The relationship between India and Kuwait is one of civilizations, seas and commerce: PM Modi

December 21st, 06:34 pm

PM Modi addressed a large gathering of the Indian community in Kuwait. Indian nationals representing a cross-section of the community in Kuwait attended the event. The PM appreciated the hard work, achievement and contribution of the community to the development of Kuwait, which he said was widely recognised by the local government and society.

Prime Minister Shri Narendra Modi addresses Indian Community at ‘Hala Modi’ event in Kuwait

December 21st, 06:30 pm

PM Modi addressed a large gathering of the Indian community in Kuwait. Indian nationals representing a cross-section of the community in Kuwait attended the event. The PM appreciated the hard work, achievement and contribution of the community to the development of Kuwait, which he said was widely recognised by the local government and society.

माजी उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या जीवन आणि प्रवासावरील पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

June 30th, 12:05 pm

उद्या 1 जुलै रोजी व्यंकैय्या नायडू यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या जीवनयात्रेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ही 75 वर्षे असामान्य कामगिरीने परिपूर्ण आहेत. या 75 वर्षांतील टप्पे आश्चर्यकारक आहेत. आज त्यांच्या आत्मचरित्रासह आणखी दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. मला विश्वास आहे की ही पुस्तके लोकांना प्रेरणा देतील आणि त्यांना देशसेवेसाठी योग्य मार्गदर्शन करतील.

माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे जीवन आणि कारकीर्द यावरील तीन पुस्तकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन

June 30th, 12:00 pm

पंतप्रधानांनी जारी केलेल्या पुस्तकांमध्ये ((i) माजी उपराष्ट्रपतींचे चरित्र “वेंकैया नायडू – लाइफ इन सर्व्हिस” हे द हिंदूंच्या हैदराबाद आवृत्तीचे माजी निवासी संपादक एस नागेश कुमार यांनी लिहिलेले पुस्तक. (ii) “सेलिब्रेटिंग भारत – द मिशन अँड मेसेज ऑफ श्री एम व्यंकय्या नायडू ॲज थर्टींथ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया”, हे उपराष्ट्रपतींचे माजी सचिव डॉ. आय.व्ही. सुब्बाराव यांनी संकलित केलेले फोटो क्रॉनिकल आणि (iii) महानेता - लाईफ अँड जर्नी ऑफ श्री एम. व्यंकय्या नायडू नावाचे संजय किशोर यांनी लिहिलेले तेलुगु भाषेतील चित्रमय चरित्र, यांचा समावेश आहे.

राम प्रत्येकाच्या हृदयात आहे: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

January 28th, 11:30 am

यावेळी देशातील अनेकांनी राम भजने गाउन श्री रामाच्या चरणी समर्पित केली. 22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती लावून दिवाळी साजरी केली. या काळात, देशाने सामूहिकतेमधील शक्ती पाहिली. ही सामूहिकतेची शक्ती आपल्या विकसित भारतासाठी केलेल्या संकल्पांचादेखील एक प्रमुख आधार आहे. मी देशवासियांना, मकर संक्रांती ते 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याची विनंती केली होती. हे ऐकून मला आनंद झाला की लाखो लोक ह्या अभियानात भक्तीभावाने सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या परिसरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली. अनेक लोकांनी मला यासंबंधीची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवले आहेत. ही भावना, ही इच्छा कधीच संपू नये, ही मोहीम थांबू नये. सामूहिकतेची हीच शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल.

