पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्य पदक पटकावणारी बॅडमिंटनपटू मनीषा रामदासचे केले अभिनंदन
September 02nd, 09:14 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला बॅडमिंटन SU5 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनचे महिला दुहेरीचे कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास आणि मनदीप कौर यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 27th, 12:37 am
चीनमध्ये हांगझू येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनचे महिला दुहेरीचे SL3-SU5 या श्रेणीतील कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास आणि मनदीप कौर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. या दोघींमधील आदर्श समन्वय आणि निर्धार यांची देखील त्यांनी प्रशंसा केली आहे.दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन महिला एकेरी SU5 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास चे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 26th, 02:38 pm
चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन महिला एकेरी SU5 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 च्या एसएल 3 -एसयू 5 प्रकारातील मिश्र बॅडमिंटन स्पर्धेत प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
October 25th, 04:46 pm
चीनच्या हाँगजाऊ इथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 च्या एसएल 3 -एसयू 5 प्रकारातील मिश्र बॅडमिंटन स्पर्धेत प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी या जोडीचे कौतुक केले आहे.