पंतप्रधान भुवनेश्वर येथे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षकांच्या परिषदेला पंतप्रधान राहणार उपस्थित
November 29th, 09:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत ओडिशा येथे आयोजित अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद 2024 ला उपस्थित राहणार आहेत. भुवनेश्वरमधील लोकसेवा भवनातील राज्य संमेलन केंद्रात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक, या दुर्घटनेतील पीडितांसाठी जाहीर केली मदत
September 08th, 01:13 pm
उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला आहे.This election is to free country from mentality of 1000 years of slavery: PM in Aonla
April 25th, 01:07 pm
In the Aonla rally, PM Modi continued to criticize the opposition, whether it be the Congress or the Samajwadi Party, stating that they only think about their own families. He said, “For these people, their family is everything, and they do not care about anyone else. In Uttar Pradesh, the Samajwadi Party did not find a single Yadav outside their family to whom they could give a ticket. Whether it's Badaun, Mainpuri, Kannauj, Azamgarh, Firozabad, everywhere, tickets have been given only to members of the same family. Such people will always prioritize the welfare of their own family, and for them, anyone outside their family holds no significance.”PM Modi captivates massive audiences at vibrant public gatherings in Agra, Aonla & Shahjahanpur, Uttar Pradesh
April 25th, 12:45 pm
In anticipation of the 2024 Lok Sabha Elections, Prime Minister Narendra Modi delivered stirring addresses to massive crowds in Agra, Aonla and Shahjahanpur in Uttar Pradesh. Amidst an outpouring of affection and respect, PM Modi unveiled a transparent vision for a Viksit Uttar Pradesh and a Viksit Bharat. The PM exposed the harsh realities of the Opposition’s trickery and their “loot system”.उत्तर प्रदेशातील लखनौ येथे उत्तर प्रदेश वैश्विक गुंतवणूक शिखर परिषदेतील प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 19th, 03:00 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, ऊर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, देश-परदेशातून आलेले औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी आणि माझ्या परिवारातील सदस्य! आज आपण इथे विकसित भारतासाठी विकसित उत्तर प्रदेश निर्मितीचा संकल्प करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. आणि मला असे सांगण्यात आले की, आत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याबरोबर उत्तर प्रदेशातील 400 पेक्षा जास्त विधानसभा मतदार संघातील लक्षावधी लोक या कार्यक्रमाबरोबर जोडले गेले आहेत. जे लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहभागी झाले आहेत, त्या सर्वांचेही मी अगदी मनापासून स्वागत करतो. 7-8 वर्षांपूर्वी आपण विचारही करू शकत नव्हतो की, उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक आणि नोकरीच्या संधी निर्माण होण्याविषयी असे वातावरण तयार होईल. त्या काळामध्ये जर कोणी म्हणाले असते की, उत्तर प्रदेश विकसित राज्य बनेल, तर कदाचित ते कोणी ऐकूनही घेतले नसते. त्यामुळे यावर कोणी विश्वास ठेवण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. परंतु आज पहा, लक्षावधी कोटी रूपयांची गुंतवणूक उत्तर प्रदेशमध्ये केली जात आहे आणि मी उत्तर प्रदेशचा खासदार आहे. माझ्या उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळी असे काही चांगले घडते, त्यावेळी सर्वात जास्त आनंद मला होतो. आज हजारो प्रकल्पांवर काम सुरू होत आहे. कारखान्यांची उभारणी केली जात आहे. हे सर्व उद्योग सुरू होत आहेत, त्यांच्यामुळे उत्तर प्रदेशचे चित्रच बदलून जाणार आहे. सर्व गुंतवणूकदारांचे आणि विशेषतः उत्तर प्रदेशातील सर्व युवकांचे मी आज विशेष अभिनंदन करतो.उत्तर प्रदेशातील लखनौ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत विकसित उत्तर प्रदेश’ कार्यक्रमाला केले संबोधित
February 19th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ‘विकसित भारत विकसित उत्तर प्रदेश’ कार्यक्रमाला संबोधित केले. उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद - 2023 च्या चौथ्या कार्यक्रमामध्ये राज्यासाठी 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मंजूर झालेल्या 14000 प्रकल्पांचा प्रारंभ यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या प्रकल्पांमध्ये उत्पादन, अक्षय ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा, अन्न प्रक्रिया, गृहनिर्माण आणि मालमत्ता, आदरातिथ्य, मनोरंजन आणि शिक्षण यांच्यासह इतर क्षेत्रांमधील उद्योग व्यवसायांचा समावेश आहे.मन की बात, डिसेंबर 2023