पीएम-जनमन योजने अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या एक लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 15th, 12:15 pm

जोहार, राम-राम। सध्या देशात उत्सवाचे वातावरण आहे. उत्तरायण, मकर संक्रांती, पोंगल, बिहू अशा अनेक सणांचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. आजच्या या कार्यक्रमामुळे हा उत्साह अधिकच दिमाखदार आणि चैतन्यमय झाला आहे, आणि तुमच्याशी बोलणे, ही माझ्यासाठी मोठी पर्वणी ठरली आहे. आज एकीकडे अयोध्येत दिवाळी साजरी होत आहे, तर दुसरीकडे माझे एक लाख वंचित आदिवासी बंधू-भगिनी, जे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत, माझे हे आदिवासी कुटुंबीय, अती वंचित आदिवासी कुटुंब, त्यांच्या घरी दिवाळी साजरी होत आहे, ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. आज त्यांच्या बँक खात्यात पक्क्या घरासाठी पैसे जमा केले जात आहेत. या सर्व कुटुंबांचे मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. हे पुण्य कर्म करण्याची संधी मला मिळाली, ही माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

पंतप्रधानांनी पीएम-जनमन अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण)च्या एक लाख लाभार्थ्यांना जारी केला पहिला हप्ता

January 15th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM-JANMAN)अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण) (PMAY - G)च्या एक लाख लाभार्थ्यांना आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पहिला हप्ता जारी केला. यावेळी पंतप्रधानांनी पीएम-जनमनच्या लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.

पंतप्रधानांनी मकर संक्रांतीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा.

January 15th, 09:38 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मकर संक्रांती निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्लीत पोंगल उत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 14th, 12:00 pm

पोंगलच्या पवित्र दिनी, तामिळनाडूच्या प्रत्येक घरात पोंगलच्या धारेचा प्रवाह असतो. माझी अशी इच्छा आहे, की आपल्या आयुष्यात देखील सुख समृद्धी आणि समाधानाच्या धारेचा हा प्रवाह असाच निरंतर वाहत राहो. कालच देशभरात लोहडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. काही ठिकाणी आज मकर संक्रांती उत्तरायण साजरे केले जात आहे, तर काही ठिकाणी, ते कदाचित उद्या साजरे केले जाईल. माघ बिहू देखील, आता येणारच आहे. मी या सर्व सण-उत्सवांसाठी सर्व देशबांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो, माझ्या शुभकामना त्यांच्या सोबत आहेत.

पंतप्रधानांनी नवी दिल्लीत पोंगल उत्सवात घेतला सहभाग

January 14th, 11:30 am

पंतप्रधानांनी पोंगल निमित्त शुभेच्छा दिल्या आणि या प्रसंगी संबोधित करताना ते म्हणाले की तामिळनाडूमध्ये प्रत्येक घरात या उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधानाचा प्रवाह सतत वाहत राहो, अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या. काल साजरा झालेला लोहरी उत्सव, आज साजरा होत असलेले मकर उत्तरायण, उद्या साजरी होणारी मकर संक्रांती आणि लवकरच होणारी माघ बिहूची सुरुवात याचाही त्यांनी उल्लेख केला. सध्या देशभर सुरू असलेल्या उत्सवाच्या कालावधीसाठी मोदी यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

अयोध्यातल्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

December 30th, 02:15 pm

अयोध्येच्या सर्व लोकांना माझे नमस्कार. आज सर्व जग उत्सुकतेने 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. अशावेळी अयोध्यावासीयांमध्ये असलेला हा उत्साह, उत्सुकता अगदी साहजिक आहे. मी भारताच्या मातीच्या कणाकणाचा आणि व्यक्ती व्यक्तीचा पुजारी आहे आणि आपल्या प्रमाणे मीसुद्धा तितकाच उत्सुक आहे. आपल्या सर्वांचा हा उत्साह, ही उत्सुकता थोड्या वेळापूर्वी अयोध्येच्या रस्त्यांवर देखील दिसून येत होती. असं वाटत होतं की संपूर्ण अयोध्या नगरीच रस्त्यावर उतरली आहे. हे प्रेम, हा आशीर्वाद यासाठी मी आपले मनापासून आभार मानतो. माझ्याबरोबर म्हणा सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय

पंतप्रधानांनी अयोध्या धाम येथे 15,700 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी

December 30th, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्या धाम येथे 15,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमीपूजन केले. यामध्ये अयोध्या आणि सभोवतालच्या भागांच्या विकासाच्या 11,100 कोटी रुपये खर्चाच्या आणि उत्तर प्रदेशातील 4,600 कोटी रुपये खर्चाच्या इतर प्रकल्पांचा समावेश आहे.

