2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

December 13th, 10:21 am

2001 च्या संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धांजली वाहिली.

कारगिल विजय दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील द्रास येथे केलेले भाषण

July 26th, 09:30 am

लडाखचे नायब राज्यपाल बी डी मिश्रा, केंद्रीय मंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सेना दल प्रमुख, कारगिल युद्धाच्या वेळी लष्कर प्रमुख पदावर असलेले जनरल व्ही पी मलिक, माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, सेवेमधील आणि सेवानिवृत्त शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिक, कारगिल युद्धातील वीर योद्ध्यांच्या माता, वीर नारी आणि त्यांचे कुटुंबीय,

कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून पंतप्रधानांनी लडाख येथे आयोजित श्रद्धांजली समारंभात भाग घेतला

July 26th, 09:20 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आभासी पद्धतीने लडाख येथील शिंकून खिंड बोगदा प्रकल्पाच्या कार्याचा शुभारंभी सुरुंगस्फोट पाहिला. शिंकून खिंड बोगदा प्रकल्पाअंतर्गत निमु-पादुम-दारचा मार्गावर सुमारे 15,800 फुट उंचीवर 4.1 किमी लांबीचा दुहेरी -ट्यूब बोगदा उभारण्यात येणार आहे. या बोगद्यामुळे लेह भागाशी वर्षभरात कोणत्याही मोसमात संपर्क करण्याची कायमची सोय होणार आहे.

पुलवामामध्ये शहीद झालेल्या शूर वीरांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

February 14th, 11:10 am

2019 मध्ये पुलवामामध्ये शहीद झालेल्या शूर वीरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.

विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शूर वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली

December 16th, 09:44 am

विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1971 च्या युद्धात भारताची कर्तव्यभावनेने सेवा करणाऱ्या शूर वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

2001 मधील संसदेवरच्या हल्ल्यात शहीद शूर सुरक्षा जवानांना पंतप्रधानांकडून भावपूर्ण आदरांजली

December 13th, 09:47 am

2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सुरक्षा जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.

विजय दिवसाच्या पूर्वसंध्येनिमित्त पंतप्रधानांनी आर्मी हाऊस इथल्या अनौपचारिक स्वागत समारंभात घेतला सहभाग

December 15th, 08:13 pm

विजय दिवसाच्या पूर्वसंध्येनिमित्त आज नवी दिल्लीत आर्मी हाऊस इथे झालेल्या अनौपचारिक स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

आपले युवक प्रत्येक क्षेत्रात देशाला बहुमान मिळवून देत आहेत: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

July 31st, 11:30 am

31 जुलै म्हणजे आजच्याच दिवशी, आपण सर्व देशबांधव, शाहिद उधम सिंह जी यांच्या हौताम्याला वंदन करतो. मी अशा इतर सर्व महान क्रांतिकारकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व वाहिले आहे.

पाणी वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यकः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

March 27th, 11:00 am

गेल्या आठवड्यात आपण एक असे यश संपादन केलं आहे, ज्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटेल. आपण ऐकले असेल, की भारतानं गेल्या आठवड्यात, 400 अब्ज डॉलर्स म्हणजे 30 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य केलं. पहिल्यांदा हे ऐकल्यावर असं वाटेल की ही तर अर्थव्यवस्थेशी संबंधित गोष्ट आहे. मात्र, ही अर्थव्यवस्थेपेक्षाही, भारताचे सामर्थ्य, भारताच्या क्षमतेशी संबंधित बाब आहे.एक काळ असा होता, जेव्हा भारतातून होणाऱ्या निर्यातीचा आकडा देखील 100 अब्ज, कधी 200 अब्ज इतका राहत असे. मात्र, आज भारताची निर्यात, 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. याचा एक अर्थ असा आहे, की जगभरात, भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांची मागणी वाढते आहे. आणि दूसरा अर्थ असा आहे की भारताची पुरवठा साखळी व्यवस्था देखील दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. यातून एक खूप मोठा संदेशही आपल्याला मिळाला आहे,तो असा, की देशाच्या स्वप्नांपेक्षाही जेव्हा देशाचे संकल्प मोठे असतात, तेव्हाच देश विराट पावले उचलू शकतो. जेव्हा संकल्पपूर्ती करण्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात, तेव्हाच ते संकल्प खरे होतात, आणि आपण बघा, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील, असेच घडते, नाही का? जेव्हा कोणाचेही संकल्प, त्यांचे प्रयत्न, त्यांच्या स्वप्नांपेक्षाही मोठे होतात, तेव्हा यश स्वतःच त्यांच्याकडे चालत येते.

