navinchandra Ramgoolam, laid wreaths at the Samadhis of Sir Seewoosagur Ramgoolam and Sir Anerood Jugnauth at Pamplemousses Botanical Garden. PM Modi honored their legacies in Mauritius' progress and India-Mauritius ties. They later planted a tree under the Ek Ped Maa Ke Naam initiative, symbolizing shared commitment to nature and heritage.दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदींचे मॅारिशसमध्ये आगमन
March 11th, 08:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही वेळापूर्वी मॉरिशसमध्ये आगमन झाले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ते मॉरिशसच्या 57 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार असून मॉरिशसच्या नेतृत्वासह अन्य मान्यवरांची भेट घेणार आहेत.मॉरीशसच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
March 10th, 06:18 pm
माझे मित्र पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगोलम यांच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत मी मॉरीशसच्या 57व्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या मॉरीशस दौऱ्यासाठी रवाना होत आहे.पंतप्रधान मोदी 11 ते 12 मार्च 2025 दरम्यान मॉरिशसला भेट देणार
March 07th, 06:17 pm
पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 11-12 मार्च रोजी मॉरिशसला भेट देणार आहेत.ते मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या भेटीत ते प्रमुख नेत्यांची भेट घेतील, भारतीय वंशाच्या समुदायाशी संवाद साधतील तसेच विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. ही भेट सामायिक इतिहास आणि प्रगतीमध्ये यांमध्ये रुजलेल्या मजबूत भारत-मॉरिशस भागीदारीची पुष्टी करणारी आहे .भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
January 26th, 05:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदनासाठी आभार मानले.