पंतप्रधानांनी घेतली पोर्तुगालच्या पंतप्रधानांची भेट
November 19th, 06:08 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस माँटेनेग्रो यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची परस्परांशी ही पहिलीच भेट होती. पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी एप्रिल 2024 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ तसेच आणखी मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून तिसऱ्या कार्यकाळाबद्दल पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी त्यांचे अभिनंदन केले.