जयपूर येथे ‘खेल महाकुंभ’ कार्यक्रमामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 05th, 05:13 pm

सर्वप्रथम या जयपूर ‘महाखेल’मध्ये पदक जिंकलेल्या आणि सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूचं, प्रशिक्षकांचं आणि त्यांच्या कुटुंबि‍यांचं खूप खूप अभिनंदन! तुम्ही सर्वजण जयपूरच्या मैदानात फक्त खेळण्यासाठी उतरला नाहीत, तर तुम्ही जिंकण्यासाठी उतरलात, काही तरी शिकण्यासाठी उतरलात. आणि जिथे शिकायची उमेद असते तिथे एकप्रकारे विजय निश्चित मिळतोच मिळतो. कोणताही खेळाडू मैदानातून रिकाम्या हातानं परतत नाही, प्रत्येकाला हे मैदान काही ना काही तरी देतच असतं

पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जयपूर महाखेलला केले संबोधित

February 05th, 12:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जयपूर महाखेलला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी एका कबड्डी सामन्याचा आनंदही लुटला. जयपूर ग्रामीण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री राज्यवर्धन सिंह राठोड हे 2017 पासून जयपूर महाखेल या क्रीडा उपक्रमाचं आयोजन करत आहेत.

सिकंदराबाद- विशाखापट्टणम वंदे भारत रेल्वेगाडीला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 15th, 10:30 am

नमस्कार, तेलंगणाच्या राज्यपाल, डॉक्टर तमिलिसै सौंदरराजन जी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी,केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी जी, तेलंगणाचे मंत्री मोहम्मद महमूद अली गारू, टी श्रीनिवास यादव, संसदेतले माझे सहकारी, माझे मित्र बंडी संजय गारू, के लक्ष्मण गारू, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू-भगिनींनो,

सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवला हिरवा झेंडा

January 15th, 10:11 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. भारतीय रेल्वेने सुरू केलेली ही आठवी वंदे भारत एक्सप्रेस आहे, तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी ही पहिली रेल्वे असणार आहे. ही रेल्वे या भागातील 700 किलोमीटर भागातून धावेल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर तसेच तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर ही गाडी थांबा घेईल.

पंतप्रधानांनी मकर संक्रांतीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा.

January 15th, 09:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

जगातील सर्वाधिक लांबीच्या एमव्ही गंगा विलास या रिव्हर क्रूझला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्याच्या आणि वाराणसीच्या टेंट सिटीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 13th, 10:35 am

आज आकांक्षांनी भरलेला लोहरीचा सण आहे. आगामी दिवसात आपण उत्तरायण, मकर संक्रांत, भोगी, बिहू, पोंगल यांसारखे अनेक सण देखील साजरे करणार आहोत. मी देशात आणि जगामध्ये हे सण साजरे करत असलेल्या सर्व लोकांना शुभेच्छा देत आहे, शुभकामना देत आहे.

पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वाराणसीमध्ये जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ - एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले

January 13th, 10:18 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे वाराणसी येथे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ-एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवला आणि टेंट सिटीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात त्यांनी 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अन्य देशांतर्गत जलमार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी देखील केली. रिव्हर क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान करत असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, या सेवेच्या प्रारंभामुळे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेली रिव्हर क्रूझची प्रचंड क्षमता वापरात येईल आणि भारतासाठी रिव्हर क्रूझ पर्यटनाच्या नव्या युगाचा प्रारंभ करेल.

Vision of self-reliant India embodies the spirit of global good: PM Modi in Indonesia

November 15th, 04:01 pm

PM Modi interacted with members of Indian diaspora and Friends of India in Bali, Indonesia. He highlighted the close cultural and civilizational linkages between India and Indonesia. He referred to the age old tradition of Bali Jatra” to highlight the enduring cultural and trade connect between the two countries.