December 31st, 11:30 am
नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो. ‘मन की बात’ म्हणजे तुम्हां सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच, आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो, आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन उर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हां सर्वाना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.पंतप्रधानांनी गोरखपूर रेल्वे स्थानकावर दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा
July 07th, 08:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वे स्थानकावर दोन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना आज हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. 498 कोटी रुपये खर्चून या स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रस्तावित स्थानकाच्या प्रतिकृतीची पाहणी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(भाग 102) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 18th, 11:30 am
मित्रांनो, खूप लोकं सांगतात की, पंतप्रधान म्हणून मी अमुक एक चांगले काम केले आहे, एखादे मोठे काम केले आहे. ‘मन की बात’ चे कित्येक श्रोते पत्र लिहून खूप कौतुक करतात. कोणी म्हणतात हे केले, कोणी म्हणते ते काम केले, हे चांगले केले, हे अधिक चंगले केले, हे उत्कृष्ट केले परंतु, जेव्हा मी भारतातील सामान्य नागरिकांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, त्यांची इच्छाशक्ती बघतो तेव्हा मी भारावून जातो. कोणतेही मोठे ध्येय असो, कठीणातील कठीण आव्हान असू दे, भारतीय जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक आव्हानावर तोडगा शोधून काढते. दोन-तीन दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिमेकडे किती मोठे चक्रीवादळ आले हे आपण सगळ्यांनीच पाहिले. जोरदार वारा, मुसळधार पाऊस. बिपरजॉय ने कच्छमध्ये किती मोठे नुकसान केले, परंतु कच्छ मधील लोकांनी हिंमतीने आणि सतर्कतेने इतक्या धोकादायक चक्रीवादळाचा सामना केला हे खूपच अभूतपूर्व आहे. दोन दिवसांनी कच्छ मधील लोकं, त्यांचे नवीन वर्ष अर्थात आषाढ बीज साजरे करणार आहेत. आषाढ बीज, कच्छ मध्ये पावसाच्या आगमनाचे प्रतिक मानले जाते हा देखील एक संयोगच आहे. मी इतकी वर्षे कच्छला येत-जातो, तिथल्या लोकांची सेवा करण्याचे भाग्यही मला लाभले आहे आणि म्हणूनच मला कच्छच्या लोकांची हिंमत आणि उपजीविकेविषयी माहिती आहे. दोन दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर हा कच्छ पुन्हा कधीच सावरणार नाही, असे म्हंटले जायचे, तोच जिल्हा आज देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे कच्छमधील लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून देखील त्याच वेगाने बाहेर पडतील.उत्तर प्रदेशातील लखनौ आणि हरदोई जिल्ह्यांमध्ये उभारलेल्या पीएम मित्र भव्य वस्त्रोद्योग पार्कचे पंतप्रधानांनी केले कौतुक
April 18th, 02:07 pm
उत्तर प्रदेशातील लखनौ आणि हरदोई जिल्ह्यांमध्ये उभारलेल्या पीएम मित्र भव्य वस्त्रोद्योग पार्कचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.सीतापूरचे खासदार राजेश वर्मा यांनी स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
February 22nd, 10:11 am
सीतापूर (उत्तर प्रदेश ) येथील लोकसभा खासदार राजेश वर्मा यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.उत्तर प्रदेशमध्ये लखनौ येथे आयोजित जागतिक गुंतवणुकदार संमेलन 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 10th, 11:01 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यजी, ब्रजेश पाठकजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आणि इथले लखनौचे प्रतिनिधी राजनाथ सिंहजी, विविध देशांमधून आलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर, उत्तर प्रदेशचे सर्व मंत्री आणि जागतिक गुंतवणूकदार संमेलनासाठी उपस्थित उद्योग क्षेत्रातील आदरणीय सदस्य, जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार, धोरणकर्ते, कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज आणि बधु भगिनिंनो!लखनौ येथे उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 चे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
