सौर आणि अंतराळ क्षेत्रात भारताने केलेल्या चमत्कारांमुळे जग विस्मयचकित: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

October 30th, 11:30 am

आताच आपण पवित्र छठ पूजेबद्दल, सूर्यदेवाच्या उपासनेबद्दल बोललो आहोत. मग सूर्याची उपासना करण्याबरोबरच त्याच्या वरदानाचीही चर्चा आज केली पाहिजे. 'सौर ऊर्जा'हे सूर्यदेवाचे वरदान आहे. सौरऊर्जा हा आज एक असा विषय आहे, ज्यात अवघ्या जगाला आपले भविष्य दिसते आहे आणि भारतासाठी तरशतकानुशतकेसूर्यदेव हे केवळ उपासनेच्याच नाही, तर अवघ्या जगण्याच्याही केंद्रस्थानी राहिले आहेत. भारत आज आपल्या पारंपारिक अनुभवांची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालतो आहे, त्यामुळेच आज सौरऊर्जेपासून वीज निर्माण करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये आपण समाविष्ट झालो आहोत. सौरऊर्जा आपल्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवून आणते आहे, हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे.

36 व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धा 2022 मधील 10 वर्षीय मल्लखांब खेळाडू शौर्यजितच्या कामगिरीचे पंतप्रधानांनी केले कौतुक

October 08th, 10:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात तरुण मल्लखांब खेळाडू शौर्यजितच्या 36 व्या राष्ट्रीय खेळ 2022 मधील कामगिरीचे कौतुक केले आहे.