1.5 लाख वेलनेस सेंटर्सच्या स्थापनेचे उद्दिष्ट गाठल्या बद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
December 29th, 09:00 pm
1.5 लाख आयुष्मान भारत – आरोग्य आणि निरामयता केंद्रांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे नव्या भारताला नवीन ऊर्जा मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की निरोगी नागरिकांमध्ये भारताची समृद्धी वसली आहे.कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा दोनशे कोटी मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
July 17th, 01:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञानावर विश्वास दाखविल्याबद्दल आणि कोविड 19 प्रतिबंधक लस मात्रांचा 200 कोटीचा टप्पा पार केल्याबद्दल देशवासीयांचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या डॉक्टर परिचारिका, वैज्ञानिक, पहील्या फळीतले कार्यकर्ते,संशोधक आणि उद्योजकांचे देखील अभिनंदन केले आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाने कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला बळकटी मिळेल आणि स्वस्थ राष्ट्र निर्माण होईल- पंतप्रधान
July 13th, 10:52 pm
15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवस देशातल्या 18 वर्षावरील नागरिकांना सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड प्रतिबंधक लसीची मोफत वर्धक मात्रा देण्याच्या निर्णयाने भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला बळकटी मिळेल आणि त्यामुळे स्वस्थ राष्ट्र निर्माण हाईल, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आझादी का अमृत महोत्सव #AzadiKaAmritMahotsav निमित्ताने केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला.15 ते 18 वर्षे वयोगटातील 50% हून अधिक किशोरवयीनांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
January 19th, 10:01 am
वय वर्षे 15 ते 18 या गटातील 50%हून जास्त किशोर, किशोरींना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.