"सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा" या विषयावरील जी 20 सत्रात पंतप्रधानांचे भाषण
November 18th, 08:00 pm
सुरुवातीलाच, जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनासाठी केलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल तसेच यशस्वी जी 20 अध्यक्षतेसाठी अध्यक्ष लुला यांचे अभिनंदन करू इच्छितो.सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा या विषयावरील जी 20 सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
November 18th, 07:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा’ या विषयावरील जी 20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला आज संबोधित केले. शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि प्रेमळ आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे अध्यक्ष महामहिम लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांचे आभार मानले. शाश्वत विकास उद्दिष्टांवर केंद्रित ब्राझीलच्या जी 20 कार्यक्रम पत्रिकेचे त्यांनी कौतुक केले. हा दृष्टिकोन ग्लोबल साऊथच्या समस्या अधोरेखित करतो तसेच नवी दिल्ली जी 20 शिखर परिषदेचे लोककेंद्रित निर्णय पुढे नेतो असे पंतप्रधानांनी नमूद केले. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य साठी भारतीय जी 20 अध्यक्षतेने दिलेला नारा रिओ चर्चेत देखील गुंजत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.