PM Modi delivers impactful addresses in Chhatrapati Sambhajinagar, Panvel & Mumbai, Maharashtra

November 14th, 02:30 pm

In powerful speeches at public meetings in Chhatrapati Sambhajinagar, Panvel & Mumbai, Prime Minister Narendra Modi highlighted the crucial choice facing Maharashtra in the upcoming elections - between patriotism and pisive forces. PM Modi assured the people of Maharashtra that the BJP-Mahayuti government is dedicated to uplifting farmers, empowering youth, supporting women, and advancing marginalized communities.

मुंबईतल्‍या 'अभिजात मराठी भाषा' कार्यक्रमात पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

October 05th, 07:05 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजित पवार जी, माझे केंद्रातील सर्व सहकारी, अनेक पिढ्यांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवणाऱ्या आशाताई जी. अभिनेते बंधू सचिन जी, नामदेव कांबळे जी, सदानंद मोरे जी, महाराष्ट्र सरकारचे मंत्री बंधू दीपक जी, मंगलप्रभात लोढा जी, भाजपा मुंबई अध्यक्ष बंधू आशिष जी, इतर मान्यवर बंधू आणि भगिनी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात मुंबई येथे अभिजात मराठी भाषा कार्यक्रमात सहभाग

October 05th, 07:00 pm

मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा क्षण महत्वाचा असून, हे मराठी भाषेच्या इतिहासातील सोन्याचे पान असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषिकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित आकांक्षा पूर्ण झाल्या असून, महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यात योगदान देण्याची आपल्याला संधी मिळाली, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले आणि या ऐतिहासिक कामगिरीचा भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला. बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याचे सांगून, पंतप्रधानांनी या भाषांशी संबंधित जनतेचे अभिनंदन केले. मराठी भाषेचा इतिहास खूप समृद्ध आहे आणि या भाषेतून निर्माण झालेल्या ज्ञानाच्या प्रवाहांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि आजही ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, असे पंतप्रधानांनी विशेष नमूद केले. ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी लोकांना वेदांमधील ज्ञानाशी जोडले आणि ज्ञानेश्वरीने गीतेचा बोध लोकांपर्यंत पोहोचवून भारताचे आध्यात्मिक ज्ञान पुन्हा जागे केले.

महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 20th, 11:45 am

दोन दिवस आधीच आपण सगळ्यांनी विश्वकर्मा पुजेचा सण साजरा केला. आणि आज वर्ध्याच्या पावन भूमीवर आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या यशाचा उत्सव साजरा करत आहोत. आजचा दिवस यासाठीही विशेष आहे कारण 1932 मध्ये याच दिवशी महात्मा गांधी यांनी अस्पृश्यतेविरोधात मोहीमेला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याचा हा उत्सव, विनोबा भावे यांच्या साधनेचे ठिकाण, महात्मा गांधी यांची कर्मभूमी, वर्ध्याची ही भूमी, हे यश आणि प्रेरणेचा असा काही संगम आहे, जो विकसित भारताच्या आपल्या संकल्पाला नवी ऊर्जा देईल. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपण कष्टातून समृद्धीचा, या कौशल्याने एक चांगल्या उद्याचा जो संकल्प केला आहे, वर्ध्यातील बापूंची प्रेरणा या संकल्पांना सिद्धीस नेण्याचे माध्यम ठरतील. मी या योजनेशी संबंधित सर्व लोकांचे, देशभरातील सर्व लाभार्थ्यांचे या निमित्ताने अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला केले संबोधित

September 20th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ योजना आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू केली. त्यांनी पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कर्जे जारी केली आणि पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत वर्षभरातील प्रगतीचे प्रतीक म्हणून समर्पित तिकिटाचे अनावरणदेखील केले. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपरेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणी केली.यावेळी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली.

ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी/उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

September 17th, 12:26 pm

ओदिशाचे राज्यपाल रघुबर दास जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन मांझी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जुआल ओराम जी, धर्मेंद्र प्रधान जी, अन्नपूर्णा देवी जी, ओदिशाचे उपमुख्यमंत्री के. व्ही. सिंहदेव जी, श्रीमती प्रभाती परिडा जी, खासदार, आमदार, देशाच्या कानाकोपऱ्यातून आज आमच्यासोबत उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि ओदिशामधील माझ्या बंधू-भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे ‘सुभद्रा’ या सर्वात मोठ्या महिला-केंद्रित योजनेचा केला शुभारंभ

September 17th, 12:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे ‘सुभद्रा’ या ओदिशा सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला. केवळ महिलांसाठीची ही सर्वात मोठी योजना असून, 1 कोटीहून अधिक महिलांना त्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधानांनी 10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यात निधी हस्तांतरित करण्याची सुरुवातही केली. पंतप्रधान मोदी यांनी रु. 2800 कोटीहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली आणि त्याचे लोकार्पण केले, तसेच रु.1000 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी पीएमएवाय-जी, अर्थात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत, सुमारे 14 राज्यांमधील जवळजवळ 10 लाख लाभार्थ्यांना मदतीचा पहिला हप्ता जारी केला, देशभरातील पीएमएवाय, अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण आणि शहरी) 26 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळ्यात ते सहभागी झाले, आणि पीएमएवाय (ग्रामीण आणि शहरी) योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या चाव्या सुपूर्द केल्या. त्यानंतर त्यांनी पीएमएवाय –जी साठी अतिरिक्त घरांच्या सर्वेक्षणासाठी Awaas+ 2024 ॲप चे उद्घाटन केले आणि प्रधानमंत्री आवास योजना - शहरी (पीएमएवाय – यु ) 2.0 च्या कार्यान्वयनाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या जयंतीनिनिमित्त वाहिली आदरांजली.

