जपान - भारत व्यावसायिक सहकार्य समितीच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

जपान - भारत व्यावसायिक सहकार्य समितीच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

March 05th, 07:52 pm

जपान -भारत व्यावसायिक सहकार्य समितीच्या 17 सदस्यीय शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.समितीचे अध्यक्ष तात्सुओ यासुनागा यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. या शिष्टमंडळात उत्पादन, बँकिंग, विमान वाहतूक, औषधनिर्माण, प्रकल्प अभियांत्रिकी आणि लॉजिस्टिक अशा विविध क्षेत्रांतील जपानमधील आघाडीच्या उद्योग समूहांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.

या आठवड्यात भारत जगाच्या दृष्टीतून

या आठवड्यात भारत जगाच्या दृष्टीतून

March 05th, 11:37 am

जागतिक भागीदारांसोबतच्या चर्चा, भेटीगाठींंमुळे भारतासाठी हा आठवडा व्यस्त राहिल्याचे तसेच देशांतर्गत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रगती करत असल्याचे दिसून आले. युरोपियन कमिशनच्या नेतृत्वाने भारताला भेट दिली, लॅटिन अमेरिकेशी व्यापार चर्चा पुढे सरकली आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी देशात त्यांची उपस्थिती वाढवली. दरम्यान, भारतातील लॉजिस्टिक, आरोग्य सेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रात बदल होत असून त्याचे दीर्घकाळ आर्थिक परिणाम दिसून येऊ शकतात.

गुवाहाटी येथील ऍडव्हान्टेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषद 2025 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

गुवाहाटी येथील ऍडव्हान्टेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषद 2025 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 25th, 11:10 am

आसामचे राज्यपाल लक्ष्मणप्रसाद आचार्य, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, उद्योग जगतातील नेते, मान्यवर, महिला आणि पुरुष,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ॲडव्हांटेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषद 2025 चे उद्घाटन

February 25th, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील गुवाहाटी येथे ॲडव्हांटेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषद 2025चे उद्घाटन केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पूर्व भारत आणि ईशान्य भारत आज भविष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत आणि ॲडव्हांटेज आसाम हा आसामची अफाट क्षमता आणि प्रगती, जगाशी जोडण्यासाठीचा एक मोठा पुढाकार आहे. भारताच्या समृद्धीत पूर्व भारताने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा इतिहास साक्षीदार आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली, आज आपण विकसित भारताकडे वाटचाल करत असताना पूर्व भारत आणि ईशान्य भारत त्यांची खरी क्षमता प्रदर्शित करतील. ॲडव्हांटेज आसाम त्याच भावनेचे प्रतिनिधित्व आहे, असे सांगून त्यांनी अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आसाम सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. 'ए फॉर आसाम' अशी ओळख निर्माण होईल, तो दिवस फार दूर नाही, असे मत पंतप्रधानांनी 2013 मध्ये व्यक्त केले होते. त्याला त्यांनी उजाळा दिला.

पंतप्रधान येत्या 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान मध्यप्रदेश, बिहार आणि आसामचा दौरा करणार

February 22nd, 02:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान मध्यप्रदेश, बिहार आणि आसामचा दौरा करणार आहेत. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ते मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथे पोहोचतील आणि दुपारी 2 वाजता त्यांच्या हस्ते तेथील बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेचा पायाभरणी समारंभ होईल. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान भोपाळ येथे आयोजित जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन करतील. त्यानंतर ते बिहारमधील भागलपूर येथे रवाना होतील आणि तेथील कार्यक्रमात दुपारी सव्वादोनच्या सुमाराला ते पंतप्रधान किसान योजनेचा 19 वा हप्ता वितरीत करतील तसेच बिहारमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण देखील करतील. त्यानंतर ते गुवाहाटी येथे पोहोचतील आणि संध्याकाळी 6 वाजता ते झुमॉयर बिनंदिनी (मेगा झुमॉयर) 2025 कार्यक्रमात सहभागी होतील. दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास पंतप्रधान गुवाहाटी येथे आयोजित अॅडव्हांटेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विषयक शिखर परिषद 2025 चे उद्घाटन करतील.

ईटी नाऊ जागतिक व्यापार परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 15th, 08:30 pm

गेल्या वेळी मी ईटी समिट (जागतिक परिषद) मध्ये आलो होतो, तेव्हा निवडणुका होणार होत्या; आणि त्या वेळी मी तुम्हाला अगदी नम्रतेने सांगितले होते की, आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत नव्या वेगाने काम करेल. आज हा वेग दिसत आहे, आणि देश त्याला समर्थनही देत आहे, याचा मला आनंद वाटतो. नवीन सरकार स्थापन झाल्यावर देशातील अनेक राज्यांमध्ये बीजेपी-एनडीएला जनतेचा सतत आशीर्वाद लाभत आहे. जून मध्ये ओदिशाच्या जनतेने विकसित भारताच्या संकल्पाला गती दिली, नंतर हरियाणाच्या जनतेने समर्थन दिले आणि आता दिल्ली मधील लोकांनी आम्हाला मोठे समर्थन दिले आहे. विकसित भारताच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी देशातील जनता आज कशी खांद्याला खांदा लावून काम करत आहे, याची ही पावती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2025 ला केले संबोधित

February 15th, 08:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2025 अर्थात उद्योग व्यवसायविषयक जागतिक शिखर परिषद 2025 ला संबोधित केले. या शिखर परिषदेच्या याआधीच्या पर्वालाही आपण संबोधित केले होते, आणि त्यावेळी आपण आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत नव्या वेगाने काम करेल असे नम्रपणे नमूद केले होते याचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी करून दिले. त्यानुसार आता भारताने पकडलेली नवी गती सर्वांना दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेला देशभरातून पाठबळ मिळत असल्याबद्दलही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. ओदिशा, महाराष्ट्र, हरयाणा आणि नवी दिल्लीतल्या जनतेने विकसित भारताबद्दलच्या वचनबद्धतेला प्रचंड प्रमाणात पाठबळ दर्शवल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभारही मानले. जनतेचे हे पाठबळ म्हणजे देशातली जनता विकसित भारताच्या संकल्प पूर्ततेसाठी खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचेच द्योतक आहे असे पंतप्रधान म्हणाले.

भारत-अमेरिका संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन

February 14th, 04:57 am

सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र अध्यक्ष ट्रम्प यांचे माझे शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मनापासून आभार मानतो. अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या नेतृत्वाद्वारे, भारत-अमेरिका संबंध जपले आहेत आणि पुनरुज्जीवित केले आहेत.

आयएनएस सुरत,आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर यांचा नौदलात समावेश करण्याप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

January 15th, 11:08 am

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहकारी राजनाथ सिंह जी, संजय सेठ जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्यासमवेत आज दोन्ही उपमुख्यमंत्रीही आहेत,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजीत पवार जी, सीडीएस,सीएनएस, नौदलाचे सर्व सहकारी, माझगाव गोदी मध्ये काम करणारे सर्व सहकारी, इतर अतिथी वर्ग,महिला आणि पुरुष वर्ग,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर या प्रमुख युद्धनौकांचे (एक लढाऊ जहाज, एक विनाशिका आणि एक पाणबुडी) राष्ट्रार्पण

January 15th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत नौदल डॉकयार्ड येथे नौदलाच्या तीन आघाडीच्या युद्धनौका, आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर यांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. 15 जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगून पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या शूर वीरांना अभिवादन केले.त्यांनी सर्व शूर सैनिकांचे अभिनंदन केले.