आंतरराष्ट्रीय सहकार महासंघाच्या जागतिक सहकारी परिषदेचे पंतप्रधान आज करणार उद्घाटन

November 24th, 05:54 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज 25 नोव्हेंबर रोजी,दुपारी 3 वाजता,भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सहकार महासंघाच्या जागतिक सहकारी परीषद-2024(ICA, ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स) याचे उद्घाटन करतील तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचे पुढील वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष 2025 असल्याचे जाहीर करत, त्यांचा आरंभ करतील.