महाराष्ट्रात नाशिक येथे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

December 07th, 10:03 pm

महाराष्ट्रात नाशिक येथे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

राज्यसभेचे सभापती थिरू सी पी राधाकृष्णन् यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी केले भाषण

December 01st, 11:15 am

हिवाळी अधिवेशनाचा आरंभ होत आहे आणि आज सभागृहातील आम्हा सर्व माननीय सदस्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. तुमचे स्वागत करणे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली सभागृहाच्या माध्यमातून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यात तुमचे अमूल्य मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी एक खूप मोठी संधी आहे. मी सभागृहाच्या वतीने आणि माझ्या वतीने, तुमचे खूप खूप अभिनंदन करतो, तुमचे स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी तुम्हाला विश्वासही देतो की या सभागृहात बसलेले सर्व माननीय सदस्य, या वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा जपतील आणि तुमच्या प्रतिष्ठेची देखील नेहमीच काळजी घेतील, मर्यादा राखतील. हे मी तुम्हाला आश्वासन देतो.

राज्यसभेचे सभापती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांच्या सत्कार समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

December 01st, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे आज प्रथमच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवत असल्याबद्दल स्वागत केले. राज्यसभेच्या सर्व माननीय सदस्यांसाठी हा क्षण अभिमानाचा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सभापतींचे मनःपूर्वक स्वागत करताना मोदी म्हणाले, सभागृहाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने, मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. मी तुम्हाला हे देखील आश्वासन देतो की या वरिष्ठ सभागृहातील सर्व माननीय सदस्य नेहमीच या प्रतिष्ठित संस्थेचे पावित्र्य जपतील आणि तुमच्या प्रतिष्ठेचा मान राखण्याची नेहमीच काळजी घेतील. हे माझे तुम्हाला ठाम आश्वासन आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील 2 आणि गुजरातमधील 2 अशा 4 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या दोन बहु-मार्गिका प्रकल्पांना दिली मंजुरी

November 26th, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या एकूण सुमारे 2,781 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांअंतर्गत खाली नमूद कामांचा समावेश आहे:

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात खराडी-खडकवासला (चौथी मार्गिका) आणि नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग (मार्गिका क्र. 4 ए )यांच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

November 26th, 04:22 pm

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या जाळे अधिक विस्तारण्‍यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र, 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र.2 ए (वनाज ते चांदणी चौक) आणि मार्गिका क्र. 2बी (रामवाडी-वाघोली-विठ्ठलवाडी) यांना मिळालेल्या मंजुरीनंतर आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत मंजूर झालेला हा दुसरा महत्त्वाचा प्रकल्प आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबर रोजी मुंबईला भेट देणार

October 27th, 10:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईला भेट देतील आणि सायंकाळी 4:00 च्या सुमारास ते नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला, संबोधित करतील तसेच ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षपद भूषवतील.

NDA freed Bihar from Naxalism and Maoist terror — now you can live and vote fearlessly: PM Modi in Begusarai

October 24th, 12:09 pm

Addressing a massive public rally in Begusarai, PM Modi stated, On one side, there is the NDA, an alliance with mature leadership, and on the other, there is the 'Maha Lathbandhan'. He highlighted that nearly 90% of purchases in the country are of Swadeshi products, benefiting small businesses. The PM remarked that the NDA has freed Bihar from Naxalism and Maoist terror, and that every vote of the people of Bihar will help build a peaceful, prosperous state.

We’re connecting Bihar’s heritage with employment, creating new opportunities for youth: PM Modi in Samastipur

October 24th, 12:04 pm

Ahead of the Bihar Assembly elections, PM Modi kickstarted the NDA’s campaign by addressing a grand public meeting in Samastipur, Bihar. He said, “The trumpet of the grand festival of democracy has sounded. The entire Bihar is saying, ‘Phir Ek Baar NDA Sarkar!’” Remembering Bharat Ratna Jan Nayak Karpoori Thakur ji, the PM said, “It is only due to his blessings that people like us, who come from humble and backward families, are able to stand on this stage today.”

