राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना वाहिली आदरांजली.
August 29th, 10:25 am
प्रत्येक तरुण भारतीय खेळ खेळण्याची आणि या क्षेत्रात चमकण्याची आकांक्षा पूर्ण करू शकेल अशी परिसंस्था निर्माण करण्यासाठी सर्व स्तरांवर क्रीडा क्षेत्राला पाठबळ देण्याप्रती सरकारच्या कटिबद्धतेचा देखील पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला.महाराष्ट्रातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 12th, 01:15 pm
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अनुराग ठाकूर , भारती पवार , निसिथ प्रामाणिक , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार जी , सरकारचे इतर मंत्री , इतर मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो , आज भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे . हा दिवस त्या महान व्यक्तीला समर्पित आहे ज्याने गुलामगिरीच्या काळात भारताला नवीन उर्जेने भारले होते . हे माझे सौभाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी मी नाशिकमध्ये तुम्हा सर्व तरुणांमध्ये उपस्थित आहे. मी तुम्हा सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज भारताच्या नारीशक्तीचे प्रतीक असलेल्या राजमाता जीजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीदिनी त्यांना वंदन करण्यासाठी, मला महाराष्ट्राच्या वीर भूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो!पंतप्रधानांनी नाशिक येथे केले 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन
January 12th, 12:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पंतप्रधान मोदी यांनी पुष्पांजली अर्पण केली. राज्य पथकांच्या संचालनाचे निरीक्षण त्यांनी केले आणि 'विकसित भारत @ 2047 -युवांसाठी, युवांच्या माध्यमातून' ही संकल्पना असलेल्या ,जिम्नॅस्टिक, मलखांब, योगासने आणि राष्ट्रीय युवा महोत्सव गीताचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला.राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व क्रीडापटूंना दिल्या शुभेच्छा
August 29th, 08:54 am
राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या आहेत.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधानांनी क्रीडापटूंना दिल्या शुभेच्छा
August 29th, 09:05 am
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या आहेत. महान भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली आहे.उत्तर प्रदेशातील जालौन येथे बुंदेलखंड द्रुतगती मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 16th, 04:17 pm
उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, उप-मुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि इथले रहिवासी भानूप्रताप सिंह जी, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिगण, खासदार, आमदार, अन्य लोक प्रतिनिधी आणि बुंदेलखंडच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधानांची उत्तर प्रदेशला भेट आणि बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचे केले उद्घाटन
July 16th, 10:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात जलौनच्या ओराई तालुक्यातील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.उत्तर प्रदेशातील मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 02nd, 01:01 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, येथील लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री संजीव बाल्यान जी, व्ही के सिंहजी, मंत्री श्री दिनेश खटीकजी , श्री उपेंद्र तिवारीजी, श्री कपिल देव अग्रवालजी , संसदेतील माझे सहकारी श्री सत्यपाल सिंहजी , राजेंद्र अग्रवालजी , विजयपाल सिंह तोमरजी , श्रीमती कांता कर्दमजी , आमदार भाई सोमेंद्र तोमरजी , संगीत सोमजी , जितेंद्र सतवालजी, सत्य प्रकाश अग्रवालजी, मेरठ जिल्हा परिषद अध्यक्ष गौरव चौधरीजी, मुझफ्फरनगर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरपालजी, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि मेरठ-मुझफ्फरनगर, दूरदूरवरून आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्हा सर्वांना 2022 च्या खूप खूप शुभेच्छा.उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
January 02nd, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली.अंदाजे 700 कोटी रुपये खर्चून या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल आणि सिंथेटिक हॉकी मैदान, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल/व्हॉलीबॉल/हँडबॉल/कबड्डी मैदान, लॉन टेनिस कोर्ट, जिम्नॅशियम हॉल, सिंथेटिक रनिंग स्टेडियम, जलतरण तलाव, बहुउद्देशीय सभागृह आणि सायकल शर्यतीसाठी असणारे रिंगण यासह आधुनिक आणि अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांनी हे विद्यापीठ सुसज्ज असेल. विद्यापीठात नेमबाजी, स्क्वॉश, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन, तिरंदाजी, कॅनोईंग आणि कयाकिंग इत्यादी सुविधाही उपलब्ध असतील.या विद्यापीठात 540 महिला आणि 540 पुरुष खेळाडूंसह 1080 खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल.पंतप्रधान 2 जानेवारीला मेरठला भेट देणार