February 10th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथे जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि इन्व्हेस्ट यूपी 2.0 चा शुभारंभ केला. उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 ही उत्तर प्रदेश सरकारची प्रमुख गुंतवणूक परिषद असून, ही परिषद धोरणकर्ते, औद्योगिक क्षेत्रातील नेते, शिक्षण तज्ञ, विचारवंत आणि जगभरातील नेत्यांना एकत्रितपणे व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी आणि भागीदारी करण्यासाठी एकत्र आणणार आहे. पंतप्रधानांनी यावेळी आयोजित प्रदर्शनालाही भेट दिली.पंतप्रधान येत्या 10 फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्राचा दौरा करणार
February 08th, 05:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 फेब्रुवारीला, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी दहा वाजता, पंतप्रधान लखनौला जातील, तिथे त्यांच्या हस्ते , उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 चे उद्घाटन होईल. सुमारे, पावणेतीन वाजता, पंतप्रधान मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दोन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. तसेच, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचे लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्यानंतर सुमारे साडे चार वाजता पंतप्रधान मुंबईतच अल्जामिया-तुस-सैफीयाच्या नव्या परिसराचेही उद्घाटन करतील.उत्तर प्रदेशातील जालौन येथे बुंदेलखंड द्रुतगती मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 16th, 04:17 pm
उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, उप-मुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि इथले रहिवासी भानूप्रताप सिंह जी, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिगण, खासदार, आमदार, अन्य लोक प्रतिनिधी आणि बुंदेलखंडच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधानांची उत्तर प्रदेशला भेट आणि बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचे केले उद्घाटन
July 16th, 10:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात जलौनच्या ओराई तालुक्यातील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.लखनौमध्ये यूपी गुंतवणूकदार शिखरपरिषदेच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 03rd, 10:35 am
उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री श्रीयुत योगी आदित्यनाथ जी, लखनौचे खासदार आणि भारत सरकारमधील आमचे वरिष्ठ सहकारी श्रीयुत राजनाथ सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे इतर सहकारीवर्ग, यूपीचे उप-मुख्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्रीगण, विधानसभा आणि विधान परिषदेचे सभापती महोदय, येथे उपस्थित उद्योग जगतातील सर्व सहकारी, अन्य मान्यवर, स्त्री-पुरुषहो!PM attends the Ground Breaking Ceremony @3.0 of the UP Investors Summit at Lucknow
June 03rd, 10:33 am
PM Modi attended Ground Breaking Ceremony @3.0 of UP Investors Summit at Lucknow. “Only our democratic India has the power to meet the parameters of a trustworthy partner that the world is looking for today. Today the world is looking at India's potential as well as appreciating India's performance”, he said.पंतप्रधान 3 जून रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर
June 02nd, 03:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जून 2022 रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान इंदिरा गांधी प्रतिष्ठान, लखनौ येथे पोहोचतील.तिथे ते उत्तरप्रदेश गुंतवणूकदार परिषदेच्या तिसऱ्या (3.0) पायाभरणी सोहळ्याला उपस्थित राहतील. दुपारी 1:45 च्या सुमाराला , पंतप्रधान कानपूरच्या पारौंख गावात पोहोचतील, तिथे ते माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत पाथरी माता मंदिराला भेट देतील.त्यानंतर, दुपारी 2 च्या सुमाराला , ते डॉ. बी.आर. आंबेडकर भवनाला भेट देतील, त्यानंतर 2:15 वाजता मिलन केंद्राला भेट देतील.हे केंद्र माननीय राष्ट्रपतींचे वडिलोपार्जित घर आहे, जे सार्वजनिक वापरासाठी दान करण्यात आले आणि त्याचे रूपांतर समुदाय केंद्र (मिलन केंद्र) मध्ये करण्यात आले. त्यानंतर ते दुपारी 2:30 वाजता पारौंख गावात सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील.Congress, Samajwadi party have remained hostage to one family for the past several decades: PM Modi in Amethi, UP
February 24th, 12:35 pm
Prime Minister Narendra Modi today addressed public meetings in Uttar Pradesh’s Amethi and Prayagraj. PM Modi started his address by highlighting that after a long time, elections in UP are being held where a government is seeking votes based on development works done by it, based on works done in the interest of the poor and based on an improved situation of Law & Order.