निवारा, वीज, शौचालये, गॅस, रस्ते, रुग्णालये आणि शाळा यांसारख्या मुलभूत सुविधा नसण्याचे परिणाम महिलांना विशेषतः गरीब महिलांना भोगावे लागतात : पंतप्रधान

August 10th, 10:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिला सबलीकरणाबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचे सविस्तर विवेचन केले. घर, वीज, शौचालये, गॅस, रस्ते, रुग्णालये आणि शाळा यांसारख्या सुविधा उपलब्ध नसण्याचा परिणाम महिलांनाच विशेषतः गरीब महिलांना अधिक प्रमाणात भोगावे लागतात असं ते म्हणाले. आता आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत असताना गेल्या सात दशकातील प्रगतीचा वेध घेताना या मुलभूत प्रश्नांना काही दशकांपूर्वीच हात घातला जायला हवा होता अशी अटळ भावना मनात येते. आज उत्तर प्रदेशातील माहोबामध्ये उज्ज्वला 2.0 योजनेचा आरंभ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करताना ते बोलत होते.

उज्ज्वला 2.0 योजनेच्या उत्तर प्रदेशात झालेल्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

August 10th, 12:46 pm

आज आपल्या सर्वांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की, आता थोड्या दिवसांतच राखी पौर्णिमेचा सणही येतोय. आज मला या सणाच्या आधीच, ॲडव्हान्समध्ये माता-भगिनींचे आशीर्वाद मिळत आहेत. आणि त्याचबरोबर या काळात देशातल्या कोट्यवधी गरीब, दलित, वंचित, मागास, आदिवासी कुटुंबातल्या भगिनींना आज आणखी एक भेट देण्याची संधी मिळाली आहे. आज उज्ज्वला योजनेच्या पुढच्या टप्प्यामध्ये अनेक भगिनींना मोफत गॅस जोडणी आणि गॅस शेगडी मिळत आहे. या सर्व लाभार्थींचे मी पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो.

पंतप्रधानांकडून उत्तर प्रदेशात महोबा येथे उज्ज्वला 2.0 योजनेचा शुभारंभ

August 10th, 12:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात महोबा येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) जोडण्या देऊन उज्ज्वला 2.0 (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- पीएमयूवाय) योजनेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

राजकोट, गुजरात येथे एम्सच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

December 31st, 11:34 am

केम छै, गुजरात में ठण्डी वण्डी छै के नहीं, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, मुख्यमंत्री विजय रुपाणीजी, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनजी, उपमुख्यमंत्री भाई नितीन पटेलजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी चौबे, मनसुख भाई मंडावीयाजी, पुरुषोत्तम रुपालाजी, भूपेंद्रसिंग विटासामाजी, किशोर कानानीजी, इतर सर्व मंत्री, खासदार, इतर सर्व मान्यवर.

पंतप्रधानांकडून राजकोट एम्सचे भूमीपूजन

December 31st, 11:33 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राजकोट एम्सचे भूमीपूजन केले. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Prime Minister Modi addresses National Women Livelihood Conference in Varanasi

March 08th, 11:00 am

Prime Minister Modi addressed National Women Livelihood Conference in Varanasi. PM Modi highlighted how today, women were leading from the front in every sphere. “Not only are our daughters flying fighter jets but also achieving great feats by circumnavigating the entire world.” The PM also appreciated the role of self help groups and said that the government was fully devoted to empowerment of women.

चेन्नईमध्ये कलैवनार अरंगम येथे अम्मा दुचाकी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

February 24th, 06:03 pm

सेल्वी जयललीताजी यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्या जिथे असतील, तिथे त्या फार आनंदात असतील अशी खात्री मला वाटते.

PM Modi inaugurates Amma Two Wheeler Scheme in Chennai

February 24th, 05:57 pm

PM Narendra Modi today inaugurated the Amma Two Wheeler Scheme in Chennai. Paying tributes to Jayalalithaa ji, PM Modi spoke at length about women empowerment. He said, When we empower women in a family,we empower the entire house-hold. When we help with a woman's education, we ensure that the family is educated. When we facilitate her good health, we help keep the family healthy. When we secure her future, we secure future of the entire home.

भारत हा विविधतेचा देश आहे याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे: पंतप्रधान मोदी

June 27th, 10:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नेदरलँड्समध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी नेदरलॅंड्स आणि सुरीनाममध्ये भारतीय वंशाच्या भूमिकांची प्रशंसा केली. संपूर्ण युरोपमध्ये नेदरलॅंड्स हा सर्वात मोठया प्रमाणांत प्रवासी भारतीय असलेला दुसऱ्या क्रमांकावरचा देश आहे असं त्यांनी सांगितलं.

PM interacts with Indian community in the Netherlands

June 27th, 10:50 pm

Prime Minister Narendra Modi today interacted with Indian community in the Netherlands. During his address, PM Modi appreciated the role of Indian diaspora in Netherlands and Suriname. He noted that Netherlands had the second largest Indian diaspora in entire Europe.

सोशल मिडिया कॉर्नर 17 मे 2017

May 17th, 08:31 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

देशभरात मातृत्व लाभ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

May 17th, 06:32 pm

केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरात मातृत्व लाभ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला , जो 1 जानेवारी 2017 पासून देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित केला आहे, कार्योत्तर मंजुरी दिली. या कार्यक्रमांतर्गत , महिलांना वेतनाची नुकसान भरपाई रोख स्वरूपात देण्यात येणार आहे, जेणेकरून महिलांना प्रसूतीच्या आधी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेता येईल आणि तिला योग्य आहार घेता येईल.