उत्तर प्रदेशातील मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 02nd, 01:01 pm

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, येथील लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री संजीव बाल्यान जी, व्ही के सिंहजी, मंत्री श्री दिनेश खटीकजी , श्री उपेंद्र तिवारीजी, श्री कपिल देव अग्रवालजी , संसदेतील माझे सहकारी श्री सत्यपाल सिंहजी , राजेंद्र अग्रवालजी , विजयपाल सिंह तोमरजी , श्रीमती कांता कर्दमजी , आमदार भाई सोमेंद्र तोमरजी , संगीत सोमजी , जितेंद्र सतवालजी, सत्य प्रकाश अग्रवालजी, मेरठ जिल्हा परिषद अध्यक्ष गौरव चौधरीजी, मुझफ्फरनगर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरपालजी, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि मेरठ-मुझफ्फरनगर, दूरदूरवरून आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्हा सर्वांना 2022 च्या खूप खूप शुभेच्छा.

उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

January 02nd, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली.अंदाजे 700 कोटी रुपये खर्चून या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल आणि सिंथेटिक हॉकी मैदान, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल/व्हॉलीबॉल/हँडबॉल/कबड्डी मैदान, लॉन टेनिस कोर्ट, जिम्नॅशियम हॉल, सिंथेटिक रनिंग स्टेडियम, जलतरण तलाव, बहुउद्देशीय सभागृह आणि सायकल शर्यतीसाठी असणारे रिंगण यासह आधुनिक आणि अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांनी हे विद्यापीठ सुसज्ज असेल. विद्यापीठात नेमबाजी, स्क्वॉश, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन, तिरंदाजी, कॅनोईंग आणि कयाकिंग इत्यादी सुविधाही उपलब्ध असतील.या विद्यापीठात 540 महिला आणि 540 पुरुष खेळाडूंसह 1080 खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल.

पंतप्रधान 2 जानेवारीला मेरठला भेट देणार

December 31st, 11:11 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 2 जानेवारी 2022 रोजी मेरठला भेट देणार असून दुपारी 1 वाजता तेथील मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करणार आहेत. मेरठमधील सरधना भागातील सलावा आणि कैली या गावांत सुमारे 700 कोटी रुपये खर्चून हे विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे.

उत्तर प्रदेशातील झाशी येथे 'राष्ट्र रक्षा समर्पण पर्व' मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 19th, 05:39 pm

जौन धरती पै हमाई रानी लक्ष्मीबाई जू ने, आजादी के लाने, अपनो सबई न्योछार कर दओ, वा धरती के बासियन खों हमाऔ हाथ जोड़ के परनाम पौंचे। झाँसी ने तो आजादी की अलख जगाई हती। इतै की माटी के कन कन में, बीरता और देस प्रेम बसो है। झाँसी की वीरांगना रानी लक्ष्मी बाई जू को, हमाओ कोटि कोटि नमन।

उत्तर प्रदेशातील झाशी येथे ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ला पंतप्रधानांची उपस्थिती

November 19th, 05:38 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथे ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ला उपस्थिती दर्शवली. झाशी किल्ल्याच्या परिसरात आयोजित ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ या भव्य समारंभात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्रालयाच्या अनेक नवीन उपक्रमांचे राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माजी छात्र संघटनेचा शुभारंभ, या संघटनेत पंतप्रधानांनी पहिले सदस्य म्हणून नोंदणी केली ; यासह एनसीसी छात्रांसाठी सदृशीकरण प्रशिक्षणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा शुभारंभ; राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्मा वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभारलेला मंडप ; राष्ट्रीय युद्ध स्मारक मोबाईल अॅप; भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आरेखन आणि विकसित केलेले अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट 'शक्ती'; हलके लढाऊ हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांचा समावेश आहे. उत्तरप्रदेश संरक्षण औद्योगिक मार्गिकेच्या झाशी नोड येथे भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या 400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

August 29th, 11:30 am

आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.

निवारा, वीज, शौचालये, गॅस, रस्ते, रुग्णालये आणि शाळा यांसारख्या मुलभूत सुविधा नसण्याचे परिणाम महिलांना विशेषतः गरीब महिलांना भोगावे लागतात : पंतप्रधान

August 10th, 10:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिला सबलीकरणाबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचे सविस्तर विवेचन केले. घर, वीज, शौचालये, गॅस, रस्ते, रुग्णालये आणि शाळा यांसारख्या सुविधा उपलब्ध नसण्याचा परिणाम महिलांनाच विशेषतः गरीब महिलांना अधिक प्रमाणात भोगावे लागतात असं ते म्हणाले. आता आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत असताना गेल्या सात दशकातील प्रगतीचा वेध घेताना या मुलभूत प्रश्नांना काही दशकांपूर्वीच हात घातला जायला हवा होता अशी अटळ भावना मनात येते. आज उत्तर प्रदेशातील माहोबामध्ये उज्ज्वला 2.0 योजनेचा आरंभ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करताना ते बोलत होते.

उज्ज्वला 2.0 योजनेच्या उत्तर प्रदेशात झालेल्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

August 10th, 12:46 pm

आज आपल्या सर्वांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की, आता थोड्या दिवसांतच राखी पौर्णिमेचा सणही येतोय. आज मला या सणाच्या आधीच, ॲडव्हान्समध्ये माता-भगिनींचे आशीर्वाद मिळत आहेत. आणि त्याचबरोबर या काळात देशातल्या कोट्यवधी गरीब, दलित, वंचित, मागास, आदिवासी कुटुंबातल्या भगिनींना आज आणखी एक भेट देण्याची संधी मिळाली आहे. आज उज्ज्वला योजनेच्या पुढच्या टप्प्यामध्ये अनेक भगिनींना मोफत गॅस जोडणी आणि गॅस शेगडी मिळत आहे. या सर्व लाभार्थींचे मी पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो.

पंतप्रधानांकडून उत्तर प्रदेशात महोबा येथे उज्ज्वला 2.0 योजनेचा शुभारंभ

August 10th, 12:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात महोबा येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) जोडण्या देऊन उज्ज्वला 2.0 (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- पीएमयूवाय) योजनेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

खेल रत्न पुरस्काराचे आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून नामकरण – पंतप्रधान

August 06th, 02:15 pm

खेल रत्न पुरस्कारांना मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची विनंती नागरिकांकडून केली जात होती. लोक भावनांचा आदर करत खेल रत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.