December 31st, 11:11 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 2 जानेवारी 2022 रोजी मेरठला भेट देणार असून दुपारी 1 वाजता तेथील मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करणार आहेत. मेरठमधील सरधना भागातील सलावा आणि कैली या गावांत सुमारे 700 कोटी रुपये खर्चून हे विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे.भारताच्या विकास गाथेचा हाच टर्निंग पॉईंटः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 28th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा मन की बात साठी एकमेकांसमोर आलो आहोत. अवघ्या दोन दिवसानंतर डिसेंबर महिना सुरू होणार आहे आणि डिसेंबर महिना आला की मनाला असे वाटू लागते की चला, हे वर्ष संपले. हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यात आपण नव्या वर्षासाठीचे संकल्प विचारात घेऊ लागतो. या महिन्यात आपला देश नौदल दिवस आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करतो. येत्या 16 डिसेंबर रोजी आपला देश 1971च्या युद्धाचे स्वर्ण जयंती वर्ष साजरे करत आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. या सर्व दिनविशेषांनिमित्त मी देशाच्या संरक्षण दलांचे स्मरण करतो, आपल्या वीरांचे स्मरण करतो. आणि विशेष म्हणजे अशा वीरांना जन्म देणाऱ्या वीर मातांचे स्मरण करतो. नेहमीप्रमाणेच या वेळीसुद्धा मला नमो ॲप आणि माय गव्ह वर आपणा सर्वांकडून अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. आपण सर्वांनीच मला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानले आहे आणि आपल्या आयुष्यातली सुख-दुःखे माझ्यासोबत वाटून घेतली आहेत. या सर्वांमध्ये अनेक युवा आहेत, विद्यार्थी- विद्यार्थिनी आहेत. मन की बात चे आपले हे कुटुंब सातत्याने वाढते आहे, मनांशीही जोडले जाते आहे, उद्दिष्टांनीही जोडले जाते आहे आणि परिणामी दृढ होणाऱ्या आपल्या या नात्यामुळे आपल्या अंतर्मनात सातत्याने सकारात्मकतेचा एक प्रवाह खेळता राहतो आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
August 29th, 11:30 am
आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.निवारा, वीज, शौचालये, गॅस, रस्ते, रुग्णालये आणि शाळा यांसारख्या मुलभूत सुविधा नसण्याचे परिणाम महिलांना विशेषतः गरीब महिलांना भोगावे लागतात : पंतप्रधान
August 10th, 10:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिला सबलीकरणाबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचे सविस्तर विवेचन केले. घर, वीज, शौचालये, गॅस, रस्ते, रुग्णालये आणि शाळा यांसारख्या सुविधा उपलब्ध नसण्याचा परिणाम महिलांनाच विशेषतः गरीब महिलांना अधिक प्रमाणात भोगावे लागतात असं ते म्हणाले. आता आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत असताना गेल्या सात दशकातील प्रगतीचा वेध घेताना या मुलभूत प्रश्नांना काही दशकांपूर्वीच हात घातला जायला हवा होता अशी अटळ भावना मनात येते. आज उत्तर प्रदेशातील माहोबामध्ये उज्ज्वला 2.0 योजनेचा आरंभ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करताना ते बोलत होते.उज्ज्वला 2.0 योजनेच्या उत्तर प्रदेशात झालेल्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 10th, 12:46 pm
आज आपल्या सर्वांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की, आता थोड्या दिवसांतच राखी पौर्णिमेचा सणही येतोय. आज मला या सणाच्या आधीच, ॲडव्हान्समध्ये माता-भगिनींचे आशीर्वाद मिळत आहेत. आणि त्याचबरोबर या काळात देशातल्या कोट्यवधी गरीब, दलित, वंचित, मागास, आदिवासी कुटुंबातल्या भगिनींना आज आणखी एक भेट देण्याची संधी मिळाली आहे. आज उज्ज्वला योजनेच्या पुढच्या टप्प्यामध्ये अनेक भगिनींना मोफत गॅस जोडणी आणि गॅस शेगडी मिळत आहे. या सर्व लाभार्थींचे मी पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो.पंतप्रधानांकडून उत्तर प्रदेशात महोबा येथे उज्ज्वला 2.0 योजनेचा शुभारंभ
August 10th, 12:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात महोबा येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) जोडण्या देऊन उज्ज्वला 2.0 (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- पीएमयूवाय) योजनेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.खेल रत्न पुरस्काराचे आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून नामकरण – पंतप्रधान
August 06th, 02:15 pm
खेल रत्न पुरस्कारांना मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची विनंती नागरिकांकडून केली जात होती. लोक भावनांचा आदर करत खेल रत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडापटूंना दिल्या शुभेच्छा; महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना वाहिली आदरांजली
August 29th, 10:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली.Fitness is not just a word but a pre-condition for healthy and fulfilling life: PM Modi
August 29th, 10:01 am
PM Narendra Modi launched the FIT India movement today. Speaking at the event, PM Modi said, A fit mind in a fit body is important. PM Modi further said lifestyle diseases are on the rise due to lifestyle disorders and we can ensure we don't get them by being fitness-conscious. The Prime Minister also urged people to make the FIT India movement a Jan Andolan.PM Modi launches FIT India movement
August 29th, 10:00 am
PM Narendra Modi launched the FIT India movement today. Speaking at the event, PM Modi said, A fit mind in a fit body is important. PM Modi further said lifestyle diseases are on the rise due to lifestyle disorders and we can ensure we don't get them by being fitness-conscious. The Prime Minister also urged people to make the FIT India movement a Jan Andolan.PM greets sports enthusiasts on National Sports Day
August 29th, 09:42 am
The Prime Minister Shri Narendra Modi has greeted sports enthusiasts on National Sports Day.