वाराणसी इथे काशी तमिळ संगम च्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 19th, 07:00 pm

कार्यक्रमाला उपस्थित उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री धर्मेंद्र प्रधान जी, माजी केंद्रीय मंत्री पॉन राधाकृष्णन जी, बनारस हिंदू विद्यापीठाचे प्र-कुलगुरु सुधीर जैन, राज्यसभा खासदार इलैईराजा जी,आयआयटी मद्रासचे संचालक प्राध्यापक कामाकोट्टि जी, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात वाराणसी येथे ‘काशी तमिळ संगमम’ चे केले उद्घाटन

November 19th, 02:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात वाराणसी येथे आयोजित होत असलेल्या महिनाभर चालणाऱ्या 'काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाचे आज उद्घाटन केले. तमिळनाडू आणि काशी या देशातील अतिशय महत्त्वाच्या आणि प्राचीन अध्ययन केंद्रांमध्ये अनेक शतकांपासून असलेला सबंधांचा नव्याने शोध घेणे, त्यांची पुष्टी करणे आणि त्यांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तमिळनाडूमधील 2500 पेक्षा जास्त प्रतिनिधी काशीला भेट देणार आहेत. आज झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी 'तिरुक्कुरल' या पुस्तकाचे 13 भाषामधील भाषांतरित आवृत्त्यांसह प्रकाशन केले. आरतीनंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहिले.

चेन्नईच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन / हस्तांतरण / पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 14th, 11:31 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे आज मुख्य प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ पार पडला आणि त्यांच्या हस्ते लष्कराला अर्जुन मेन बॅटल टँक (एम के – 1 ए) सुपूर्त करण्यात आला.

पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूमध्ये महत्त्वाच्या प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ संपन्न

February 14th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे आज मुख्य प्रकल्पांचा पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ पार पडला आणि त्यांच्या हस्ते लष्कराला अर्जुन मेन बॅटल टँक (एम के – 1 ए) सुपूर्त करण्यात आला.

पंतप्रधान येत्या 14 फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर जाणार

February 12th, 06:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळचा दौरा करणार आहेत. यावेळी 14 तारखेला सकाळी 11 च्या सुमाराला चेन्नईत पंतप्रधानांच्या हस्ते महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण होईल आणि अनेक प्रकल्पांचा कोनशिला समारंभही होईल. तसेच अर्जुन मेन बॅटल टँक लष्कराला सुपूर्द करण्याचा समारंभही त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमाराला पंतप्रधान कोच्ची येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. या प्रकल्पांमुळे दोन्ही राज्यांच्या विकासाला महत्वाची गती मिळेल आणि या राज्यांची विकासक्षमता पूर्णपणे वापरण्याचा वेग वाढेल.

आयआयटी मद्रासच्या पदवीदान समारंभात पंतप्रधानांचे भाषण

September 30th, 12:12 pm

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडाप्पडी के. पलाणीस्वामीजी, माझे सहकारी रमेश पोखरीयाल ‘निशान्क्जी’,उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम, आयआयटी मद्रासचे अध्यक्ष, राज्यपाल मंडळाचे सदस्य, या महान संस्थेचे संचालक आणि शिक्षकवृंद, मान्यवर अतिथी आणि आपल्या भविष्याच्या सुवर्ण उंबरठ्यावर उभे असलेले माझे तरुण मित्र. आज येथे उपस्थित असणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.

आयआयटी मद्रासच्या 56व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

September 30th, 12:11 pm

आपल्यासमोर आज भारताचे छोटे रुप आणि नव भारताचे चैतन्य आहे. इथे उत्साह आणि सकारात्मकता आहे. तुमच्या डोळ्यात मला भविष्याची स्वप्ने दिसत आहेत, भारताचे भविष्य मला त्यात दिसत आहे. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या भूमिका आपल्याला अधोरेखित करायची आहे. आपले जेवण करणारा वर्ग आणि वसतीगृह शांतपणे स्वच्छ ठेवणारा हा वर्ग आहे.