घोषणा आणि करारांची सूची- मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुईझ्झू यांचा भारत दौरा (06 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2024)
October 07th, 03:40 pm
भारत आणि मालदीव्ज: व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षाविषयक भागीदारीसाठीच्या दृष्टिकोनाबाबत सहमतीभारत आणि मालदीव: सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षाविषयक भागीदारीसाठी दृष्टिकोन
October 07th, 02:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्झू यांनी आज, 7 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा व्यापक आढावा घेतला.दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणात मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या या देशांतील ऐतिहासिक घनिष्ठ आणि विशेष संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीची देखील त्यांनी नोंद घेतली.मालदीवचे राष्ट्रपती एच ई मोहम्मद मुइज्जू यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त वक्तव्याचा मजकूर
October 07th, 12:25 pm
दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यमांतील आमचे सहकारी, सर्वांना नमस्कार!मालदीवच्या अध्यक्षांसोबत पंतप्रधानांची भेट
December 01st, 09:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी, युएई मध्ये सीओपी -28 शिखर परिषदेच्या निमित्ताने मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली.77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी सर्व नेत्यांचे मानले आभार
August 15th, 04:21 pm
77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जागतिक नेत्यांनी केलेल्या अभिनंदनांचा स्वीकार करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
March 22nd, 03:34 pm
आजचा दिवस खूप विशेष आहे, खूप पवित्र आहे. आज पासून हिंदू कालगणनेच्या नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. मी आपणा सर्वांना आणि सर्व देशवासियांना विक्रम संवत्सर 2080 या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या एवढ्या विशाल देशामध्ये, विविधतेनं नटलेल्या देशामध्ये, युगानुयुगे वेगवेगळ्या प्रकारच्या कालगणना प्रचलित आहेत. कोल्लम कालगणनेची मल्याळम दिनदर्शिका आहे, तामिळ कालगणना आहे. या सर्व कालगणना, शेकडो वर्षांपासून भारताला तिथीं बद्दलची माहिती आणि ज्ञान पुरवत आल्या आहेत. विक्रम संवत्सर सुद्धा 2080 वर्ष आधीपासून चालत आलं आहे. ग्रेगरियन कालगणनेनुसार सध्या 2023 हे वर्ष सुरू आहे, मात्र विक्रम संवत्सर, 2023 च्या 57 वर्ष आधीपासून आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, दूरसंचार, माहिती संवाद तंत्रज्ञान आणि या गोष्टींशी संलग्न नवोन्मेष यांच्या बाबतीत खूपच मोठी सुरुवात भारतात होत आहे. आज इथे, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ- आय टी यू चं क्षेत्रीय कार्यालय आणि फक्त क्षेत्रीय कार्यालयच नाही, तर क्षेत्रीय कार्यालया सोबत नवोन्मेष केंद्राची स्थापना झाली आहे. याबरोबरच आज 6-जी चाचणी उपकरणाचही (टेस्ट बेड) उद्घाटन झालं आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करु पाहणाऱ्या आपल्या व्हिजन डॉक्युमेंट म्हणजेच उद्दिष्टनाम्याचं अनावरण सुद्धा करण्यात आलं आहे. यामुळे डिजिटल भारताला नवी ऊर्जा मिळण्यासोबतच, दक्षिण आशियासाठी, दक्षिण जगतासाठी, नवे उपाय, नवे नवोन्मेष उपलब्ध होणार आहेत. विशेष करून आपलं शैक्षणिक क्षेत्र, आपले नवंउद्योजक(स्टार्ट अप्स), नवोन्मेषक, आपलं उद्योगजगत यांच्यासाठी नवनव्या संधी निर्माण होणार आहेत.आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU)चं नवे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांचं पंतप्रधानांनी केलं उद्घाटन
March 22nd, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या एका कार्यक्रमात, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ ( इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन-ITU ) चे नवे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांचं उद्घाटन केलं.पंतप्रधानांनी भारत 6G व्हिजन डॉक्युमेंट या भविष्यकालीन आराखड्याच्या उद्दिष्टनाम्याचही अनावरण केलं आणि 6G च्या संशोधन आणि विकास चाचणी उपकरणाचं (टेस्ट बेड) उद्घाटन केलं. खोदकामांच्या अनुषंगानं सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या ‘कॉल बिफोर यू डिग’ या अॅपचही उद्घाटन, त्यांनी केलं. ITU, ही माहिती आणि संवाद तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी-ICT) साठी, संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेली विशेष संस्था आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापनेसाठी, भारतानं ITU सोबत मार्च 2022 मध्ये, यजमान देश करारावर स्वाक्षरी केली. यामुळे, भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान आणि इराण या देशांना सेवा मिळून, या राष्ट्रांमधील आपापसातील समन्वय आणि या प्रदेशांना परस्पर लाभदायक ठरणारं आर्थिक सहकार्य वाढेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आय टी यू च्या क्षेत्रीय कार्यालयाचे आणि नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन करणार
