अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश
January 12th, 11:00 am
आज आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि जगभरात पसरलेल्या राम भक्तांसाठी एक पवित्र पर्व आहे. सर्वत्र प्रभू श्रीरामाच्या भक्तीचे अनोखे वातावरण! चारही दिशांना राम नामाचा गजर, राम भजनांचे अलौकिक स्वरमाधुर्य! प्रत्येकजण 22 जानेवारीच्या त्या ऐतिहासिक पवित्र क्षणाची वाट पाहत आहे आणि आता अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 11 दिवस उरले आहेत. मी भाग्यवान आहे की मलाही या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे. हा माझ्यासाठी कल्पनातीत अनुभूतीचा काळ आहे.श्री रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठीच्या 11 दिवसांच्या विशेष विधीचा पंतप्रधानांकडून आज प्रारंभ
January 12th, 10:31 am
राममंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर रामभक्तीच्या भावनोत्कटतेत सारा देश दंग असल्याची दखल पंतप्रधानांनी आपल्या भावनिक संदेशात घेतली आहे. हा क्षण सर्वशक्तिमान ईश्वराचे आशीर्वाद असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, माझे मन भरुन आले आहे! माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा भावनोत्कटतेचा अनुभव घेत आहे, मी भक्तीची एक आगळी भावना अनुभवत आहे. माझ्या अंतर्मनाचा हा भावनिक प्रवास अभिव्यक्तीची नव्हे तर अनुभवाची संधी आहे.तो मांडण्याची माझी इच्छा असली तरी त्याची सखोलता, व्यापकता आणि तीव्रता मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. यासंदर्भात माझी मनोस्थिती तुम्हीही चांगल्या प्रकारे समजू शकता.