ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना शस्त्रक्रियेनंतर उत्तम आरोग्य आणि प्रकृतीत वेगाने सुधारणेसाठी पंतप्रधानांकडून शुभेच्छा

December 12th, 09:50 pm

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या शस्त्रक्रियेनंतर उत्तम आरोग्य आणि प्रकृतीत वेगाने सुधारणेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या.

रिओ दि जानेरो येथील G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली

November 20th, 08:05 pm

रिओ दि जानेरो येथे सुरु असलेल्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची भेट घेतली.

"सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा" या विषयावरील जी 20 सत्रात पंतप्रधानांचे भाषण

November 18th, 08:00 pm

सुरुवातीलाच, जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनासाठी केलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल तसेच यशस्वी जी 20 अध्यक्षतेसाठी अध्यक्ष लुला यांचे अभिनंदन करू इच्छितो.

सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा या विषयावरील जी 20 सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित

November 18th, 07:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा’ या विषयावरील जी 20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला आज संबोधित केले. शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि प्रेमळ आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे अध्यक्ष महामहिम लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांचे आभार मानले. शाश्वत विकास उद्दिष्टांवर केंद्रित ब्राझीलच्या जी 20 कार्यक्रम पत्रिकेचे त्यांनी कौतुक केले. हा दृष्टिकोन ग्लोबल साऊथच्या समस्या अधोरेखित करतो तसेच नवी दिल्ली जी 20 शिखर परिषदेचे लोककेंद्रित निर्णय पुढे नेतो असे पंतप्रधानांनी नमूद केले. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य साठी भारतीय जी 20 अध्यक्षतेने दिलेला नारा रिओ चर्चेत देखील गुंजत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन

November 16th, 12:45 pm

माननीय राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून, पश्चिम आफ्रिका क्षेत्रातील आपला जवळचा भागीदार असलेल्या नायजेरिया या देशाला ही माझी पहिलीच भेट आहे. माझी ही भेट लोकशाही आणि बहुलवादावरील सामायिक विश्वासावर आधारित आपली धोरणात्मक भागीदारी वाढवण्याची एक संधी असेल. मला हिंदीत स्वागत संदेश पाठवणाऱ्या भारतीय समुदायाला आणि नायजेरियातील मित्रांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे.

पंतप्रधान मोदी नायजेरिया, ब्राझील आणि गयानाला भेट देणार

November 12th, 07:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. नायजेरियामध्ये ते धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासंबंधीच्या उच्चस्तरीय चर्चेत सहभागी होणार असून भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. ब्राझीलमध्ये ते G20 शिखर परिषदेत सहभागी होतील. गयानामध्ये, पंतप्रधान वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील तसेच तेथील संसदेलाही ते संबोधित करणार असून कॅरिबियन प्रदेशासोबतचे संबंध दृढ करण्याची भारताची बांधिलकी अधोरेखित करणाऱ्या कॅरिकॉम-इंडिया समिटमध्ये सहभागी होतील.

आभासी G-20 परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले निवेदन (22 नोव्हेंबर 2023)

November 22nd, 09:39 pm

आपण मांडलेल्या मौल्यवान विचारांची मी पुन्हा एकदा प्रशंसा करतो. तुम्ही ज्या मोकळ्या मनाने आपले मत व्यक्त केले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ब्राझिलच्या अध्यक्षांनी साधला दूरध्वनीवरून संपर्क

November 10th, 08:35 pm

ब्राझिलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय बैठक

September 10th, 08:06 pm

नवी दिल्लीतल्या जी- 20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच 10 सप्टेंबर 2023 रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.

भारत- ब्राझील संयुक्त निवेदन

September 10th, 07:47 pm

नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने आज, 10 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला द सिल्वा यांची भेट झाली.

जी 20 शिखर परिषदेच्या समारोप समारंभात पंतप्रधानांचे निवेदन

September 10th, 02:12 pm

ब्राझीलला आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली जी -20 आपली सामायिक उद्दिष्टे पुढे नेईल.

पंतप्रधानांची ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर बैठक

May 21st, 09:49 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष महामहीम लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची 21 मे 2023 रोजी हिरोशिमा इथे भेट घेतली.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांकडून लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे अभिनंदन

January 02nd, 07:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

ब्राझिलच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 31st, 12:26 pm

ब्राझिलच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.