July 23rd, 09:57 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या जयंतीनिनिमित्त अभिवादन केले आहे. गेल्या वर्षी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यावेळी केलेले भाषण देखील सामायिक केले आहे.

मुंबईमध्ये विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

July 13th, 06:00 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पीयूष गोयल जी, रामदास आठवले जी, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, अजितदादा पवार जी, राज्य सरकार मधील मंत्री मंगल प्रभात जी, दीपक केसरकर जी, इतर सर्व मान्यवर, महिला आणि पुरुषहो,

पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रात मुंबई येथे 29,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

July 13th, 05:30 pm

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी मुंबई आणि आसपासच्या प्रदेशांमधील रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 29,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रातील तरुणांसाठी विशाल कौशल्य विकास प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केला , ज्यामुळे राज्यात रोजगाराच्या संधींना आणखी चालना मिळेल. केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेल्या वाढवण बंदराचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. 76,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे 10 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होतील असे ते म्हणाले.

नवीन संसद भवनात लोकसभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 19th, 01:50 pm

आज नवीन सभागृहातील पहिल्या अधिवेशनात मला प्रथम बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. या नवीन संसद भवनात मी सर्व खासदारांचे मनापासून स्वागत करतो. हा प्रसंग अनेक अर्थांनी अभूतपूर्व आहे. स्वातंत्र्याच्या ‘अमृत काळ ’ ची ही पहाट आहे आणि या नव्या वास्तूत भारत नव्या संकल्पांसह आपले भविष्य घडवण्यासाठी पुढील वाटचाल करत आहे. विज्ञान जगतात चंद्रयान-3 च्या अतुलनीय यशाचा प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली जी 20 चे उत्तम आयोजन ही एक संधी आहे जी जागतिक स्तरावर इच्छित प्रभाव पाडेल. या अनुषंगाने , आजचा दिवस नवीन संसद भवनात आधुनिक भारत आणि आपल्या प्राचीन लोकशाहीची शुभ सुरुवात आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी हा योग जुळून आला हा सुखद योगायोग आहे. श्रीगणेश ही शुभ आणि यशाची देवता आहे. गणेश ही बुद्धी आणि ज्ञानाची देवता देखील आहे. या पवित्र दिवशी, हे होत असलेले उद्घाटन म्हणजे संकल्पापासून सिद्धीकडे दृढ निश्चयाने आणि नव्या आत्मविश्वासाने प्रवासाची सुरुवात आहे.

नव्या संसद भवनात पंतप्रधानांचे लोकसभेत संबोधन

September 19th, 01:18 pm

नव्या संसद भवनातील आजचे पहिले सत्र ऐतिहासिक असल्याचे सांगून पंतप्रधानांनी त्याबद्दल शुभेच्छा दिल्या. लोकसभा अध्यक्षांनी या पहिल्या सत्रात सभागृहाला संबोधित करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी अध्यक्षांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आणि सर्व सदस्यांचे स्वागत केले. अमृत काळाच्या सुरुवातीला भविष्यकाळातील वाटचालीसाठी नव्या संसद भवनात आपण प्रवेश केला असून हा महत्त्वपूर्ण प्रसंग असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. देशाने अलिकडे मिळवलेले यश अधोरेखित करताना पंतप्रधानांनी चांद्रयान 3 आणि जी20 चे आयोजन व त्याचा जगावर पडलेला प्रभाव याचा उल्लेख केला. गणेश चतुर्थीच्या मंगल दिवशी संसद भवनाच्या नव्या वास्तूत कामकाजाला सुरुवात झाल्याचे सांगून पंतप्रधानांनी गणपती हे संपन्नतेचे, मांगल्याचे, कार्यकारण आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. अशा मंगल समयी संकल्प सिद्धीस नेण्याचा आणि नव्या प्रवासाची सुरुवात नव्या उत्साहात आणि ऊर्जेसह करण्याचा हा काळ सुरू झाल्याचे ते म्हणाले. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोकमान्य टिळक आणि नव्या आरंभाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थीच्या माध्यमातून देशभरात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित केली, त्याच प्रेरणेतून आज आपण पुढे जात आहोत.

