पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे मलेरियावर आश्चर्यकारकरीत्या मात, आरोग्यसेवेत क्रांती जेपी नड्डा

December 16th, 10:06 am

भारताने मलेरिया संसर्गाचे प्रमाण 69% नी कमी केले असून बाधितांची संख्या 2017 ते 2023 या काळात 6.4 दशलक्ष वरून अवघ्या 2 दशलक्षवर आणून उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे – हे मोठे यश मिळण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लक्ष्यकेंद्रित धोरणे आणि त्यांचे नेतृत्वाला कारणीभूत आहे. 2030 पर्यंत मलेरियाचे उच्चाटन करण्याच्या 2015 मध्ये पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या उद्दिष्टाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे.