यावेळची निवडणूक म्हणजे एनडीएच्या नेतृत्वाखालील सरकारचे 'संतुष्टिकरण' मॉडेल विरुद्ध काँग्रेस-सपाचे 'तुष्टिकरण मॉडेल' यांच्यातील लढत आहे: पीएम मोदी यूपीतील जौनपूर येथे
May 16th, 11:15 am
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये जौनपूर येथे अत्यंत जोशात पार पडलेल्या विराट प्रचारसभेला संबोधित केले. ते म्हणाले, जग मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे पाहत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' हे जगाला आता ठामपणे पटले आहे, असेही ते पुढे म्हणाले.CAA हे मोदींच्या गॅरंटीचे उदाहरण: पंतप्रधान मोदी यूपीतील लालगंज येथे
May 16th, 11:10 am
2024 च्या लोकसभा निवडणूक पार्श्र्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये लालगंज घेतलेल्या निवडणूक रॅलीमध्ये उत्साही आणि उत्स्फूर्तपणे जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले.ते म्हणाले, मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे जगाला दिसत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' याची आता जगाला खात्री वाटत आहे, असे ते म्हणाले.उत्तर प्रदेशातील लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे पंतप्रधान मोदींच्या जोरदार प्रचार सभा
May 16th, 11:00 am
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्र्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे घेतलेल्या निवडणूक रॅलींमध्ये उत्साही आणि उत्स्फूर्तपणे जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. ते म्हणाले, मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे जगाला दिसत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' येणार याची जगाला खात्री पटली आहे, असेही ते पुढे म्हणाले .अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 14th, 12:01 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे यशस्वी आणि युवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्रिगण, अन्य खासदार, आमदार आणि अलिगढचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे केले भूमिपूजन
September 14th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे भूमिपूजन केले. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या अलिगढ नोड आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ यांचा प्रस्तावित आराखडा मांडलेल्या प्रदर्शनाला पंतप्रधानांनी भेट दिली.महान योद्धे आणि नेत्यांना योग्य तो सन्मान आणि आदर न देणाऱ्या इतिहासातल्या चुकांची दुरुस्ती करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
February 16th, 02:45 pm
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करताना, देशासाठी बहुमोल योगदान दिलेल्या थोर नेत्यांचे स्मरण अतिशय महत्वाचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत आणि भारतीयत्व यासाठी सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्यांना, इतिहासाच्या पुस्तकात योग्य ते महत्व दिले गेले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. भारताचा इतिहास घडवणाऱ्याप्रती, इतिहास लेखकांची ही अनियमितता आणि अन्याय आता दूर करण्यात येत आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपण प्रवेश करत असून या टप्यावर या महान व्यक्तीत्वांच्या योगदानाचे स्मरण अधिकच महत्वाचे ठरत असल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केल्यानंतर ते आज बोलत होते.उत्तर प्रदेशातील बहराईच येथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकासकामांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 16th, 11:24 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केली. महाराजा सुहेलदेव यांच्या नावाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
February 16th, 11:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या बहराइच इथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पायाभरणी केली. महाराजा सुहेलदेव यांच्या नावाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.पंतप्रधानांच्या हस्ते होणार महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामाचा पायाभरणी समारंभ
February 14th, 11:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून १६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी अकरा वाजता महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामांचा पायाभरणी समारंभ होणार आहे. उत्तर प्रदेशमधील बहराइचमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात महाराजा सुहेलदेव यांची जयंती साजरी होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील या समारंभास उपस्थित राहणार आहेत.