PM Modi addresses enthusiastic crowds in Bihar’s Samastipur and Begusarai

October 24th, 12:00 pm

Ahead of the Bihar Assembly elections, PM Modi kickstarted the NDA’s campaign by addressing massive gatherings in Samastipur and Begusarai, Bihar. He said, “The trumpet of the grand festival of democracy has sounded. The entire Bihar is saying, ‘Phir Ek Baar NDA Sarkar!’” Remembering Bharat Ratna Jan Nayak Karpoori Thakur ji, the PM remarked, “It is only due to his blessings that people like us, who come from humble and backward families, are able to stand on this stage today.”

ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत पत्रकार परिषदेतील संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांसमोर केलेले निवेदन

October 09th, 11:25 am

पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पहिल्या भारत दौऱ्यानिमित्त, आज त्यांचे इथे- मुंबईमध्ये स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.

महाराष्ट्रातील मुंबई येथे अनेक विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 08th, 03:44 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी रामदास आठवले जी, के.आर. नायडू जी, मुरलीधर मोहोळ जी, महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, अन्य मंत्रीगण, जपानचे भारतातील राजदूत केइची ओनो आणि इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, मुंबईतल्या विविध विकास प्रकल्पांचे देखील केले उद्घाटन आणि लोकार्पण

October 08th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले तसेच मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. सर्व मान्यवरांचे स्वागत करत, मोदी यांनी उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.अलिकडेच पार पडलेल्या विजयादशमी आणि कोजागरी पौर्णिमेच्या उत्सवाचा उल्लेख करत त्यांनी आगामी दिवाळी सणासाठी शुभेच्छा दिल्या.

भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात 894 किलोमीटर्सची भर घालणाऱ्या आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड मधील 18 जिल्ह्यांमध्ये विस्तारलेल्या चार बहुपदरीकरण प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

October 07th, 03:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या अंदाजे 24,634 कोटी रुपये खर्चाच्या चार प्रकल्पांना मंजुरी दिली. हे प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:

पंतप्रधान 8-9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

October 07th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8-9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. नवी मुंबईत पंतप्रधानांचे आगमन होईल आणि नव्याने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दुपारी 3 च्या सुमाराला ते पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 3:30 च्या सुमारास पंतप्रधान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. तसेच मुंबईतल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

September 26th, 07:00 pm

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नवी दिल्लीत, भारत मंडपम येथे, वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

September 25th, 06:16 pm

‘वर्ल्ड फूड इंडिया’ या कार्यक्रमामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन! आजच्या या आयोजनात आपले शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार आणि ग्राहक, हे सर्व एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. ‘वर्ल्ड फूड इंडिया’ हा नव्या संपर्कांचा, नव्या संवादांचा आणि सर्जनशीलतेची एक पर्वणी ठरला आहे. मी थोड्याच वेळापूर्वी येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांना भेट देऊन आलो आहे. आनंदाची गोष्ट अशी की या प्रदर्शनात पोषणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, तेलाच्या वापरात बचत करण्यावर भर दिला आहे आणि पॅकबंद उत्पादनांची गुणवत्ता आणि पोषकता वाढवण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण आयोजनासाठी मी आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमाला केले संबोधित

September 25th, 06:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार, नवोन्मेषक आणि ग्राहक हे सर्वजण या कार्यक्रमात एकाचवेळी उपस्थित असून , त्यामुळे वर्ल्ड फूड इंडिया नवीन संपर्क, नवीन जोडणी आणि सर्जनशीलतेचे व्यासपीठ बनले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपण नुकतीच प्रदर्शनांना भेट दिली आहे असे सांगून पोषण, तेलाचा कमीत कमी वापर आणि पॅकेज केलेल्या उत्पादनांचा आरोग्यदायीपणा वाढवणे यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी कार्यक्रमातील सर्व सहभागींचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

25 सप्टेंबर रोजी पंतप्रधान उत्तर प्रदेश आणि राजस्थानला भेट देणार

September 24th, 06:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि राजस्थानला भेट देतील. सकाळी 9.30 वाजता ते ग्रेटर नोएडा येथे उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025 चे उद्घाटन करतील आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील.

पालघरमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

August 28th, 07:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पालघर येथे निवासी इमारत कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला असून काहीजण जखमी झाले आहेत.

महाराष्ट्रातील पुणे येथे झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

August 11th, 04:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पुणे येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीला आराम पडावा अशी कामना पंतप्रधानांनी व्यक्त केली.