मध्य प्रदेशात बिना येथे केली 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण

September 14th, 12:15 pm

बुंदेलखंडची ही धरती वीरांची धरती आहे, शूरवीरांची धरती आहे. या भूमीला बीना आणि बेतवा, दोन्हींचा आशीर्वाद मिळाला आहे. आणि मला तर एक महिन्यात दुसऱ्यांदा, सागरला येऊन आपणा सर्वांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. आणि मी शिवराज जींच्या सरकारचे अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो कारण आज इथे येऊन, आपणा सर्वांचे दर्शन घेण्याची संधी दिली. मागच्या वेळी मी संत रोहिदासजींच्या त्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना भेटायला आलो होतो. आज मला मध्य प्रदेशचा विकास आणि त्या विकासाला नवी गती देणाऱ्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याची संधी मिळत आहे. हे प्रकल्प, या क्षेत्राच्या औद्योगिक विकासाला नवी गती देतील. या प्रकल्पांवर केंद्र सरकार 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार आहे. तुम्ही कल्पना करू शकता, पन्नास हजार कोटी किती असतात? आपल्या देशातल्या अनेक राज्यांचा पर्ण वर्षाचा अर्थसंकल्प देखील इतका नसतो, जितका खर्च आज एकाच कार्यक्रमासाठी भारत सरकार करत आहे. यातून हे दिसून येते की मध्य प्रदेशसाठी आमचे संकल्प किती मोठे आहेत. हे सगळे प्रकल्प येणाऱ्या काळात मध्य प्रदेश मध्ये लाखो तरुणांना रोजगार देतील. हे प्रकल्प, गरीब आणि मध्यमवर्गातल्या कुटुंबांची स्वप्न सत्यात उतरवणारे आहेत. मी बीना रिफायनरीचे विस्तारीकरण आणि अनेक नव्या सुविधांच्या भूमिपूजनाच्या मध्य प्रदेशच्या कोट्यवधी जनतेला अनेक अनेक शुभेच्छा देतो.

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात बिना येथे केली 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी

September 14th, 11:38 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात बिना येथे 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बिना रिफायनरीमधील 49,000 कोटी रुपयांच्या खर्चाने तयार होणारे पेट्रोकेमिकल संकुल, नर्मदापुरम येथे पॉवर अँड रिन्युएबल एनर्जी झोन’, इंदूरमध्ये दोन आयटी पार्क आणि रतलाम येथे मेगा इंडस्ट्रियल पार्क आणि मध्य प्रदेशात सहा नवी औद्योगिक क्षेत्रे यांचा समावेश होता.

महाराष्ट्रातील पुणे येथे विविध प्रकल्पांच्या पायाभरणी आणि उद्‌घाटनावेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 01st, 02:00 pm

खरंच, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत पुण्याचे मोठे योगदान आहे. पुण्याने बाळ गंगाधर टिळक यांच्यासह अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक देशाला दिले आहेत. आजच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती सुद्धा आहे. आपल्या सर्वांसाठी हा दिवस खूपच खास आहे. अण्णा भाऊ साठे महान समाज सुधारक होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी ते भारलेले होते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक त्यांच्या साहित्यावर संशोधन करतात. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य, त्यांचे आदर्श आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पुणे येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्‌घाटन केले

August 01st, 01:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या विभागाचे लोकार्पण केले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली 1,280 हून अधिक घरे आणि पुणे महापालिकेने बांधलेली 2,650 हून अधिक घरे देखील पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आली. त्यांनतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्‍या सुमारे 1,190 घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6,400 हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अंतर्गत सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.

लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा 2023 पुणे येथील पंतप्रधानांचे संबोधन

August 01st, 12:00 pm

आजचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे. इथे येऊन मी जितका उत्साहित आहे तितकाच भावूकही आहे.आज आपणा सर्वांचे आदर्श आणि भारताचा गौरव असलेले बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. त्याच बरोबर अण्णाभाऊ साठे जी यांची जयंतीही आहे.लोकमान्य टिळक जी आपल्या स्वातंत्र्य इतिहासाच्या ललाटाचे टिळा आहेत.त्याच बरोबर अण्णाभाऊ यांनी समाज सुधारणेसाठी जे योगदान दिले आहे ते असामान्य आहे.या दोन्ही महापुरुषांच्या चरणी मी श्रद्धापूर्वक नमन करतो.

महाराष्ट्रात पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला

August 01st, 11:45 am

कार्यक्रमस्थळी आल्यानंतर पंतप्रधानांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आणि हा दिवस त्यांच्यासाठी विशेष असल्याचे सांगितले. याप्रसंगी आपल्या भावनांना उजाळा देताना पंतप्रधान म्हणाले की, आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे. लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे 'तिलक' आहेत असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी समाजाच्या कल्याणासाठी अण्णाभाऊ साठे यांनी दिलेल्या अद्वितीय आणि अतुलनीय योगदानाचे स्मरण केले. छत्रपती शिवाजी महाराज , चापेकर बंधू, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या भूमीला पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. तत्पूर्वी पंतप्रधानांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले

August 01st, 08:29 am

पंतप्रधान आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील विविध प्रमुख विकास प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणी देखील करणार आहेत.

पंतप्रधानांचे लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

July 23rd, 09:41 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केलं आहे. लोकमान्य टिळकांचे धैर्य, त्यांनी दिलेला लढा आणि स्वातंत्रयुद्धातील त्यांचं समर्पण हे देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील असं त्यांनी म्हटलं आहे.