केनटुस्कीचे राज्यपाल मॅट बेव्हीन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

January 17th, 11:26 pm

केनटुस्कीचे राज्यपाल मॅट बेव्हीन यांनी आज पंतप्रधानांची गांधीनगर येथे भेट घेतली. पंतप्रधानांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील एककेंद्राभिमुखतेवर तसेच भारत- अमेरिकी दरम्यान धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर जोर दिला.