जगाच्या कानाकोपऱ्यात योगशास्त्र पोहचेल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत : पंतप्रधान

June 21st, 08:40 am

योगाचार्य, योगप्रचारक आणि योगाभ्यासाशी संबंधित प्रत्येकाने योगशास्त्र, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सातव्या जागतिक योगदिनानिमित्त त्यांनी आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधला.

कोरोना महामारीने ग्रस्त जगामध्ये योग एक आशेचा किरण बनला आहे: पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

June 21st, 08:37 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने महामारीच्या काळात योगाने पार पाडलेल्या भूमिकेबद्दल विचार मांडले. या कठीण काळात योग हा लोकांसाठी सामर्थ्य आणि संयम यांचा मोठा स्त्रोत बनून राहिला आहे असे ते म्हणाले. जगातील अनेक देशांच्या संस्कृतीमध्ये योग हा अविभाज्य घटक म्हणून अंतर्भूत नसल्यामुळे महामारीच्या काळात अनेक देशांतील जनतेला योग दिनाचे विस्मरण होणे साहजिक आहे, पण त्याऐवजी योगाबद्दल जगात असलेली उत्सुकता वाढली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 21st, 06:42 am

आज जेव्हा संपूर्ण विश्व कोरोना महामारीशी लढा देत आहे तेव्हा योग आपल्यासाठी एक आशेचा किरण म्हणून काम करत आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत, जगभरातील सर्व देशांमध्ये तसेच भारतात जरी कोणत्याही मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकले नसले तरीही, योग दिवसाबाबत लोकांचा उत्साह जराही कमी झालेला दिसत नाही. कोरोना महामारी पसरलेली असताना देखील या वेळच्या योग दिनाच्या “स्वास्थ्यासाठी योग” या संकल्पनेने, कित्येक कोटी लोकांच्या योगाबद्दलच्या उत्साहाला आणखीन उत्तेजन दिले आहे. जगातील प्रत्येक देश, प्रत्येक समाज आणि प्रत्येक व्यक्ती निरोगी राहो आणि सर्वजण एकत्र येऊन परस्परांचे सामर्थ्य बनो अशी सदिच्छा मी आजच्या योग दिनानिमित्त व्यक्त करतो.

सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण

June 21st, 06:41 am

जगभरात कोरोना महामारीचा प्रकोप असताना, यंदाची आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना “सर्वांच्या कल्याणासाठी योग” लोकांना आत्मबळ देणारी ठरली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी म्हटले आहे. जगातील प्रत्येक देश, समाज आणि व्यक्तीच्या आरोग्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आणि आपण सगळे एकत्र येऊन एकमेकांना बळ देऊ अशी प्रार्थना केली. सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त त्यांनी आज जनतेशी संवाद साधला.