पंतप्रधानांनी महात्मा गांधींना वाहिली आदरांजली
November 21st, 09:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गयानामध्ये जॉर्ज टाऊन इथल्या ऐतिहासिक प्रोमनेड गार्डनला भेट दिली आणि तिथल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली. बापूंचे शांतता व अहिंसा याबाबतचे विचार मानवतेला नेहमीच मार्गदर्शन करतील असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 1969 मध्ये गांधीजींच्या शंभराव्या जयंतीनिमित्त हा पुतळा उभारण्यात आला.आज जगभरातील लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
October 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांसोबत स्वच्छता मोहिमेत झाले सहभागी
October 02nd, 04:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत लहान शाळकरी मुलांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आणि स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला.गांधी जयंती निमित्त पंतप्रधानांनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा
October 02nd, 09:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधी जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.'मन की बात'चे श्रोते हेच या कार्यक्रमाचे खरे आधारस्तंभ: पंतप्रधान मोदी
September 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.PM Modi pays homage at Gandhi statue in Kyiv
August 23rd, 03:25 pm
Prime Minister Modi paid homage to Mahatma Gandhi in Kyiv. The PM underscored the timeless relevance of Mahatma Gandhi’s message of peace in building a harmonious society. He noted that the path shown by him offered solutions to present day global challenges.भारत आणि मलेशिया यांच्यातील व्यापक धोरणात्मक भागीदारीसंदर्भातील संयुक्त निवेदन
August 20th, 08:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतभेटीच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मलेशियाचे पंतप्रधान दातो’ सेरी अन्वर इब्राहीम दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या दौऱ्यावर आले. मलेशियाच्या पंतप्रधानांची ही पहिलीच दक्षिण आशियायी प्रदेश भेट होती तसेच या दोन्ही पंतप्रधानांनी प्रथमच एकमेकांची भेट घेऊन वाढीव धोरणात्मक संबंधांचा आढावा घेतला. या विस्तृत चर्चेत भारत आणि मलेशिया यांच्यातील संबंध बहुस्तरीय आणि बहु-आयामी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक क्षेत्रांचा समावेश होता.भारत छोडो चळवळीत सहभागी झालेल्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
August 09th, 08:58 am
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत छोडो चळवळीत जे लोक सहभागी झाले होते त्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे. मोदी यांनी भारत छोडो चळवळीचा एक व्हिडिओ देखील सामाईक केला आहे.भदोहीमध्ये काँग्रेस-सपा विजयी होण्याची सुतराम शक्यता नाही: पंतप्रधान मोदी यूपीच्या भदोही येथील सभेत
May 16th, 11:14 am
उत्तर प्रदेशातील भदोही येथे जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, भदोहीमधील निवडणुकीची आज राज्यभर चर्चा होत आहे. लोक विचारत आहेत की, भदोहीमध्ये ही टीएमसी अचानक कुठून आली? याआधी यूपीमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नव्हते, आणि या निवडणुकीत आपल्यासाठी काहीच आशा उरलेली नाही हे सपाने देखील मान्य केले आहे, म्हणूनच त्यांनी भदोहीच्या रिंगणातून पळ काढला आहे , भदोहीमध्ये सपा आणि काँग्रेसला आपली अनामत रक्कम वाचवणे देखील कठीण झाले, म्हणून ते भदोहीमध्ये हा राजकीय प्रयोग करत आहेत.CAA हे मोदींच्या गॅरंटीचे उदाहरण: पंतप्रधान मोदी यूपीतील लालगंज येथे
May 16th, 11:10 am
2024 च्या लोकसभा निवडणूक पार्श्र्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये लालगंज घेतलेल्या निवडणूक रॅलीमध्ये उत्साही आणि उत्स्फूर्तपणे जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले.ते म्हणाले, मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे जगाला दिसत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' याची आता जगाला खात्री वाटत आहे, असे ते म्हणाले.उत्तर प्रदेशातील लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे पंतप्रधान मोदींच्या जोरदार प्रचार सभा
