नवी दिल्लीत वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 26th, 04:10 pm
आज देश पहिला 'वीर बाल दिवस' साजरा करत आहे. ज्या दिवशी, ज्या बलिदानासाठी पिढ्यानपिढ्या आपण ज्या बलिदानाचे स्मरण करत आलो आहोत, आज एक राष्ट्र म्हणून एकजुटीने त्यांना वंदन करण्याची एक नवीन सुरुवात झाली आहे. शहीद सप्ताह आणि हा वीर बाल दिवस आपल्या शीख परंपरेसाठी नक्कीच भावनांनी भरलेला आहे, मात्र त्याच्याशी आकाशासारख्या चिरंतन प्रेरणा देखील जोडलेल्या आहेत. शौर्य दाखवण्यासाठी पराकाष्ठा करताना वय कमी असले तरी काही फरक पडत नाही, याची आठवण 'वीर बाल दिवस' आपल्याला करून देईल. वीर बाल दिवस' आपल्याला याची आठवण करून देईल की, दहा गुरूंचे योगदान काय आहे, देशाच्या स्वाभिमानासाठी शीख परंपरेचे बलिदान काय आहे! हा 'वीर बाल दिवस' आपल्याला सांगेल की -भारत काय आहे, भारताची अस्मिता काय आहे ! दरवर्षी वीर बाल दिवसाचा हा पुण्य सोहळा आपल्याला आपला भूतकाळ ओळखण्याची आणि भविष्यातील भविष्य घडवण्याची प्रेरणा देईल. भारताच्या तरुण पिढीचे सामर्थ्य काय आहे, भारताच्या तरुण पिढीने भूतकाळात देशाचे कशाप्रकारे संरक्षण केले आहे, आपल्या तरुण पिढीने भारताला मानवतेच्या गडद अंधारातून कसे बाहेर काढले आहे, याचा जयघोष 'वीर बाल दिवस' पुढील अनेक दशके आणि शतके करेल.दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर ‘वीर बाल दिनानिमित्त होत असलेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
December 26th, 12:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर ‘वीर बाल दिनानिमित्त होत असलेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान, सुमारे तीनशे बाल कीर्तनकारांनी सादर केलेल्या ‘शबद कीर्तन’ या कार्यक्रमाला देखील पंतप्रधान उपस्थित राहिले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी पंतप्रधानांनी झेंडा दाखवून, दिल्लीतील सुमारे तीन हजार मुलांनी काढलेल्या संचलन फेरीचा (मार्च पास्ट) देखील शुभारंभ केला.