भारतीय संस्कृतीच्या चैतन्याने जगभरातील लोकांना कायम आकर्षित केले आहे: पंतप्रधान मोदी

January 30th, 11:30 am

मित्रहो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात, या प्रयत्नांच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय प्रतीकांची देश पुनर्स्थापना करत आहे. इंडिया गेट जवळची अमर जवान ज्योत आणि जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरची प्रज्वलित ज्योत एकत्र करण्यात आल्याचे आपण पाहिले.या भावूक क्षणी अनेक देशवासीय आणि शहीदांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले.राष्ट्रीय युद्ध स्मारकावर, देशाच्या स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या शूरवीरांची नावे कोरलेली आहेत.लष्कराच्या माजी सैनिकांनी मला पत्र लिहून कळवले आहे की शहिदांच्या स्मारकासमोर प्रज्वलित होत असलेली ‘अमर जवान ज्योत’ शहिदांच्या अमरत्वाचे प्रतिक आहे. खरोखरच अमर जवान ज्योतीप्रमाणेच आपले शहीद,त्यांची प्रेरणा आणि त्यांचे योगदानही अमर आहे. जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा राष्ट्रीय युध्द स्मारकाला आवर्जून भेट द्या असे माझे आपणा सर्वाना सांगणे आहे.आपले कुटुंबीय आणि मुलानाही घेऊन जा.इथे आपल्याला आगळीच उर्जा आणि प्रेरणा यांची प्रचीती येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2001 च्या संसद हल्यातल्या शहिदांना अर्पण केली आदरांजली

December 13th, 11:42 am

संसदेवर 2001 मध्ये झालेल्या हल्याच्या वेळी, आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे.

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध व्यक्त

November 13th, 07:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. आज शहीद झालेल्या जवानांना आणि कुटुंबियांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

नवी दिल्लीतील संरक्षण विभागाच्या कार्यालय संकुलांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 16th, 11:01 am

कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी राजनाथ सिंह जी, हरदीप सिंह पुरी जी, अजय भट्ट जी, कौशल किशोर जी, संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत जी, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी वर्ग, इतर माननीय, उपस्थित पुरुष आणि महिला वर्ग!

कस्तुरबा गांधी मार्ग आणि आफ्रिका अव्हेन्यू इथल्या संरक्षण कार्यालय संकुलाचे पंतप्रधानांनी केले उद्‌घाटन

September 16th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत कस्तुरबा गांधी मार्ग आणि आफ्रिका अव्हेन्यू इथल्या संरक्षण कार्यालय संकुलाचे उद्‌घाटन केले. आफ्रिका अव्हेन्यू इथल्या संरक्षण कार्यालय संकुलाला भेट देऊन त्यांनी लष्कर, नौदल, हवाई दल आणि नागरी अधिकाऱ्यांशी संवादही साधला. संकुलांचे आजचे उद्‌घाटन म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात नव भारताच्या आवश्यकता आणि आकांक्षा यांना अनुरूप देशाची राजधानी विकसित करण्याच्या दिशेने भारताने उचललेले आणखी एक पाऊल असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

नुतनीकरण केलेल्या जालियनवाला बाग स्मारकाच्या लोकार्पणानंतर पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 28th, 08:48 pm

पंजाबचे राज्यपाल श्री व्ही पी सिंह बदनोरजी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंहजी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री जी किशन रेड्डीजी, श्री अर्जुन राम मेघवालजी, श्री सोम प्रकाशजी, संसदेतले माझे सहकारी श्री श्वैत मलिकजी, कार्यक्रमात सहभागी सर्व आदरणीय मुख्यमंत्री महोदय, लोक-प्रतिनीधी, शहीदांचे कुटुंबिय, बंधू आणि भगिनींनो!

नूतनीकरण केलेल्या जालियनवाला बाग स्मारक संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण

August 28th, 08:46 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे नूतनीकरण केलेलया जालियनवाला बाग स्मारक संकुलाचे राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी स्मारकातील संग्रहालय दालनांचे उद्घाटनही केले. या कार्यक्रमात संकुलाच्या विकासासाठी सरकारने हाती घेतलेले अनेक विकास उपक्रम प्रदर्शित करण्यात आले. पंतप्रधानांनी पंजाबच्या शूर भूमीला आणि जालियनवाला बागच्या पवित्र मातीला वंदन केले. ज्यांच्यात पेटलेले स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग विझवण्यासाठी अभूतपूर्व अमानुषतेला सामोरे गेलेल्या भारतमातेच्या मुलांनाही त्यांनी सलाम केला.

नूतनीकृत जालियनवाला बाग स्मारकाची झलक

August 27th, 07:38 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी नूतनीकृत जालियनवाला बाग स्मारकाचे शनिवारी, 28 ऑगस्टला लोकार्पण करणार आहेत. या स्मारकात विकसित करण्यात आलेल्या संग्रहालयाच्या दालनांचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे स्मारक अद्ययावत करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या विविध विकासकामांचे दर्शनही या कार्यक्रमातून घडणार आहे.

जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते 28 ऑगस्ट रोजी लोकार्पण

August 26th, 06:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:25 वाजता जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण होणार आहे. ते यावेळी, स्मारकात बांधण्यात आलेल्या वस्तूसंग्रहालय दीर्घेचे उद्‌घाटन देखील करतील. यावेळी संकुल अद्ययावत करण्यासाठी सरकारने राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली जाईल.

जालियनवाला बाग हत्याकांडातील हुतात्म्यांना पंतप्रधानांकडून श्रद्धांजली समर्पित

April 13th, 09:25 am

जालियनवाला बाग हत्याकांडातील हुतात्म्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

शहीद दिनी पंतप्रधानांची शहिदांना श्रद्धांजली

March 23rd, 09:08 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या शहीद दिनी, भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.