May 16th, 11:00 am
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्र्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे घेतलेल्या निवडणूक रॅलींमध्ये उत्साही आणि उत्स्फूर्तपणे जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. ते म्हणाले, मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे जगाला दिसत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' येणार याची जगाला खात्री पटली आहे, असेही ते पुढे म्हणाले .The INDI Alliance struggles with a lack of substantial issues: PM Modi in Wardha
April 19th, 06:00 pm
Prime Minister Narendra Modi attended & addressed a public meeting in Wardha, Maharashtra. The PM was enamoured by the audience. The PM too showered his love and admiration on the crowd.Enthusiasts of Wardha, Maharashtra welcome PM Modi at a public meeting
April 19th, 05:15 pm
Prime Minister Narendra Modi attended & addressed a public meeting in Wardha, Maharashtra. The PM was enamoured by the audience. The PM too showered his love and admiration on the crowd.गुजरातमधील कोचरब आश्रमाचे उद्घाटन आणि साबरमती आश्रम प्रकल्पाच्या बृहद आराखड्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 12th, 10:45 am
पूज्य बापू यांचे हे साबरमती आश्रम नेहमीच एक विलक्षण उर्जेचे चैतन्यशील केंद्र राहिले आहे. आणि माझ्याप्रमाणे जसे प्रत्येकाला जेव्हा जेव्हा इथे येण्याची संधी मिळत असते तेव्हा बापू यांची प्रेरणा आपण आपल्या अंतकरणात स्पष्ट रूपाने अनुभव करू शकतो. सत्य आणि अहिंसेचे आदर्श असतील, राष्ट्रपूजेचा संकल्प असेल, गोरगरीब, वंचितांच्या सेवेत नारायणाची सेवा पाहण्याची भावना असावी, साबरमती आश्रमाने बापूंचे हे संस्कार आजही जिवंत ठेवले आहेत. माझे सौभाग्य आहे की आज मी इथे साबरमती आश्रमाच्या पुनर्विकास आणि विस्तार कार्याची पायाभरणी केली आहे. बापूंचा आधी जो पहिला आश्रम होता जेव्हा ते सुरुवातीला इथे आले होते त्या कोचरब आश्रमाचा सुद्धा विकास केला गेला आहे आणि मला आनंद आहे की आज त्याचे सुद्धा लोकार्पण होत आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर गांधीजींनी आपला पहिला आश्रम कोचरब आश्रमातच बनवलेला होता. गांधीजी येथे चरखा चालवत असायचे, कारपेंटरी म्हणजे सुतारकाम शिकत होते. दोन वर्ष कोचरब आश्रमात राहिल्यानंतर गांधीजी साबरमती आश्रमामध्ये आश्रयाला गेले होते. या आश्रमाच्या पुनर्विकासानंतर आता गांधीजी यांच्या त्या दिवसांच्या आठवणी कोचरब आश्रमात आणखीन चांगल्या पद्धतीने संरक्षित राहतील. मी पूज्य बापू यांच्या चरणी नमन करतो आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आहे. मी सर्व देशवासीयांना सुद्धा या महत्त्वपूर्ण प्रेरणादायी ठिकाणांच्या विकास कार्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देत आहे.पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातमधील साबरमती येथे कोचरब आश्रमाचे उद्घाटन
March 12th, 10:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साबरमती आश्रमाला भेट देऊन कोचरब आश्रमाचे उद्घाटन केले तसेच गांधी आश्रम स्मारकाच्या महायोजनेची सुरुवात केली. यावेळी पंतप्रधानांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि हृदय कुंजाला भेट दिली. त्या ठिकाणी असलेल्या प्रदर्शनातून पंतप्रधानांनी फेरफटका मारला आणि रोपट्यांची लागवड केली.पंतप्रधान 12 मार्च रोजी गुजराथ आणि राजस्थानला देणार भेट
March 10th, 05:24 pm
