पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या जयंतीनिनिमित्त वाहिली आदरांजली.

July 23rd, 09:57 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या जयंतीनिनिमित्त अभिवादन केले आहे. गेल्या वर्षी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यावेळी केलेले भाषण देखील सामायिक केले आहे.

लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा 2023 पुणे येथील पंतप्रधानांचे संबोधन

August 01st, 12:00 pm

आजचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे. इथे येऊन मी जितका उत्साहित आहे तितकाच भावूकही आहे.आज आपणा सर्वांचे आदर्श आणि भारताचा गौरव असलेले बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. त्याच बरोबर अण्णाभाऊ साठे जी यांची जयंतीही आहे.लोकमान्य टिळक जी आपल्या स्वातंत्र्य इतिहासाच्या ललाटाचे टिळा आहेत.त्याच बरोबर अण्णाभाऊ यांनी समाज सुधारणेसाठी जे योगदान दिले आहे ते असामान्य आहे.या दोन्ही महापुरुषांच्या चरणी मी श्रद्धापूर्वक नमन करतो.

महाराष्ट्रात पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला

August 01st, 11:45 am

कार्यक्रमस्थळी आल्यानंतर पंतप्रधानांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आणि हा दिवस त्यांच्यासाठी विशेष असल्याचे सांगितले. याप्रसंगी आपल्या भावनांना उजाळा देताना पंतप्रधान म्हणाले की, आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे. लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे 'तिलक' आहेत असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी समाजाच्या कल्याणासाठी अण्णाभाऊ साठे यांनी दिलेल्या अद्वितीय आणि अतुलनीय योगदानाचे स्मरण केले. छत्रपती शिवाजी महाराज , चापेकर बंधू, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या भूमीला पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. तत्पूर्वी पंतप्रधानांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले

August 01st, 08:29 am

पंतप्रधान आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील विविध प्रमुख विकास प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणी देखील करणार आहेत.

पंतप्रधान 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

July 30th, 01:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.