March 21st, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आय टी यू च्या भारतातील क्षेत्रीय कार्यालयाचे आणि नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान, भारत 6G पथदर्शी दस्तावेज आणि 6G संशोधन आणि विकास टेस्ट बेड ह्या सुविधेचे अनावरण करतील. पंतप्रधानांच्या हस्ते ‘कॉल बिफोर यू डिग’ ॲप चे अनावरण देखील होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.पंतप्रधानांनी 'अॉपरेशन दोस्त' या तुर्कीए आणि सिरियातील भूकंपग्रस्त क्षेत्रात काम करून मायदेशी परत आलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि बचाव दलाच्या जवानांशी साधलेल्या संवादाचे मराठी भाषांतर
February 20th, 06:20 pm
तुम्ही सर्व जण मानवतेसाठी एक खूप मोठे कार्य करून परतले आहात. ऑपरेशन दोस्तशी संबंधित संपूर्ण टीम, मग ते एनडीआरएफ असो, लष्कर असो, हवाई दळ असो किंवा आमचे इतर सेवा भागीदार असोत, त्यांनी अप्रतिम काम केले आहे. आणि एवढेच नव्हे तर आमच्या मुक्या मित्रांनी, श्वान पथकातील सदस्यांनीही अद्भुत क्षमता दाखवली आहे. देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे.भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’ मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफच्या जवानांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
February 20th, 06:00 pm
भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांचे मानले आभार
January 26th, 09:43 pm
भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आहेत.76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले जागतिक नेत्यांचे आभार
August 15th, 10:47 pm
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.मालदिवच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत भारत दौऱ्यातील फलनिष्पत्तींची यादी
August 02nd, 10:20 pm
ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचा पहिला टप्पा- 500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा भारत अर्थसहाय्यित प्रकल्प- कायमस्वरूपी कामांची सुरूवातमालदीवच्या अध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यानचे भारत-मालदीव संयुक्त निवेदन
August 02nd, 10:18 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महामहीम श्री इब्राहीम मोहमद सोलिह भारताच्या औपचारिक भेटीवर आले आहेत.मालदीवच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन
August 02nd, 12:30 pm
सर्वप्रथम, मी माझे मित्र राष्ट्रपती सोलिह आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे भारतात स्वागत करतो. गेल्या काही वर्षांत भारत आणि मालदीव यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये नवा उत्साह आला आहे, आपल्यातील जवळीक वाढली आहे. महामारीमुळे आव्हाने निर्माण होऊनही आपले सहकार्य व्यापक भागीदारीमध्ये बदलत आहे.पंतप्रधानांनी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेसाठी शुभेच्छा दिल्या
February 25th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेसाठी आणि त्यातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.IPS Probationers interact with PM Modi
July 31st, 11:02 am
PM Narendra Modi had a lively interaction with the Probationers of Indian Police Service. The interaction with the Officer Trainees had a spontaneous air and the Prime Minister went beyond the official aspects of the Service to discuss the aspirations and dreams of the new generation of police officers.सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन
July 31st, 11:01 am
आपल्या सर्वांशी संवाद साधून मला खूप छान वाटले. दरवर्षी माझा असा प्रयत्न असतो, की आपल्यासारख्या तरुण मित्रांशी संवाद साधावा, आपले विचार जाणून घ्यावे. आपण सांगितलेल्या गोष्टी आपले प्रश्न, आपली उत्सुकता, हे सगळे मला भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरतात.पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये आयपीएस प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला
July 31st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे आयपीएस प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद देखील साधला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय उपस्थित होते.संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अब्दुल्ला शाहीद यांनी 23 जुलै 2021 रोजी घेतली पंतप्रधानांची भेट
July 23rd, 06:37 pm
यूएनजीए म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 76 व्या सत्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मा.अब्दुल्ला शाहीद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.