पंतप्रधान 12 मार्च 2024 रोजी गुजरात आणि राजस्थानला भेट देणार आहेत. साधारण सकाळी सव्वानऊ वाजता पंतप्रधान 85,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर दहा वाजता पंतप्रधान साबरमती आश्रमाला भेट देतील, तिथे ते कोचरब आश्रमाचे उद्घाटन करतील तसेच गांधी आश्रम स्मारकाच्या मुख्य आराखड्याचे अनावरणही करतील. त्यानंतर पावणेदोन वाजता पंतप्रधान राजस्थानात पोखरण येथे भारत शक्ती या संयुक्त आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवणाऱ्या तिन्ही दलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेच सरावाचे प्रात्यक्षिक बघतील.बिहार मधील बेत्तीया येथे विकसित भारत-विकसित बिहार कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 06th, 04:00 pm
महर्षि वाल्मिकींची कर्मभूमी, सीता मातेची आश्रयभूमी आणि लवकुशांची ही भूमी, आमचा सर्वांना नमस्कार असो! राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नित्यानंद राय जी, उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा जी, सम्राट चौधरी जी, राज्य सरकारमधील मंत्री, ज्येष्ठ नेते, विजय कुमार चौधरी जी, संतोष कुमार सुमन जी, खासदार संजय जयस्वाल जी. , राधा मोहन जी. , सुनील कुमार जी, रमा देवी जी, सतीश चंद्र दुबे जी, इतर सर्व ज्येष्ठ मान्यवर आणि बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!बिहारमधील बेटियाह येथे विकसित भारत विकसित बिहार कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 06th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेटियाह येथे सुमारे 12,800 कोटी रुपयांच्या रेल्वे, रस्ते आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायूशी संबंधित अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले.17 व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीत पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 10th, 04:59 pm
आजचा हा दिवस लोकशाहीच्या महान परंपरेचा महत्वाचा दिवस आहे.सतराव्या लोकसभेने पाच वर्षे देश सेवेत ज्या प्रकारे अनेक विविध महत्वपूर्ण निर्णय घेतले, अनेक आव्हानांना सर्वांनी आपल्या सामर्थ्याने देशाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला,एका प्रकारे आजचा हा दिवस आपणा सर्वांचा हा पाच वर्षांचा वैचारिक प्रवास, राष्ट्राला समर्पित तो काळ, देशाला पुन्हा एकदा आपले संकल्प राष्ट्र चरणी समर्पित करण्याची ही संधी आहे. ही पाच वर्षे देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म,हे फार क्वचितच घडते.सुधारणाही होतात,कामगिरीही होते आणि परिवर्तन होताना आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहतो,एक नवा विश्वास निर्माण होतो. हे सतराव्या लोकसभेद्वारे देश अनुभवत आहे.मला विश्वास आहे की देश सतराव्या लोकसभेला नक्कीच आशीर्वाद देत राहील. या सर्व प्रक्रियेत सदनाच्या सर्व माननीय सदस्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. सर्व माननीय सदस्यांच्या या चमूचा नेता या नात्यानेही आणि आपणा सर्वांचा एक सहकारी या नात्यानेही मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो.17 व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 10th, 04:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आजचा हा प्रसंग भारताच्या लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान मोदी यांनी 17 व्या लोकसभेच्या सर्व सदस्यांनी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि देशाला दिशा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, आजचा दिवस हा वैचारिक प्रवास आणि हा काळ राष्ट्राच्या उन्नतीसाठी समर्पित करण्याचा एक विशेष प्रसंग आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात ' 'रीफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' ' हा मंत्र राहिला आहे आणि आज संपूर्ण देश ते अनुभवत असल्याचे ते म्हणाले. 17 व्या लोकसभेत करण्यात आलेल्या प्रयत्नांना भारतातील जनता यापुढेही आशीर्वाद देत राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. सभागृहातील सर्व सदस्यांचे योगदान अधोरेखित करत मोदी यांनी त्यांच्याप्रती विशेषतः अध्यक्षांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधानांनी सभापतींचे आभार मानले आणि सभागृहाचे कामकाज हसतमुखाने , संतुलित आणि निष्पक्ष पद्धतीने हाताळल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली.